top of page
विशेष लेख


इतिहास संशोधनातील 'गजानन' : The 'Gajanan' of Indian History - Ghanshyam Patil
चं द्रपूरचे संशोधक प्रा. प्रशांत आर्वे पुण्यात आले होते. ते म्हणाले, “दादा, गेल्या तीन वर्षांपासून गभांना भेटायचा प्रयत्न करतोय. माझं त्यांच्याकडे काहीही काम नाही. या ज्ञानमहर्षीच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी फक्त दोन मिनिटांचा त्यांचा वेळ हवाय. काहीही करून आमची भेट घडवून आणा.” आर्वेंचे हे कळकळीचे बोलणे ऐकून मी पुण्याचे माजी खासदार आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीपदादा रावत यांना फोन केला. त्यांना म्हणालो, "चंद्रपूरसारख्या भागातील एका संशोधकानं मला मागून मागून का
Jan 9, 20228 min read
सुभाष ते नेताजी : एक साहसी गरूडझेप
- श्रीराम पचिंद्रे 7350009433 ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 202 1 ओडिशाची राजधानी कटक येथे नामवंत वकील जानकीनाथ बोस वकिली करायचे. जानकीनाथांची कोलकत्त्यात मोठी वास्तू होती. ते कटकहून कोलकत्त्याच्या उच्च न्यायालयात वारंवार यायचे. त्या निमित्तानं घरी येऊन मुलांशी संवाद साधता यायचा. त्यांचे सतीश हे पहिले पुत्र. शरदचंद्र हे दुसरे पुत्र. ते इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होऊन आले होते. ते उच्च न्यायालयात उत्तम प्रकारे वकिली करायचे. सुभाष हे जानकीनाथांचे आठवे पुत्र. ते बी. ए. झाले होत
Dec 21, 202114 min read
हेच खरे जगज्जेते...
- विनोद श्रा. पंचभाई 9923797725 ‘साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2021’ जगातील सर्वात मोठा क्रीडा स्पर्धांचा सोहळा असं ऑलिंपिक स्पर्धेचं वर्णन करण्यात येतं. यावेळी मात्र कधी नव्हे इतकी आव्हानात्मक परिस्थिती या सोहळ्यावर उद्भवली होती. त्याला कारणही तसंच होतं, अख्ख्या जगाला हादरवून सोडणारी कोरोना विषाणूची महाभयंकर साथ! त्यामुळे ऑलिंपिक स्पर्धांच्या इतिहासात प्रथमच ही स्पर्धा जवळपास एक वर्ष लांबणीवर पडली. 2020 साली होणारी ऑलिंपिक स्पर्धा प्रत्यक्षात 2021 मध्ये पार पडली! यावेळी ऑलिं
Dec 18, 202119 min read
प्लॅस्टिक भरपूर वापरा, थर्माकोल भरपूर वापरा
देवेंद्र रमेश राक्षे ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021 ‘प्लॅस्टिक, थर्माकोल शाप नाहीत, ते आधुनिक विज्ञानाचे वरदान आहेत’, ‘प्लॅस्टिक भरपूर वापरा, थर्माकोल भरपूर वापरा’ असे सांगणारा जगातला मी पहिला ‘वेडा पीर’ ठरू द्या! पण अतिशय गांभीर्याने मी हे वाक्य लिहीत आहे आणि हे वाक्य लिहिण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी अतिशय कष्ट, मेहनत आणि प्रशिक्षण देखील घेतले आहे. ‘साधन’ या संस्थेतील माझे गुरु आणि शास्त्रज्ञ डॉ. जयंतराव गाडगीळ यांच्या हाताखालील माझी साधना यांना स्मरून मी
Dec 17, 202113 min read
याजसाठी केला होता अट्टहास
- डॉ. रामचंद्र देखणे 9503263046 ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021 आपल्या भूतकाळात जरा अंतर्मुख होऊन डोकावले की घडलेल्या प्रसंगांमधून आपल्याच जीवनातील एका जाणिवेची सृजनता सहजपणे उभी राहात असल्याचे जाणवते. त्यातील काही प्रसंग हे प्रेरणा देणारे असतात, काही स्वाभिमान जागवणारे, काही आवेश आणि उत्साह निर्माण करणारे, काही दिशादर्शी, काही कृतज्ञतेचे पथदर्शी, शांती, सुचित्व, आर्जव, स्थैर्य आणि अनहंकाराचे अनुदर्शन घडविणारे तर काही अहंकार जागविणारे, आत्मविश्वास गमावणारे, भविष्याच्या
Dec 17, 20219 min read
गीता धर्मग्रंथ नाही!
