top of page
पुस्तक परिचय
सुभावभजन : मन होई प्रसन्न!
हिंदू धर्मात ज्याप्रमाणे ईश्वराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्याचप्रमाणे ईश्वरीय अवतार समजले जाणारे संत यांचेही स्थान अपरंपार असे आहे. जो सत्याचे आचरण करतो, जो ज्ञानवंत आहे, तो संत असा एक विचार भक्तांच्या मनी वसलेला असतो. संत रुपात अवतार घेऊन समाज सुधारणेचे अतुलनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तिंना गुरू, साधू, तपस्वी, ऋषी, महात्मा, स्वामी, मुनी, योगी, तपस्वीनी, योगिनी इत्यादी नावांनी ओळखल्या जाते. पुरातन काळापासून अशा व्यक्तिंनी केवळ धर्मप्रसाराचे काम केले आहे असे नाही तर वेळोवे
Mar 23, 20245 min read
शोध शिक्षणाचा : प्रस्तावना - डॉ. ह. ना. जगताप, सोलापूर
भारतात जे काही शिक्षणतज्ज्ञ होऊन गेले त्यामध्ये जे. कृष्णमूर्ती यांचे नाव एक विचारवंत शिक्षणतज्ज्ञ म्हणून घ्यावे लागते. त्यांचे शिक्षणविषयक विचार समजून घेताना त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान देखील समजून घ्यावे लागते. शिक्षणक्षेत्रात गेली 40-50 वर्षे काम करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की, आमच्यापैकी फार थोड्या लोकांना जे. कृष्णमूर्ती समजले आहेत. त्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या तत्त्वज्ञानासंबंधीचे ग्रंथ मराठीतून फारसे उपलब्ध नाहीत. तसेच त्यांचे तत्त्वज्ञान हे केवळ सहज वा
Mar 11, 20243 min read
कष्ट-त्याग-समर्पणाची गाथा- 'अग्निदिव्य'
एका स्त्रीचा स्वतःच्या अस्तित्वासाठी व स्वतःच्या मुलाला हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी दिलेला हा लढा, एक संघर्ष म्हणजेच हे पुस्तक. हे पुस्तक वाचताना एका स्त्रीचा लढा केवळ 'अग्नितांडव' न राहता तो 'अग्निदिव्य' कसा बनत गेला, याची प्रचिती हेते. कारण पुस्तकाच्या या नावातच या पुस्तकाचा सर्व गाभा दडलेला आहे. एका मुलाची आंतरिक वेदना, एका महिलेचा आभाळाएवढा संघर्ष व समाजमन असे तीन टप्पे युवालेखक आशिष निनगुरकर यांच्या 'अग्निदिव्य' या चरित्रात्मक पुस्तकात आहेत. एका महिलेने व तिच्या मुलान
Mar 11, 20243 min read


समाजभूषण : ह. भ. प शांताराम महाराज निम्हण
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ गायक ह. भ. प शांताराम महाराज निम्हण यांचा आज (दि. 11) पुण्यात अमृतमहोत्सवी सोहळा संपन्न होतोय. त्यानिमित्त ‘चपराक प्रकाशन’ने ‘सुभावभजन’ हा गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचे संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांचा हा विशेष लेख. नमो सुभावभजन भाजना । भवेभकुंभ भजना । विश्वोद्भव भुवना । श्रीगुरुराया ॥ अशा मधुर आणि अर्थबोधी शब्दात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ईशस्तवन केले आहे. यातील ‘सुभावभजन’ म्हणजे विशुद्ध भावाने केलेले भजन! विशुद्ध भाव निर्म
Feb 11, 20243 min read
हळवा कोपरा - प्रस्तावना
संगमेश्वर तालुक्यातील लोवलेस्थित वाचकप्रिय लेखक जे. डी. पराडकर यांचे ‘चपराक प्रकाशन’कडून प्रसिद्ध होत असलेले हे सातवे पुस्तक. जेडींच्या लेखणीतून कोकणचा समृद्ध, अस्पर्श असा निसर्ग जसा दिसतो तशीच वरपांगी साधी भोळी पण अंतरी नाना कळा असणारी माणसेही दिसतात. कोकणातील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू यांची स्पंदनेही लेखकाच्या संवेदनशील मनाला जाणवतात. ‘हळवा कोपरा’ हे पुस्तकही याला अपवाद नाही. मुळात हे साप्ताहिक स्तंभलेखन असल्याने इथे विषयांची विविधता पुरेपूर आहे. ‘पैजेचा विडा’ हा पहिल
Jan 27, 20246 min read
कस्तुरीगंध - प्रस्तावना
प्रा. बी. एन. चौधरी हे खान्देशातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. शैक्षणिक कारकिर्दीबरोबरच त्यांनी साहित्याच्या विविध प्रांतात यशस्वी मुसाफिरी केली आहे. ‘माणूस माणूस जोडत जावा’ या सूत्रानुसार त्यांचं जगणं आणि वागणं आहे. त्यामुळेच सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी ते सहजपणे एकरूप होतात. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातून उमटतं. प्रस्तुतच्या ‘कस्तुरीगंध’ संग्रहातील कथा म्हणजे मानवी भावभावनांवर आधारित सुसंस्कृत जगण्याची शिदोरीच आहे. मातृप्रेमात अखंड डुंबलेल्या या अवलियाच्या शब्दांचा
Jan 27, 20245 min read


