top of page
विशेष लेख
माझं बहुमूल्य मत वाया गेलं
ज्या प्रमुख उमेदवाराच्या भरवशावर मी राज्याच्या विधानसभेसाठी मतदान केलं होतं ते महत्त्वाचं मत वाया गेलं. आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता कुठे उभे आहोत आपण? मला अक्षरशः आपला महाराष्ट्र एका अनाथ मुलासारखा भासायला लागला आहे. केंद्र सरकार ज्या पक्षाच्या हातात आहे त्यांची सत्ता इथे नाही म्हणून ते आपल्याकडे लक्ष देत नाही, असा याचा अर्थ होतो का? ज्यांच्या हातात ती गेली आहे ते फक्त आपल्या खुर्चीसाठी आजच्या कठीण परिस्थितीत ठाम निर्णय घेऊ शकत नाहीत? आज जनतेला काय काय हाल सोसावे ला
May 13, 20212 min read
ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे
लेखक, पत्रकारांवर हल्ले करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे! एखाद्या व्यक्तिला एखाद्याच्या मतांबद्दल आपत्ती किंवा मतमतांतरे असतील तर त्याने त्याच माध्यमातून आपली मते व्यक्त करावीत. कारण दोन विद्वान जेव्हा वाद घालतात तेव्हा त्यातून येणारे परिणाम हे कायमच सुखद असतात. मागील आठवड्यात ‘चपराक प्रकाशन’चे संस्थापक संपादक घनश्याम पाटील यांनी आपल्या ब्लॉगवरून लिहिलेल्या लेखामुळे बरेच वादंग माजले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गेल्या 15 वर्षांच्या राजकीय कारकि
Apr 17, 20213 min read
भ्रमिष्टपणा की एजंटगिरी?
‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते असं सांगितलं जातं. आजवर त्यांनी जी विधानं केली ती पाहता या माणसाच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या जगण्याचा काही संबंध आहे की नाही? असा प्रश्न कुणालाही पडल्यावाचून राहणार नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता, अमूक बागेतला आंबा खाल्ला तर मुलगाच होतो, जो जितका जास्त शिकलेला तो तितका मोठा गांडू, कोरोना हा जगायला लायक नसलेल्या लोकांनाच होतो, असा
Apr 17, 20216 min read
चिरंतनाची ओढ असणारा कवी
स्वतःला प्रतिभासंपन्न म्हणवून घेणार्या काही कवींचे कवितेशी असलेले नाते फक्त शब्दांपुरतेच असते पण ज्यांच्या धमन्याधमन्यातून फक्त कविता आणि कविताच वाहत होती असे अपवाद्भूत कवी म्हणून सुधीर मोघे यांचा उल्लेख करावा लागेल. मोघे कवितेत रमले पण इतर प्रांतातही त्यांची मुशाफिरी चालूच राहिली. कवितेबरोबरच पटकथा, संवाद लेखन, संगीत दिग्दर्शन, निवेदन या क्षेत्रांमध्येही ते लीलया वावरले. प्रत्येक कवीच्या लेखणीतून प्रकटणारी कविताही त्या कवीच्या प्रतिभेची साक्ष असते. नुसती अलौकिक प्रतिभा आ
Apr 15, 20213 min read
राज ठाकरे यांची सूचना स्वागतार्ह
महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटींच्या दरम्यान आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शहरीकरण झालंय. आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आपल्याकडं आहे जी भारताची आर्थिक राजधानी आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती यासारख्या विशाल महानगरपालिका महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील चाळीस टक्केपेक्षा अधिक भागाचं शहरीकरण झालेलं आहे. अशा परिस्थितीत सोशल डिस्टंसिंग ठेऊन काम करणं महाराष्ट्रात शक्य होत नाही. भारतभरातून महाराष्ट्रात लोक उद्योगधंद्यासाठी आणि रोजगारासाठ
Apr 14, 20213 min read
आंबेडकरांच्या विचारविश्वातील स्त्री