- कमलाकर देसले 9421507434 साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2021 ॥ 1 ॥ श्रीमद्भगवतगीता हा ग्रंथ भगव्या कपड्यात गुंडाळण्याचा धार्मिक किंवा आध्यात्मिक ग्रंथ आहे, असा सर्वसाधारण समज समाजात आहे. अर्थातच हा समज ज्ञानेश्वरीच्या बाबतीत आणि एकूणच संतसाहित्याच्या बाबतीतही आहे. हे भारतीय समाजाचे भयंकर दुर्दैव आहे. त्यामुळे हे ग्रंथ वृद्धांनी किंवा प्रौढांनी वाचण्याचे ग्रंथ आहेत अशी एक चुकीची मान्यता समाजात रूढ झाली आहे. ते ही अतिशय चुकीचे आहे. गीता हा ग्रंथ समुपदेशनाची नितांत गरज असणार्य
Dec 16, 20219 min read
रक्तातले करारी आता इमान शोधा!
- जयेंद्र साळगावकर, मुंबई 9819303889 मराठीत लोकप्रिय झालेल्या टोपीवाल्याच्या गोष्टीतील टोपीवाल्याचा मुलगा टोपी विकण्याचा व्यवसाय करू लागतो. एका झाडाखाली तो विश्रांतीला बसतो व त्याचा डोळा लागतो. झाडावरुन माकडं खाली उतरतात आणि टोपीवाल्याच्या पेटीतील टोप्या पटापट घेऊन झाडावर जाऊन बसतात. टोपीवाला जागा होतो. त्याला आपल्या वडिलांच्या कथेतील प्रसंग आठवतो व तो आपल्या डोक्यावरील टोपी खाली टाकतो! पण माकडं आपल्या डोक्यावरील टोपी खाली टाकत नाहीत. ते म्हणतात, ‘‘एकदा आम्ही तुझ्या वडिलांसो
Dec 13, 20219 min read
यांची पोटं तरी केवढी?
- प्रवीण दवणे सुप्रसिद्ध लेखक, ठाणे 9820389414 ‘साहित्य चपराक दिवाळी अंक 2021’ राजाला शिकार कुठली, यापेक्षा शिकार करण्यात मजा येते. तो त्याचा खेळ असतो. तो पाठलाग! ते काटेकुटं चुकवणं, टपून नेम साधणं, मातीनं अंग माखणं याचीच नशा असते राजाला! तसा हा आमचा खेळ! घोटाळा करणं, लपवणं, हेलिकॉप्टरनं धावाधाव! त्या आमच्या नावाच्या ब्रेकिंग न्यूज! आम्हाला पैशात इंटरेस्ट नाय! मोप जमिनी, बागा, कारखाने, बार, गुरढोरं, बंगले-माड्या, सात हजार पिढ्यांना पुरेल एवढी इस्टेट आमची! पण आपण असं जनतेला चक
Nov 21, 20217 min read
श्रीमंत योगी
उमेश सणस शिवचरित्राचे व्यासंगी अभ्यासक 9822639110 ‘साहित्य चपराक दिवाळी अंक 2021’ छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकानं मानवतेला दिलेलं एक वरदान आहे. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा गौरवशाली आहे. माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणूस घडवतो हा नेहमीचा वादाचा विषय राहिलेला आहे. मात्र छत्रपती शिवाजीमहाराज या माणसानं जो गौरवशाली इतिहास घडवला तो इतका वैभवी आहे की त्या इतिहासाकडं बघता-बघता नव्यानं माणसं घडत राहिली आणि घडलेल्या माणसांनी पुन्हा नवा इतिहास घडवला. जगाच्या इतिहासात असा
Nov 18, 202119 min read
शिवशाहीर
असं म्हणतात की शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानंच गावा! असा पोवाडा गाणारे, छत्रपती शिवाजीमहाराजांचं चरित्र जगाला सांगणारे एक चांगले शिवचरित्रकार आम्हाला मिळाले, ते म्हणजे बळवंत मोरेश्वर पुरंदरे! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या नावानं विख्यात असलेल्या या शाहीरानं वयाची शंभरी गाठली आणि अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या प्रत्येक श्वासात छत्रपती शिवाजीमहाराज होते. त्यांच्या हृदयातही महाराजच आणि महाराजांचा इतिहासच होता, याबद्दल कुणाच्या मनात दुमत असण्याचं कारण नाही. ज्या काळात करमणुकीची क
Nov 16, 20218 min read
राजकीय पक्षांच्या ‘टोळ्या’?