विनोबांची शिक्षणछाया - प्रस्तावना
युगपुरुष स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं होतं, ‘‘आपल्या देशाला बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही!’’ हे असे क्षत्रिय निर्माण झालेच तर ते काय करतील? तर मानवधर्माची पताका सर्वत्र डौलात फडकत ठेवतील! मग धर्म म्हणजे काय? त्याचेही उत्तर स्वामीजींनीच खूप मार्मिक शब्दांत दिले आहे. ते म्हणतात, ‘‘धर्म हा मतमतांतरात, धर्मग्रंथात वा शब्दात साठलेला नाही. धर्म म्हणजे आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार!’’ स्वतःची ओळख पटणं, स्वतः
Jan 26, 20244 min read
शिक्षणाविषयी चर्चा घडविणारे पुस्तक..परिवर्तानाची वाट
शिक्षणाविषयी बरंच काही बोलले जाते..शिक्षणाचा पारंपारिक विचार सातत्याने समाजमनावर गारूड करून राहीलेला आहे. अशावेळी शिक्षणाचा खरा विचार समाजमनात रूजविण्याची गरज सातत्याने व्यक्त केली जाते.शेवटी शिक्षण ही एक प्रक्रिया आहे.त्या प्रक्रियेच्या माध्यमातून परिवर्तनाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असतात.अशावेळी शिक्षणाचा विचार समाजासमोर मांडण्याचा संदीप वाकचौरे यांच्या परिवर्तनाची वाट या पुस्तकातून करण्यात आला आहे.चपराक प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होणा-या शिक्षण मालेतील हे पुस्तकही वाचक
Jan 14, 20245 min read
प्राजक्ताचे सडे : पत्ररूप प्रस्तावना - न. म. जोशी
कोकणचे लेखक श्री. जे. डी. पराडकर यांचे प्राजक्ताचे सडे हे सलग सहावे पुस्तक चपराक तर्फे प्रकाशित झाले आहे. अल्पावधीतच साहित्य षटकार ठोकून त्यांनी साहित्य क्षेत्रात मोठा विक्रम केला आहे. या सहाव्या पुस्तकाला सुप्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांची सर्वांगसुंदर प्रस्तावना लाभली आहे. कोकणच्या मातीचा गंध सर्वत्र पसरविणारी ही प्रस्तावना खास चपराकच्या वाचकांसाठी. नक्की वाचा. प्रतिक्रिया कळवा आणि हे पुस्तक घरपोच मागविण्यास विसरू नका. त्यासाठी संपर्क - 7057292092 प
Dec 31, 20234 min read
अग्निदिव्य - एका आईची संघर्षगाथा
माझे सन्मित्र, अत्यंत गुणी आणि अनेकानेक विषयावर जबाबदारीनं लिहिणारे लेखक आशिष निनगुरकर यांचा दूरध्वनी आला. ‘पुण्यात आलोय, भेटायचं आहे’ असं त्यांनी सांगितलं. रंगपंचमीचा दिवस असल्यानं मी नेमका कार्यालयीन काम संपवून त्या दिवशी घरी लवकर गेलो होतो. मग त्यांना घरीच बोलावलं. आमच्या घरी त्यांच्यासोबत रमामावशी आणि अभिषेकदादा आले. सुरुवातीला आशिषजींचे स्नेही म्हणून ती त्यांच्याकडं पाहत होतो. त्यानंतर रमामावशी बोलू लागल्या आणि डोळ्यात अश्रुंचा पूर येऊ लागला. एक तर त्यांची बोलण्याची मराठ
Dec 31, 20234 min read