- प्रा. मिलिंद जोशी कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे 9850270823 1890 साली महात्मा फुले कालवश झाले. एक क्रांतिसूर्य मावळला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने एक ज्ञानसूर्य रूपाला आला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र बाबासाहेबांनी दलित समाजाला दिला आणि या विचाराने आचरण करणार्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आले. बाबासाहेब म्हणत, ‘‘शिक्षण म्हणजे बहुजन समाज, दलित आणि स्त्रियांच्या मुक्तीलढ्याचे पहिले पाऊल आहे. समाजक्रांतीची तयारी म्हणजे शिक्षण. अन्यायावि
Apr 14, 20212 min read
निर्वाण
कथाकार गदिमांचा इतका सुंदर परिचय दिनकर जोशी यांनी करून दिल्यानंतर खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी गदिमांची एक कथा पुनर्प्रकाशित करीत आहोत. मूळ कथा असल्याने यातील भाषा आणि व्याकरण अर्थातच त्यांच्या त्यावेळच्या कथेतल्याप्रमाणे आहे. आजच्या कट्टरतावादाच्या काळात ही कथा वाचकांना एक वेगळा विचार देऊन जाईल. - संपादक मासिक साहित्य चपराक, एप्रिल 2021 महाराष्ट्रीय खेड्यांतून पंचायती स्थापन झाल्या. कुलकर्ण्यांची दप्तरें उपरे तलाठी वागवूं लागले. पाटीलक्या चोराहातीं गेल्या. रामोशांची नायकीचीं व
Apr 13, 202114 min read
कल्पतरू आण्णा
मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात बसलो होतो. पीएच.डी. प्रबंधलेखनाचे काम दररोज नित्यनेमाने करत होतो. त्याकरिता लागणारे संदर्भ गोळा करून ते वाचून काढत होतो. त्यांचा आधार घेत-घेत प्रबंधलेखनाला गती देत होतो. त्या दिवशी सकाळी सहा वाजता उठून ठीक सात वाजता जयकर ग्रंथालयाच्या वाचनकक्षासमोर रांगेत उभा राहिलो. ग्रंथालयाचा वाचनकक्ष उघडण्यापूर्वी रांगेत उभे राहणे, क्रमाक्रमाने आपली नोंद करून वाचन कक्षात प्रवेश करणे, आपली जागा पकडणे व तेथे दिवसभर लेखन-वाचन करणे हा म
Mar 27, 202113 min read
आर्थिक साक्षरता
उत्पन्नाचे दोन प्रकार असतात. हे उत्पन्न वापरायचे काही निकष आहेत. पैसे हाताळण्याच्या पण पद्धती आहेत. जो माणूस पैशाकरता काम करत असताना, हळूहळू त्यालाच आपला गुलाम बनवायला शिकतो, कालांतराने त्याच्या जीवनात अशी वेळ येते की, आता त्याच्याकरता फक्त पैसाच काम करुन दर महिन्याला त्याला उत्पन्न आणून देतो. तो स्वतः आता पैशाकरता काम करायचं बंद करतो. आपले आयुष्य मस्त जगत राहतो. असा माणूस पूर्णपणे आर्थिक साक्षर झाला असे समजण्यास हरकत नाही. चला मग आता आर्थिक साक्षर होण्यासाठी कसे वागायचे किं
Mar 26, 20214 min read
गदिमांच्या कथा
मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी झाली. फारसे कार्यक्रम झाले नाहीत. ‘नाव गदिमांचे आणि कार्यक्रम स्वतःचे’ असे काही झाले. मराठवाडा साहित्य परिषदेने त्यांच्या साहित्यावर एक चर्चासत्र घेतले. चित्रपट व्यवसायात हयात घालविलेले माडगूळकर त्यांच्या चित्रपट गीताने ओळखले जातात. गदिमा त्यांच्या बालगीतांनी, चित्रपटातील भावगीतांनी आणि विशेष म्हणजे गीतरामायणामुळे लोकांसमोर आहेत! पण या लेखात आपण कथाकार माडगूळकरांचा परिचय करून घेणार आहोत, जो महाराष्ट्राला फारच कमी आहे
Mar 25, 202110 min read
टाळता येण्यासारखं बरंच काही...
प्रसंग पहिला... नेहमीचाच वर्दळीचा चौक. "अहो काका, मी कधीचा हाॅर्न वाजवतोय... तुम्हाला थोडी साईड देता येत नाही का? मला डावीकडे वळायचं आहे!" "अरे बाबा, थोडा धीर धर जरा... सिग्नल सुटला की एका मिनिटात रस्ता मोकळा होणारच आहे.. " "कुठं सिग्नल सुटायची वाट बघता काका, या चौकात कधीही पोलीस मामा नसतात... चला जाऊ द्या मला, व्हा बाजूला!" "पोलीस मामा नाही म्हणून वाहतुकीचे नियम आपण धाब्यावर बसवायचे का? थांब जरा." दोघांपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नव्हते. तेवढ्यात सिग्नल सुटला आणि जण
Mar 10, 20214 min read
भय इथले संपत नाही...