संसदीय लोकशाहीला सुरूवात होऊन फार काळ उलटला नसल्याने आपल्याकडे राजकीय पक्षांचा इतिहास तसा जुना नाही. राजेशाही संपली, सरंजामशाही संपली, संस्थाने खालसा झाली आणि लोकांच्या कल्याणासाठी त्या त्या ध्येयवादी गटाने पुढाकार घेत आपापल्या विचारधारांचे गट स्थापन केले. त्यांना राजकीय पक्षांचे स्वरूप आले. लोकांना त्यांचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार प्राप्त झाला. किमान तसा भास निर्माण करण्यात आला. त्यातून आपल्या लोकशाहीचा प्रवास सुरू झाला. पूर्वीच्या काळातल्या टोळ्या नष्ट झाल्या आणि विचारस
Aug 31, 20214 min read
कॅलिडोस्कोप - हायव्होल्टेज ड्राम्यांचा!
केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर येथून अटक केली आणि चर्चा सुरू झाली ती हायव्होल्टेज ड्राम्याची! एखादी गोष्ट अनपेक्षितपणे घडणे आणि त्याभोवती सगळे गरगरा फिरणे म्हणजे हायव्होल्टेज! विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील बरेचसे हायव्होल्टेज ड्रामे हे वैयक्तिक स्वार्थासाठी झालेले आहेत. त्यातून महाराष्ट्राचा काही फार मोठा फायदा झाला नाही. त्यामुळे ‘हायव्होल्टेज ड्रामा’ फक्त एक आणि एकच असेल तर तो म्हणजे अफजलखानाचा वध! समोरच्या माणसाला भ
Aug 29, 20214 min read
महाराष्ट्रासमोरील मोठे आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व असलं तरी त्यांच्याकडे गांभीर्यानं पहाण्याचा द़ृष्टीकोन कमी होतोय. 2019च्या निवडणुकीत हेच राज ठाकरे ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हा थापाड्या माणूस आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका’ असे सांगत होते. त्यांनी लोकसभेला स्वतःचा एकही उमेदवार उभा केलेला नसताना लाखांच्या जाहीर सभा घेणं आणि ‘भाजपच्या उमेदवारांना मते देऊ नका,’ असं
Aug 24, 20214 min read
पोलीस यंत्रणेचा गैरवापर थांबायला हवा
पोलीस हा सामान्य नागरिक आणि कायदा व सुव्यवस्थेच्या मध्ये उभा असलेला दुवा असतो. हा दुवा जेवढा सक्षम आणि कार्यक्षम पद्धतीने काम करेल तितकं सामाजिक स्वास्थ्य कायम रहायला मदत होईल. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी तशी पोलिसांची संख्या कमी होती. पूर्ण पोलीस भरती केली जात नव्हती. त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण असायचा. आजही तीच पद्धत आहे. भारतात राजकारण्यांच्या प्रभावाखाली पोलिसांनी सतत काम केलंय. त्यामुळं त्यांना स्वायत्तता आणि स्वातंत्र्य मिळालंय असं म्हणता येत नाही. सुमार बुद्धिच्या
Aug 17, 20214 min read
उमद्या मराठवाड्याची नवी उमेद
मराठवाडा हे महाराष्ट्राचं हृदय आहे. आपल्या राज्यात जे काही चांगलं आहे त्यातलं सर्वोत्कृष्ट मराठवाड्यात आहे. महाराष्ट्रातलं जागतिक कीर्तिचं पर्यटनस्थळ कोणतं असेल तर अजिंठा-वेरूळच्या लेण्या! जगभरातून महाराष्ट्रात येणारे पर्यटक या लेण्या हमखास बघतात. महाराष्ट्रात या लेण्याइतकं बघण्यासारखं आकर्षक दुसरं काही नाही. महाराष्ट्राची कुलदेवता असलेली आई तुळजाभवानी मराठवाड्यात आहे. महाराष्ट्राला वंदनीय असणार्या छत्रपती शिवाजीमहाराजांचं मुळचं भोसले घराणं मराठवाड्यातलं वेरूळचं आहे. महाराज
Aug 5, 20216 min read
पुण्याचा विस्तार वैभवशाली ठरावा
