top of page
साहित्य चपराक
कृतीयुक्त शिक्षणपद्धतीची गरज
अन्न, वस्र, निवारा या जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत तसेच शिक्षण हेही मूलभूत घटक बनले आहे. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. शिक्षणामुळे व्यक्तिची प्रगती होते. चांगले-वाईट यातील फरक कळतो. व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात. आयुष्य सुखकर बनवण्याचे माध्यम आहे ‘शिक्षण’ पालक आपल्या मुलांना शाळेत शिकण्यासाठी पाठवतात. त्याचबरोबर अनेक क्लासेसही लावतात. जेणेेकरुन मुलांनी चांगला अभ्यास करावा पण कोणत्या पद्धतीने मुलांना शिकविले जाते, हे सुद्धा तपासणे गरजेचे आहे. विशेषत: लहान मुलांना आपण शि
Apr 2, 20192 min read
शिवसैनिकांचा लहानपणा; सत्तेसाठी शहाणपणा!
शिवसेना हे नाव ऐकताच डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे. त्यांच्या असीम धैर्याचे आणि संघटन कौशल्याचे. त्यानंतर दुसरे चित्र उभे राहते ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे. कारण महाराष्ट्रातील तरुणाईची सळसळती ऊर्जा म्हणजे शिवसेना आहे. तारुण्यात आलेल्या युवक - युवतीला व्यवस्थेबद्दल असणारी चीड व्यक्त करण्याचे व्यासपीठ म्हणजे शिवसेना! साधारणपणे साठ-सत्तरच्या दशकात भारतीय राजकारणात कॉंग्रेस आणि डाव्यांचा प्रभाव होता. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातही त्यांचाच
Apr 1, 20193 min read
कविता
साप्ताहिक ‘चपराक’साठी आपणही आपल्या रचना अवश्य पाठवा. योग्य त्या कवितांना प्रसिद्धी दिली जाईल. या अंकातील कविता येथे देत आहोत. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. बाई माणूस! मी माझ्या पदरात माझा देह गुंडाळते.. तेव्हा माझं मला बाई असण्याचं इतकं कौतुक वाटतं की... मी माणूस असल्याचं स्वतःही क्षणभर विसरून जाते... त्या बाईपणाचं गूढ रहस्य.. विधात्यानं मोठ्या कौशल्यानं घडवलंय... सृष्टीच्या कुशीत निर्मितीचं दान देऊन बाईमाणूस जन्माला घातलंय पण... इथं आम्ही फक्त बाई लक्षात ठेवली... त्यातली मा
Mar 26, 20192 min read
वेश्यामंदिरातील एक तास
1980 चा तो काळ. तेव्हा मी अवघा 17 वर्षांचा होतो. त्यावेळेस मी आमच्या ओळखीच्यांच्या, डेक्कन बस स्थानकाच्या पाठीमागील एका फोटो स्टुडिओत अर्धवेळ काम करायचो. तिथेच माझी आणि हर्षदची ओळख झाली. एक दिवस संध्याकाळी आमचे काम संपल्यावर हर्षद मला म्हणाला; ‘‘रव्या, चल तुला एक गंमत दाखवतो,’’ असे म्हणून तो मला समाधान हॉटेलच्या मागच्या एका गल्लीत घेवून गेला. आजवर मी ह्या बाजूला कधी फिरकलोच नव्हतो त्यामुळे आपण कुठे चाललो आहोत हे मला कळतच नव्हते. पूर्ण अनभिज्ञ होतो मी ह्या सगळ्यापासून आणि त
Mar 24, 20194 min read
गृहस्थी आणि गृहिणी
स्त्री आणि स्वयंपाकघर यांचं एक अतुट नातं आहे. मला जर तुम्ही विचारलं, ‘‘घरातील सर्वात आवडती जागा कोणती?’’ तर मी उत्तर देईन ‘‘स्वयंपाकघर!’’ याला कारणही तसंच आहे. घरातल्या दुसर्या खोल्या या विभागुन घ्याव्या लागतात. प्रत्येकाची आवड आणि निवड याला अनुसरुन मांडणी व आखणी करावी लागते पण इथं मात्र साम्राज्य माझं असतं. हुकमत माझी असते, अधिकारही माझा असतो. कुठे कायपासून, कुठे कधीपर्यंत, मुशाफिरी निर्विवाद आपलीच असते. या खोलीतले खजाने, शोध, प्रयोग सार्याला ‘मी’चा स्पर्श असतो. या स्पर्
Mar 24, 20192 min read
शरद जोशींची दुसरी बाजू!