‘हरी नरके आणि संजय सोनवणी यांची मित्तरकथा’
प्रा. हरी नरके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी पुरोगामी चळवळीचा म्होरक्या काळाआड गेला, म्हणून गळे काढले. छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांपासून ते अनेकांनी आपण किती दुःखात आहोत, याचे ‘प्रदर्शन’ घडवले. यातील ढोंग सगळ्यांनाच दिसत होते पण अशावेळी काहीही बोलायचे नाही, असा एक अलिखित रिवाज असतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक असलेले संजय सोनवणी हे या सगळ्यात एक अपवाद होते. सोनवणी यांचे आणि नरकेंचे कौटुंबीक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्य
Sep 12, 20235 min read
संघर्ष हेच सामर्थ्य - तीन महिन्यात तिसरी आवृत्ती
एखादे आत्मकथन म्हणजे त्या काळाचा, त्या व्यक्तिचा पट असतो. त्यातून आपल्या आयुष्यालाही दिशा मिळते. म्हणूनच जागतिक साहित्यात आत्मकथनांना मोलाचे स्थान आहे. आपल्याकडील प्रत्येक माणसाचे आयुष्य म्हणजे एक कादंबरी असते; मात्र ते शब्दबद्ध करण्यात आपण कमी पडतो. प्रस्तुतचा ग्रंथ म्हणजे आत्मकथनाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. ‘सिद्धेश्वरा’ची कृपा आणि मातृ‘छाया’ असली की आयुष्याचा ‘रवी’ प्रकाशमान होतो. त्यासाठी फक्त स्वतःवर विश्वास असायला हवा. स्वाभिमान जागृत ठेवून संकटांचे संधीत रूपांतर करताना
Apr 15, 20233 min read
व्यथिता : व्यथित करणारा संग्रह!
सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे! संत तुकाराम महाराजांच्या या ओळींचा प्रत्यय मानवी जीवनात पदोपदी येतो. जीवन, संसार म्हटलं की सुख- दु:ख, बऱ्यावाईट घटना ह्या ठरलेल्या असतात. आजकाल सुविधा भरपूर प्रमाणात मिळत असल्या तरीही सुख, समाधान, आनंदाच्या कक्षा, आशा -अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की, दु:ख, उदासीनता, नैराश्य यायला वेळ लागत नाही. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया ह्यांचं मन, भावना कोमल असतात शिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्याही महिलांवर अधिक असल्याने त्या प
Apr 3, 20235 min read


वाटेवरच्या मशाली
वाचकांना घडाभर दूध देण्यापेक्षा पेलाभर बासुंदी देणे कधीही श्रेयस्कर! त्यामुळे उगीच शब्दांचे अवडंबर न माजवता, फाफटपसारा टाळून रंजकपणे थोडक्यात विषय मांडणे महत्त्वाचे असते. नेमकेपणाने विषयाचा वेध घेऊन वाचकांना त्यात गुंतवून ठेवणे हे काम सोेपे नसते. ही किमया साधली आहे नगर येथील लेखिका सुजाता पुरी यांनी. हे वृत्तपत्रीय लेखन असल्याने शब्दांची मर्यादा असणे स्वाभाविक आहे; मात्र या मर्यादेचेच सामर्थ्य करत त्यांनी या मशाली चेतवल्या आहेत. प्रस्तुत पुस्तकातील 55 लघुलेखांद्वारे लेखिकेने
Mar 31, 20232 min read


सामाजिक परिवर्तनाचा पुरस्कार करणाऱ्या ‘अनोख्या रेशीमगाठी’
‘लोक काय म्हणतील?’ अशा प्रकारची सामाजिक भीती, समाजातला प्रत्येक समूह, प्रत्येक कुटूंब आणि प्रत्येक माणूस बाळगत असतो. त्याच ओझ्याखाली प्रत्येकजण आपले संपूर्ण आयुष्य, धडपडत जगत असतो. समाज नावाची स्वार्थी संस्था ही गंमत बघण्यात अघोरी आनंद मानणारी असते. त्यांना कोणाचे काय झाले, याच्याशी मतलब नसतो . ग्रामीण भागात अजूनही पारंपरिक, जुनाट, बुरसटलेल्या आणि कालबाह्य रुढी, परंपरा टिकून आहेत. नव्हे, कष्टकरी, श्रध्दाळू लोकांना अनामिक भीती घालून त्यांना खतपाणी घातले जाते. हे सगळे झुगारुन
Mar 19, 20235 min read


