top of page
राजकीय
तुरूंगातून लढत मिळवला त्रिवेणी विजय
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा आपल्यापैकी अनेकांना ज्ञात आहे. हैदराबाद राज्यातील निजामांच्या सरकारी धोरणांना विरोध करणारे कम्युनिस्ट नेते म्हणजे पेंड्याला राघव. त्यांनी अस्पृशता, महिलांवर होणारे अत्याचार याविरूद्ध आवाज उठवला. तेलंगणातील शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी संघर्ष उभारला. सरकारविरोधी भूमिका घेतली म्हणून हैदराबाद पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांना तुरूंगात डांबले. ते वर्ष होते 1952 चे. त्यावर्षी तिथे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ए
May 2, 20242 min read
ऑपरेशन बिनविरोध
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘400 पार’चा नारा देत असलेल्या भाजपाने मतदानप्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी आणि निकाल लागण्याआधीच पहिला विजय मिळवला आहे. सूरतमधील भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांच्याबाबत ही घटना घडली असून त्यांचा विजय जाहीर करण्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार नाही. त्यामुळे यंदाचा ‘देशातील पहिला विजेता उमेदवार’ म्हणून दलाल यांची नोंद घ्यावी लागेल. त्याचे झाले असे की, येथील काँगे्रसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. प्रदेश काँगे्रसला अंधारात ठेवत
May 1, 20242 min read
मतपत्रिकांवर ओठांची छाप
‘छोरा गंगा किनारे वाला’ अशी ओळख असलेेले ‘बिग बी’ अमिताभ बच्चन हे राजकारणात होते आणि एका अत्यंत प्रतिष्ठेच्या लढाईत अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून दोन लाख मतांनी विजयी झाले होते. ही गोष्ट आहे 1984 सालची. त्यावेळी अमिताभ यांचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले होते आणि ‘सुपरस्टार’ म्हणून त्यांना अफाट लोकप्रियताही मिळाली होती. राजीव गांधी यांच्याशी त्यांची घनिष्ट मैत्री होती. या मैत्रीचा आधार घेत राजीवजींनी त्यांना निवडणूक लढवण्याची गळ घातली. उत्तर भारतात त्यावेळी काँग्रेसचे पानिपत झालेले
Apr 30, 20242 min read
अटलजी आणि निवडणूक
भाजपाला खर्याअर्थी उभारी देण्यात ज्या सभ्य, सुसंस्कृत, अभ्यासू नेत्यांचं नाव घेतलं जातं त्यात अटलबिहारी वाजपेयी सर्वोच्च स्थानी आहेत. थोडीथोडकी नव्हे तर 52 वर्षे ते संसदीय राजकारणात सक्रिय होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस आणि पंडित नेहरू यांचा जादूई करिष्मा होता. त्यामुळे दुसर्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या विरूद्ध निवडणूक लढवणं हे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं होतं. 1957 साली वयाच्या 33व्या वर्षी जनसंघाने त्यांना उत्तर प्रदेशातील बलरामपूर मतदारसंघातून
Apr 29, 20242 min read
'निवडणूक ही शेवटी क्रिकेटची मॅच'
होय, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांचा पराभव व्हावा यासाठी काँग्रेसने जंग जंग पछाडले होते. त्यांच्या या प्रयत्नांना हिंदू महासभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी आंबेडकरांच्या विरुद्ध उमेदवार उभे करत सहकार्य केले होते. त्यामुळे डॉ. आंबेडकर चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांच्या विरोधात त्यांचेच पी.ए. नारायण एस. काजरोळकर हे काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून निवडून आले. काजरोळकर यांचा दूध विक्रीचा व्यवस
Apr 28, 20242 min read
काँग्रेसवालेच सांगताहेत, आम्हाला मत नको!