‘शरद जोशी-शोध अस्वस्थ कल्लोळाचा!’ हे वसुंधरा काशीकर-भागवत यांनी लिहिलेले शरद जोशींच्या 17/18 वर्षांच्या सहवासात त्यांच्या कार्याचा व व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणारे पुस्तक आहे. शरद जोशींच्या आयुष्याची दुसरी बाजू जी समाजासमोर कधीही आली नाही, ती आपणास काशीकरांच्या लिखाणातून वाचायला मिळते. युनोतली प्रतिष्ठेची, पैशांची, सुखासीन नोकरी. युरोपातील सुसंस्कृत, समृद्ध, सुखी आयुष्य. ज्यात निश्चितता आहे, सुरक्षितता आहे ती सोडून दोन मुली, बायको सगळ्यांना घेऊन भारतात आले. केवळ भारतातल्या शेत
Mar 24, 20193 min read
कॉंग्रेसला ‘लकवा’ तर 'घड्याळाची' ‘चार्जिंग डाऊन’
सध्या महाराष्ट्रात पक्षनिष्ठा आणि घराणेशाहीवरुन मोठी रंगतदार चर्चा सुरु आहे. गल्ली-बोळातील सोम्या-गोम्यापासून ते अगदी विचारवंतांपर्यंत सगळेच निष्ठेच्या आणि घराणेशाहीच्या विरोधात बोलताना दिसत आहेत! मात्र असं असलं तरी दुसरी बाजू कोणीही पहायला तयार नाही. समाजात राजकारण सोडून इतर असे अनेक व्यवसाय आहेत की जिथे घराणेशाहीच चालते. उदाहरणार्थ डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर, वकीलाचा मुलगा वकील, क्रिक्रेटरचा मुलगा क्रिकेटर, सनदी अधिकार्याचा मुलगा सनदी अधिकारी आपल्याल
Mar 24, 20193 min read
कृषी पर्यटन कार्यशाळा संपन्न
जुन्नर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी पर्यटन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळा पराशर कृषी पर्यटन केंद्र राजुरी, जुन्नर पुणे येथे पार पडली. यात सात जिल्ह्यातून शेतकरी व कृषी पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणार्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे आयोजक एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले. या कार्यशाळेत दीपक हरणे यांनी कृषी पर्यटनासाठी उपयुक्त आणि पूर
Mar 20, 20191 min read
भूखंड खरेदीचा कानाला खडा
ह्या गोष्टीला आता 15 वर्षे झाली असतील. अचानक मला माझ्या एका भूखंड व्यवहाराची आठवण झाली व तो एक विलक्षण अनुभव शब्दबद्ध करावासा वाटला कारण आपल्या प्रारब्धात जे असते तेच घडते. ते कसे... 2003ला मी पुण्यातल्याच एका छोट्याशा कारखान्यात नोकरी करत असताना काहीसे वेगळे करायची इच्छा होती आणि सहज विचार करता करता माझ्या सुपिक डोक्यात एक कल्पना आली की आमच्या शेजारचा भूखंड सद्य स्थितीत असलेल्या घरासहित विकत घ्यावा व त्याचे रुपांतर एका हॉस्टेलमध्ये करावे किंवा अगदीच काही नाही झाले तर भाड्या
Mar 20, 20194 min read
‘हरवलेलं पत्र’
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला एकटे राहणे शक्यच नाही. आपले विचार, मतं स्पष्ट करायला, बोलायला कुणीतरी हवं असतं. संवाद साधायला कुणीतरी हवं असतं. विचारविनिमय महत्त्वाचे आहे. दूर असलेल्या व्यक्तिशी संवाद साधण्यासाठी, त्या व्यक्तिची खुशाली कळण्यासाठी एक मार्ग होता तो म्हणजे पत्र. आपल्या मनातील भावना, खुशाली, आनंद लोक पत्र लिहून व्यक्त करत होते. ते पत्र पोस्टमन इकडून तिकडे पोहचवण्याचे काम करायचा. दोन व्यक्तींच्या भावना पोहचवणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे ‘पोस्टमन’. पूर्वी स
Mar 20, 20192 min read
आठवणींची मोरपिसं
सारा निसर्गच जणू रंगांनी भरलाय नि भारलायही. रंगांची ही जादू मनाला भुरळ घालते. नेत्रांना एक सुखद जाणीव देते. सारा निसर्ग हिरव्या रंगाची जादू तर करतोच पण त्याचबरोबर तो इतर अनेक रंगांची निर्मितीही करतो. मग ते उडते चमत्कार असतील, निळं पाणी असेल, रंगीत मासे असतील! सारी रंगांची तर दुनिया! या सार्या रंगांच मिश्रण असलेला एक अद्भुत पक्ष्यी इथं आहे आणि त्या पक्ष्याचं तरल, मऊ, मुलायम पीस आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं आहे. मोरपीस! खूप खूप वर्ष मागे गेलात ना अगदी बालपणात, तर आठवेल किती कौ
Mar 20, 20192 min read
...पण बौद्धिक मागासलेपणाचे आम्ही काय करणार?