भारताची आर्थिक राजधानी मुंबई असली तरी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही पुणेच आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत आता नव्याने तेवीस गावांचा समावेश केल्याने भौगोलिकदृष्ट्या पुणे ही सर्वात मोठी महापालिका झाली आहे. पुणे शहर कोणाचे? असा प्रश्न केला तर एकच उत्तर येते ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचे. पुणे लुटून, जाळून मुरार जगदेवानं कसब्यावर गाढवाचा नांगर फिरवला, पुणं बेचिराख केलं त्या पुण्यात छत्रपती शिवरायांनी जिजाऊसाहेबांच्या समोर सोन्याचा नांगर फिरवला. तेव्हापासून पुणं हे अत्यंत स
Aug 1, 20214 min read
इतिहास जगणारा माणूस
इतिहासाच्या अभ्यासामुळं माणसं वेडी होतात आणि वेडी झालेली माणसं इतिहास घडवतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासानं महाराष्ट्राला गेली साडेतीनशे वर्षे गारूड घातलेलं आहे आणि हा इतिहास गेली शंभर वर्षे जगणार्या माणसाचं नाव म्हणजे श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे! शिवचरित्र हे कायम मराठी माणसाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलं आहे. गेल्या आठ दशकात महाराष्ट्रात जर आठ पिढ्या बदलल्या असतील तर प्रत्येक पिढीसमोर हे शिवचरित्र मांडण्याचं काम बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेलं आहे. आजही
Jul 29, 20214 min read
दादा वाक्यं प्रमाणम्
यशवंतराव चव्हाण यांनी एकदा सांगितलं होतं की, ‘‘आमच्या पुढार्यांना ‘नाही’ म्हणायची सवय नाही आणि आमच्या अधिकार्यांना ‘हो’ म्हणता येत नाही. सामान्य माणसाला त्याचं काम होईल असं सांगणारे अधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्याचे जे काम करणे शक्य होणार नाही त्यांना स्पष्टपणे नाही म्हणणारे नेते मला हवेेत.’’ यशवंतरावांना त्यांच्या हयातीत असे फार कमी पुढारी आणि थोडेच अधिकारी भेटले. आजच्या काळातही तीच परिस्थिती आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पंचवीस-तीस वर्षे अशाच पद्धतीने काम ह
Jul 22, 202111 min read
लाख बोलक्याहूनि थोर...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की, ‘लाख बोलक्याहूनि थोर, एकचि माझा कर्तबगार!’ असं असूनही आपल्याकडं बोलत सुटणार्यांची कमतरता नाही. असं म्हणतात की, बाळाच्या जन्मानंतर त्याला बोलायला शिकायला काही दिवस जातात मात्र ‘काय बोलावं’ हे कळण्यासाठी सगळं आयुष्य निघून जातं. सध्या तरी समाजमाध्यमांमुळं प्रत्येक गोष्टीत माझी मतं मांडायलाच हवीत, कुणाला तरी समर्थन द्यायलाच हवं आणि कुणाला तरी विरोध करायलाच हवा अशी एक अहमहमिका लागलेली असते. यातून साध्य काय होणार याचाही कोणी विचार करत ना
Jul 20, 20214 min read
वाचाळवीरांची कुचकामी फौज
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस आणि काँग्रेस अशा आघाडीचं सरकार आहे. या तीन पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केल्याने त्यांना महाआघाडी सरकार म्हणतात. या महाआघाडीत काँग्रेस पक्ष नेमका कुठंय हे समजून येत नाही. काँग्रेसचे मंत्री नेमक्या कोणत्या खात्याचे आहेत आणि काय काम करताहेत, त्यांची कामगिरी काय? हेही समजून येत नाही. राष्ट्रवादीचा गृहमंत्री, त्यांचाच अर्थमंत्री सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या खात्यावर बोलताना दिसतो. शिवसेनेचा परिवहन मंत्री एसटी बस बंद असतानाही त्याचं खातं कसं स
Jul 13, 20214 min read
bottom of page
.jpg)