नुकतंच एक व्यंगचित्र चर्चेत आलं. एका वृत्तवाहिनीवरील राजकीय चर्चेत जाहिरातीसाठीचा ब्रेक होतो. 30 सेकंदाच्या ब्रेकनंतर निवेदक चर्चा सुरू करतो तर त्यातील सहभागी एक नेता म्हणतो की, ‘ब्रेकदरम्यान मी पुढच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्यात आता काही तात्त्विक वाद राहिले नाहीत. त्यांच्या ‘सर्व’ मुद्यांशी मी सहमत आहे.’ सध्याच्या राजकारणातील घडामोडी, पक्षप्रवेश, नाराजी, स्वार्थ हे सगळं पाहता अशी घटना प्रत्यक्षात घडली तरी आश्चर्य वाटू नये. असे जरी असले तर
Apr 27, 20242 min read
मामुली लोक काय बिघडवणार?
स्वर्गीय विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणातलं एक मोठं प्रस्थ. अत्यंत सुसंस्कृत, प्रगल्भ आणि लोकहितदक्ष नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. बाभळगावच्या सरपंचपदापासून आपली कारकिर्द सुरू करणारे विलासराव दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सरदार मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे मंत्री म्हणून काम केले. लोकांच्या सुख-दुःखाची जाण असलेले आणि जनसामान्यांची नाडी अचूकपणे हेरणारे विलासराव 1995 साली लातूरमधून 32 हजार मत
Apr 26, 20242 min read
दोन अन दोन किती?
महाराष्ट्राची धडाडती तोफ अशी ओळख असलेल्या एका युवा नेत्याची पुण्यात सभा होती. त्यांच्या सभांना अलोट गर्दी असायची. व्यासपीठावर ‘सर’ अशी ख्याती असलेले ज्येष्ठ नेते उपस्थित होते. युवा नेत्याने सभेच्या सुरूवातीलाच एक किस्सा सांगितला. तो सांगताना त्यांनी संबंधित प्रत्येक नेत्याच्या आवाजाची, लकबीची हुबेहुब नक्कल केली. ते म्हणाले, ‘‘पुण्यातला एक पत्रकार दिल्लीत गेला. त्याला वाटलं आपण राजधानीच्या शहरात आलोय तर काही नेत्यांच्या मुलाखती घेऊया! तो सर्वप्रथम सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ
Apr 25, 20242 min read
साधा माणूस...
आजकाल कोणी साधा ग्रामपंचायतीचा सदस्य असला तरी त्याचा रूबाब पाहण्यासारखा असतो. गाडी, माडी, कार्यकर्त्यांचा लवाजमा अशा थाटात तो जगत असतो. पुणे जिल्ह्यातील मंचर या गावात मात्र दंतकथा वाटावी असा एक अवलीया राहायचा. तीन वेळा आमदार, खासदार असूनही अविश्वसनीय वाटावा असा त्यांचा साधेपणा. ते आमदार असताना त्यांच्या पत्नी मथुराबाई दुष्काळी कामावर रोजंदारीने जायच्या. गोधड्या शिवून त्या विकायच्या आणि आपला प्रपंच चालवायच्या. किसणराव बाणखेलेअण्णा हे त्यांचं नाव. ते 1989च्या लोकसभा निवडणुकीमध
Apr 24, 20242 min read
इंदिरा गांधी यांची सभा झाली; पण...
शरद पवार यांच्यामुळे बारामती देशात नेहमीच केंद्रस्थानी राहिली आहे. 1980 साली विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार काँग्रेस एसचे उमेदवार होते. त्यांच्याविरूद्ध तिथून मारूतराव चोपडे यांनी काँग्रेस आयच्या वतीने लढत दिली. त्यावेळी शरद पवार बारामतीतून पडतील, असा कयास असल्याने ही निवडणूक देशपातळीवर चर्चेत आली होती. त्यावेळी प्रेमलाकाकी चव्हाण या काँग्रेस आयच्या प्रांतअध्यक्ष होत्या. प्रेमलाकाकी म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई. भाई गुलाम अली जिल्हाध्यक्ष तर किरण गुजर हे बारामती शहराच
Apr 23, 20242 min read
पाणीदार दम
गावात नेत्यांची सभा होती. संध्याकाळी सहाची वेळ असली तरी या नेत्याने दिलेला गुंड प्रवृत्तीचा उमेदवार आणि त्याचे काही कार्यकर्ते उत्साहात तयारी करत होते. तशी गावात या नेत्याविषयी प्रचंड नाराजी होती. निवडणुकीचा अपवाद वगळता नेते कधीही गावात फिरकत नसत. गावातले सगळे प्रश्न 'जैसे थे' होते. या नेत्याचे जे चार कार्यकर्ते होते त्यांचीच मनमानी चालायची. त्यांच्या दहशतीमुळे सगळे गपगार असायचे. यावेळी मात्र गावानं एकत्र येऊन ठरवलं की, काहीही झालं तरी या नेत्याच्या उमेदवाराला मत द्यायचं
Apr 22, 20242 min read