मानवी जीवन हे विलक्षण आहे. आपापल्या सापेक्ष जीवनचौकटीत तो आपले आयुष्य जगत असतो, धारणा बनवत असतो, आपले व्यक्तिमत्व आपापल्या कुवतीप्रमाणे समृद्ध वा अवरुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. या समृद्धीची वा अवरुद्धीची उंची-खोली मोजत बसण्याचे खरे तर कारण नाही. प्रत्येकाचे जीवन हा एक स्वतंत्र अनुभव असतो. कोणताही बाह्य विचार मनुष्य पूर्णपणे स्वीकारत नाही. मग तो धर्मविचार असो की राजकीय विचार, अर्थविचार असो की सामाजिक विचार! अनेकदा प्रत्येकजण विविध विचारांच्या सापेक्ष उपस्थितीत आपल्या स्वय
Mar 19, 20194 min read
माध्यमांतराचा रंजक धांडोळा
आशय आणि विषयाशी प्रामाणिक असलेली कोणतीही कलाकृती ही थेट काळजाला स्पर्शून जाते. लेखकाचं जीवनानुभव, त्यानं घेतलेली अनुभूती, त्याचं चिंतन, कल्पनाशक्ती या व अशा सगळ्यांचा आविष्कार जेव्हा शब्दरूपात व्यक्त होतो तेव्हा त्याच्या हातून काहीतरी भव्यदिव्य घडतं. ते इतकं ताकतीनं उतरतं की समाजमनाची पकड घेणं ही सहज प्रक्रिया बनून जाते. वाचकांना विचार करायला भाग पाडणं, त्याला नवी दृष्टी देणं, त्याच्या इच्छा-आकांक्षांचं प्रतिबिंब त्यात उमटणं, त्याची स्वप्नं साकारल्याचा आभास निर्माण करणं, त्य
Mar 18, 20194 min read
आरोग्य तरंग - मनातील वसंतोत्सव
शिशिरातील पानगळी पाठोपाठ नवांकुरांसाठी अवकाश निर्माण होते. फांद्याफांद्यावर पानांचे नवे कोंब दिसायला लागतात. एरवी बोचणारी थंडी जरा कमी होऊ लागते. वातावरण उबदार होते. थंडीने आखडलेले शरीर देखील हळूहळू मोकळे व्हायला लागते. धमन्यांमधून रक्ताच्या रुपाने वाहणारा जीवनरस वसंतऋतुच्या आगमनाबरोबर मनालाही प्रफुल्लित करतो. त्यातच भर पडते ती वसंतऋतुमधे फुलणार्या निरनिराळ्या रंगीबेरंगी फुलांची. निसर्गातील हा रंगोत्सव, आनंदाचा संदेश घेऊन येतो. आपल्या ‘आरोग्यतरंग’ या सदराची सुरुवात मार्च 201
Mar 16, 20194 min read
अध्यात्मातून निसर्गसंवर्धनाचा संदेश
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे । आळविती ...’ निसर्गाशी समरस झालेले, निसर्गाशी नाते सांगणारे, लोकाचा, लोकाकरिता, लोकासाठी लिहिणारे संत तुकाराम महाराज हे खरे पर्यावणवादी संतकवी होते. झाडे, झुडूपांनी बहरलेला निसर्ग पाहिला की किती रम्य वाटते! मन प्रसन्न होते. कोणत्याही मोबदल्याविना हा निसर्ग आपल्याला आनंद देत असतो पण आजकाल हे चित्र नाहीसे झाले आहे. झाडांची विनाकारण तोड होत असते. मॉल्स, बिल्डिंग्ज बांधण्यासाठी जंगलांवर कुर्हाड चालवली जाते. त्यामुळे झाडांची संख्
Mar 15, 20192 min read
भरारी-मिग 21 ची!