मराठी कवितेची नवी पहाट : अम्मी अब्बूच्या कविता
सुप्रसिद्ध कवी आणि शिवव्याख्याते जावेद शेख लिखित अम्मी अब्बूच्या कविता हा काव्यसंग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. काव्यसंग्रह मनोमन खोलवर भावला. अंतर्मुख आणि अस्वस्थ करून गेला. पुण्याच्या चपराक प्रकाशनाने अतिशय दर्जेदार स्वरूपात हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. तब्बल ३७ कविता या काव्यसंग्रहात आहेत. काव्यसंग्रहाचे सुंदर असे मुखपृष्ठ करणारे चित्रकार श्री राहुल पगारे तसेच प्रत्येक कवितेला अतिशय देखणी आणि समर्पक अशी दर्जेदार रेखाचित्रे श्री प्रवीण उगले यांनी केली असून काव्यसंग्रहा
Mar 8, 20232 min read
पुन्हा एकदा पेटवा मशाली
19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दत्तपुर (वर्धा) येथे जाऊन सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनेने सारा देश हादरला होता. शेतकऱयांच्या विदारक परिस्थितीचा हा कडेलोट होता. एवढ्या भीषण आत्महत्ये नंतरही सरकारचे डोके ठिकाणा वर आले नाही. आत्महत्या वाढत गेत्या. हा आकडा आज साडे चार लाखाहून जास्त झाला आहे. ना चिरा ना पणती शेतकऱयांच्या आत्महत्या सतत होत आल्या आहेत. 86च्या आधीही झाल्या आहेत. 90 साली सरकारने खुलीकरण (उदारीकरण) स्व
Mar 5, 20232 min read


पुस्तक परिचय - भारत : पासष्ट पोलादी पाने – अर्थात आक्रमणे आणि स्वातंत्र्यसंघर्ष
पुस्तकाबद्दल ‘भारत-आक्रमणे आणि स्वातंत्र्यसंघर्ष’ हा एक ज्ञानपट आहे. यात वेळोवेळी भारतावर झालेली आक्रमणे, नकाशा यासह माहिती आहे. त्याचबरोबर त्या आक्रमणाच्या विरोधात स्वातंत्र्ययोद्ध्यांनी केलेलेे संघर्ष व त्यांना मिळालेले विजय नकाशे व माहितीच्या टिपणासह दाखविलेले आहेत. असे स्वातंत्र्यसंघर्ष प्राचीन काळी चंद्रगुप्त मौर्य, खारवेल, पुष्यमित्र, गौतमीपुत्र सातकर्णी, चंद्रगुप्त विक्रमादित्य, यशोधर्मन यांनी यवन, शक, हूण इत्यादींच्या आक्रमणाविरूद्ध केले. मध्य काळात बप्पा रावळ, धंग चं
Feb 27, 20231 min read
बाईच्या ‘भाईगिरी’चा अचूक वेध
काठियावाड हे गुजरातमधलं एक ठिकाण. तेथील ख्यातनाम वकील, शिक्षणतज्ज्ञ असलेल्या हरजीवनदास काठीयावाडी यांची गंगा ही लाडकी कन्या. गंगाला चित्रपट, नाटक, अभिनयाची आवड. चौदा वर्षाची असताना एका मैत्रिणीकडून मुंबईचं वर्णन ऐकून ती त्यात हरवून गेली. अशातच मुंबईत काही काळ वास्तव्य करून आलेला रमणिकलाल हा तरूण तिच्या वडिलांकडं हिशेबनीस म्हणून कामाला लागला. त्याच्याकडून मुंबईचं वर्णन ऐकून ती त्याच्याकडं आकर्षित झाली. परिणामी गंगानं तिच्या आईचे दागिने, काही रोकड उचलली आणि दोघेही मुंबईला पळून
Feb 24, 20233 min read
अनोख्या रेशीम गाठी: सकारात्मक, क्रांतिकारी कथानक!
लिव्ह इन रिलेशनशिप ही येऊ पाहणारी व्यवस्था अनेकांना न पटणारी आहे. अर्थात त्यांचा विरोध तसा दुर्लक्षित न करता येण्यासारखा आहे कारण जगात आपल्या संस्कृतीला एक आदराचे, वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. परंतु जेव्हा दुर्दैवाने साथीदार सोडून जातो तेव्हा होणारी मानसिक, शारीरिक घुसमट ही ज्यावर एकटे राहण्याची वेळ येते तेच जाणोत. वयाच्या कोणत्याही वळणावर असताना अशाप्रकारे होणारी घुसमट अत्यंत वेदनादायी असते. त्यातही पन्नाशी गाठली असताना, संसार अर्धवट झालेला असताना येणारा एकाकीपणा हा असह्य असाच
Feb 21, 20238 min read
bottom of page
.jpg)