...आणि पवारांना तिकीट मिळाले
शरद पवार 1967 साली सर्वप्रथम वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी उमेदवार ठरवण्याचा आणि तो जाहीर करण्याचा अधिकार काँगेस वर्किंग कमिटीच्या अध्यक्षांचा असायचा. प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी शरद पवार यांना निवडणूक लढवण्याची विचारणा केली. त्यावेळी पवार युवक काँग्रेसचे काम सक्रियपणे करायचे. पवारांची उमेदवारी जाहीर होताच त्यांना बारामतीतून कडाडून विरोध झाला. सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं, "आम्ही 12 उमेदवार इथून इच्छुक आहोत. आमच्यापैकी कुणालाही उमेद
Apr 21, 20242 min read


‘डमी’ उमेदवारांमुळे मिळाला विजय
ही गोष्ट आहे मराठवाड्यातील एका दुर्गम भागातील. तिथे एक ठेकेदार रस्त्यांची कामे करत होते. अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायातून त्यांनी त्यांची उद्यमशीलता दाखवून दिली होती. नेकीने व्यवहार करताना आपण भले आणि आपले काम भले असा त्यांचा खाक्या! सामाजिक, राजकीय कार्याशी त्यांचा दूरान्वयानेही संबंध नव्हता. त्यांचे वडील मात्र सामाजिक कार्यात अग्रेसर होते. सामान्य माणूस त्यांच्या केंद्रस्थानी असायचा. त्यावेळी पदवीधर शिक्षक मतदारसंघातून त्यांच्या मुलाने निवडणूक लढवावी असा त्यांचा आग्रह होता.
Apr 20, 20242 min read


निवडणुका दरवर्षी का होत नाहीत? - किस्सा ए इलेक्शन - घनश्याम पाटील
पुण्याचे माजी महापौर आणि शरद पवार यांचे निष्ठावान अनुयायी अंकुश काकडे यांचे ‘हॅशटॅग पुणे’ हे पुस्तक मध्यंतरी उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केले. या पुस्तकात त्यांनी पुण्याच्या सामाजिक, राजकीय संस्कृतीचा वेध घेतलाय. त्यात त्यांनी निवडणूक प्रचाराचे काही इरसाल किस्से सांगितले आहेत. काकडे लिहितात, मनसे आमदार रमेश वांजळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होती. त्याचा निरीक्षक म्हणून मी हिंगणे परिसरात प्रचार करत होतो. सायंकाळी साडेसहाची वेळ होती
Apr 17, 20242 min read


स्थानिक विरुद्ध उपरा : किस्सा-ए-इलेक्शन - घनश्याम पाटील
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार राम सातपुते यांना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी सोलापूरच्या संस्कृतीविषयी लिहून सातपुते हे बाहेरचे म्हणजे उपरे असल्याचे सांगितले. त्यावर सातपुते यांनीही त्यांना प्रतिउत्तर देत आपण सोलापूर जिल्ह्यातीलच माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्याचे आणि सोलापूरशी आपला नियमित संपर्क असल्याचे सांगितले. मुख्य म्हणजे एका माजी मुख्यमंत्र्याची मुलगी आणि एका ऊसतोड क
Apr 16, 20242 min read