1990 ला मी जसा महिन्यातून एकदा चंद्रपूरला जायचो तसाच महिना-दीडमहिन्यातून एकदा नाशिक जवळील ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स ह्या मिग विमानांच्या कारखान्यात जात असे. आमच्या कंपनीला हिंदुस्थान एरोनॉटिक्स (एचएएल) ह्या कंपनीचे त्यांच्या विमानांच्या सुट्या भागांच्या रासायनिक प्रक्रिया करायच्या टाक्या बनवण्याचे व बसवण्याचे कंत्राट मिळालेले होते. त्यामुळे मला ओझर येथील एचएएलच्या कारखान्यात जावे लागायचे. मला माझ्या कंपनीने ह्या कामासाठी मोठ्या विश्वासाने मुखत्यारपत्र देऊन माझी ह्या प्
Mar 14, 20194 min read
भाजपच्या नगरसेविका कोंढरे यांचा निषेध
पुणे, (प्रतिनिधी) : ज्या नगरसेकांना पुण्यासारख्या सुसंस्कृत लोकांनी लोकांची सेवा करण्यासाठी निवडून दिले अशा जबाबदार नगरसेविकेने डॉक्टरांना मारहाण करणे ही समाजाच्या दृष्टिने अतिशय घृणास्पद गोष्ट आहे. अशा प्रकारात डॉक्टरांच्या संरक्षणासाठी जो कायदा करण्यात आला आहे त्या कायद्याच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. ही कारवाई झाल्यास समाजामध्ये डॉक्टरांविषयीचा आदर टिकून राहण्यास मदत होईल; तसेच डॉक्टरांना रूग्णसेवा करताना कुठल्याही भीतीखाली काम करण्याची दहशत राहणार नाही,
Mar 14, 20191 min read
जात आणि धर्म नसलेली भारतातील पहिली महिला
जात जात जाईल जात! समता, स्वातंत्र्य आणि न्याय यापासून दिशाहीन राहिलेल्या सामाजिक प्रवाहाविरुद्ध बंड केला तरच इतिहास आपली दखल घेतो. आज आपल्यासमोर किंवा आपल्याकडून काही चुकीचे होत असताना किंबहुना आपल्याला काही चांगले काम करण्याची संधी असताना, आपण मूग गिळून म्हणा किंवा मूग न गिळता म्हणा गप्प राहतो, गप्प बसतो हे वेगळे सांगायची गरज नाही परंतु, काही दिवसापूर्वीच असा बंड केला आहे तामिळनाडूतील तिरुपाथुर या शहारातील एका स्त्रीने! एम. ए. स्नेहा यांनी! या अशा पहिल्या भारतीय नागरिक आहेत
Mar 10, 20193 min read
भारतरत्न नानाजी देशमुख
गरीबातल्या गरीब माणसाची सर्वांगीण प्रगती करण्याचा ध्यास घेतलेले ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे नानाजी देशमुख. त्यांच्या या कार्याचा गौरव पुणे विद्यापीठाने त्यांना डी लिट ही पदवी देऊन 1997 मध्ये केला. भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ सन्मान बहाल केला. आता प्रजासत्ताक दिनी भारतातील सर्वोत्तम सन्मान अशी ‘भारतरत्न’ ही पदवी मरणोत्तर देण्यात आली. त्यामुळे लक्षावधी गरीबांना मनापासून आनंद झाला. अशा नानाजींचा जन्म 11 ऑक्टोबर 1916 रोजी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील कडोळी गावी झा
Mar 9, 20194 min read
स्त्रियांची हतबलता सांगणारी चंद्राबाईची डायरी
ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांची सध्या चर्चेत असणारी कादंबरी म्हणजे ‘डायरी एका चंद्राबाईची.’ मुंबईच्या ‘ग्रंथाली प्रकाशन’ने पुस्तकाचे काम अतिशय देखणे केले आहे तर सतीश भावसार यांनी आशयाला अनुसरून मुखपृष्ठ रेखाटले आहे. आपल्या समाजव्यवस्थेत वेश्येला खूप खालचे स्थान दिले गेले आहे. चारचौघात व प्रतिष्ठेच्या ठिकाणी न बोलण्याचा हा विषय समजला जातो. वेश्या ही पुरुषांची भोग वस्तू आहे. वासना भागविण्याचे जणू ते यंत्रच आहे... पैसा टाकायचा आणि शरीराची भूक भागवून घ्यायची..
Mar 5, 20193 min read
bottom of page
.jpg)