फाईल आणि दादूमियाँ : किस्सा-ए-इलेक्शन - घनश्याम पाटील
दादूमियाँ उर्फ दामोदर विष्णू नेने हे बडोद्यातील एक मोठं प्रस्थ. स्तंभलेखक म्हणून त्यांची ओळख आहे. इंदिरा गांधी यांचं पहिलं चरित्र त्यांनी लिहिलं. नरेंद्र मोदी दादूमियाँच्या घरी येणार्या पाहुण्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवक म्हणून काम करायचे. मध्यंतरी ते पुण्यात एमआयटीने आयोजित केलेल्या ऋषिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. नव्वदीच्या पुढे वय असूनही त्यांच्या चेहर्यावरील विद्वत्तेचं तेज विलक्षण आहे. त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यावेळी ते ‘माणूस’ साप्ताहिकात ‘दिल्लीतला महाराष्ट्
Apr 15, 20242 min read


उद्योजकांना वापरा, कामे सामान्यांची करा! | किस्सा ए इलेक्शन - घनश्याम पाटील
बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ हे पुण्यातून काँग्रेसतर्फे खासदार म्हणून निवडून जायचे. ते केंद्रीय संरक्षण उत्पादन मंत्री होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली. कै. न. वि. उर्फ काकासाहेब गाडगीळ यांचे ते चिरंजीव. काकासाहेब आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चांगली मैत्री होती. एकदा बॅरिस्टर गाडगीळ दिल्लीला गेले असता डॉ. आंबेडकरांना भेटले. त्यावेळचा किस्सा ते रंगवून सांगायचे. त्यांच्या चेहर्यावर किस्से सांगताना कायम एक मिश्किल हास्य असायचं. बाबासाहेबांनी त्या
Apr 13, 20242 min read


वाचन ही ‘संस्कृती' आहे काय? - घनश्याम पाटील
भारतीय भाषात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी अशा श्रमिकांवर बरेच साहित्य लिहिले गेले. असे साहित्य ज्यांच्यावर लिहिले गेले त्यांना त्या साहित्याचा कधी काही फायदा झाला नाही, असे मानणारा एक मोठा मतप्रवाह आहे. वाचनाने क्रांती झाली असती तर गीता, कुरान, बायबल वाचून लोक सुधारले नसते काय? रामायण-महाभारत अशा महाग्रंथातून त्यांनी काही बोध घेतला नसता काय? असाही प्रश्न उपस्थित केला जातो. बरं, ज्यांचं वाचन भरपूर आहे त्यांचा खूप विकास झाला असे तरी काही चित्र आहे का? जे आयुष्यभर भरपूर वाचतात ते मन
Apr 1, 20244 min read
चौथं पोट - ह. मो. मराठे
राजकारण म्हणजे पैसे खाण्याचा धंदाच झालाय. भारतीय राज्यव्यवस्थेत तर राजकारणाइतके बदनाम दुसरे कुठलेही क्षेत्र नाही. महाराष्ट्रातील विख्यात लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार ह. मो. मराठे यांनी एका व्यंगकथेच्या माध्यमातून समकालीन राजकीय व्यवस्थेवर केलेले भाष्य - विजयबापूंनी बाहेर जाण्याचे कपडे घातले आणि ते मोठ्या आरशासमोर उभे राहिले. त्यांनी आपलं भारदस्त रूप आरशात पाहिलं. थुलथलीत देह, चेहराही तसाच. गोरा आणि गुबगुबीत. सतत एसीतच वावरण्याच्या सवयीचा परिणाम त्यांच्यावर चांगलाच दिसून येत होता.
Sep 18, 202313 min read
विषमतेचा पाया समता कशी आणणार?
भारतात राजकीय इतिहास लेखनाचीच विशेष परंपरा नव्हती, तर सामाजिक इतिहास कोठून मिळणार? जो इतिहास उपलब्ध आहे तो बव्हंशी मिथ्थककथा, कालविपर्यासाने भरलेला आणि त्रोटक स्वरुपाचा आहे. अनेकदा विविध काळात झालेल्या राजा-साहित्यिकांच्या नावातही साधर्म्य असल्याने सर्वांनाच एकच गृहीत धरत जो घोळ घातला गेला आहे त्याला तर तोड नाही. आदि शंकराचार्य नेमके कोणत्या शतकात झाले, याबाबतचा घोळ मिटलेला नाही. विक्रमादित्य नेमका कोण, हे आजही नीट समजलेले नाही. ते जाऊद्या, आद्य साम्राज्य स्थापन करणारा चंद्र
Mar 8, 202313 min read
bottom of page
.jpg)