जगात ज्या महामारीने मागील वर्षी सर्व ठप्प पडले होते. कोविड १९ हा रोग पूर्णपणे संपला असे म्हणता येणार नाही. आज जवळपास वर्ष होईल पुन्हा सरकारने डोके वर काढले आहे. कोविड १९ आजरावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे हे आज आपल्याला बघण्यास मिळत आहे. विलीगिकरण करून घरी देखील आजारावर नियंत्रण मिळवता येते. देशात लसीकरण सुरु केले आहे. लसीकरणाचा वेग वाढवणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रात सध्या पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे परंतु तो एकूण टक्केवारीमध्ये बघितले तर फार कमी दिसतात. सरकारने आपले प्र
Mar 8, 20214 min read
मन फुलपाखरू
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असंख्य विचार आपल्या मनात येत असतात. एका अभ्यासकाने या विचारांची संख्या मोजण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या असं लक्षात आलं की ही संख्या दिवसागणिक सत्तर-पंचाहत्तर हजार वगैरे आहे. आश्चर्य वाटलं ना! आपण आपल्या कामात व्यवसायात इतके मग्न असतो की या विचारांना झुरळासारखं झटकून आपण न कळत पुढे पुढे जात राहतो आणि ते योग्यही आहे. आपलं मन फुलपाखरासारखं आहे. या फुलावरून त्या फुलावर जसं फुलपाखरू सहजगत्या आणि चपलतेनं फेरफटका मारत असतं तसंच काहीसं मनाचं आ
Mar 1, 20214 min read
आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद
आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. निरनिराळ्या भाषा आणि संस्कृतींचा सुंदर मिलाफ आपल्या देशातील अनेक राज्यात बघायला मिळतो. असंख्य थोर संत महंतांची परंपरा आपल्याला लाभल्यामुळे लौकिकार्थाने भारतभूमी पावन झाली आहे! अनेक शूरवीर, लढवय्ये, राजे महाराजे यांच्या पराक्रमामुळे जगभरात आपल्या देशाची ख्याती पसरली आहे. कलिंगाच्या युध्दात भयंकर रक्तपात आणि प्राणहानी झाल्यानंतर पश्चात्तापदग्ध झालेला व नंतर शांतीसाठी बौध्द धर्माचा प्रसार करणारा बलशाली सम्राट अशोक आपल्या देशात होऊन गेल्याचं
Feb 17, 202116 min read
नवीन कृषी कायदे आणि संभ्रम...!
देशातील केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात तीन नवीन कायदे आणलेत आहेत जे आज वादाचा मुद्दा ठरले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोपाच्या फैरी झडत आहेत. तर अनेक शेतकरी आज रस्त्यावर उतरून आंदोलन करत या विधेयकांचा विरोध करत आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये या कायद्यांचा जोरदार विरोध केला जात असून दक्षिणेत कर्नाटकमध्येही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. हे कायदे शेतकऱ्याला जाचक आहेत आहेत असे विरोधकांचे म्हणणे आहे तर देशांतर्गत बाजारपेठेत एक स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्याला आपला माल दे
Feb 7, 20215 min read
नेताजी सुभाषचंद्र बोस ... अद्वितीय स्वातंत्र्यसेनानी
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोर महापुरुषांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेतली आणि अगदी निकराने लढा देत भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारत भूमीला लाभलेले अनमोल नररत्न होते. त्यांचं वक्तृत्व आणि विचार इतके प्रभावी होते की समोरची साधारण व्यक्ती आपसूकच त्यांच्याशी आणि त्यानंतर स्वातंत्र्यलढ्याशी जोडली जायची! त्याकाळी सुभाषबाबूंनी केलेलं कार्य आजही प्रत्येक तरुणाला प्रेरण
Jan 23, 20217 min read
मैत्र मैत्री आणि मैत्रेय अर्थात दोस्ताना
आम्ही तीन मित्र जवळजवळ तीस वर्षांनी पुण्यात भेटलो. तिघांचे शिक्षण सोलापूरला शाळा व कॉलेज असं एकत्र झालं. शाळेमध्ये आणखी इतरही काही मित्र होते. एक दीपक नावाचा मित्र शाळेत बरोबर होता. आम्हा दोघांच्याही फॅमिली मोठया होत्या. हा मित्र लक्षात राहण्याचे कारण म्हणजे तो मला सिनेमाच्या गोष्टी सांगत असे. गोष्टी इतक्या रंगवून सांगत असे की 'सिनेमा' पाहिल्यासारखे वाटत असे! नववी, दहावी आणि अकरावी अशी तीन वर्षे मी सोलापूर येथील 'हरिभाई देवकरण प्रशाले' त होतो. तेव्हा अनेक मुलांच्या बरोबर हा
Jan 20, 20217 min read
आईचं पत्र हरवलं!
माझ्या आईचं पत्र हरवलं! --------------------------------- 'माझ्या आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं' असा एक खेळ आम्ही लहानपणी खेळत होतो. टी व्ही आणि मोबाईल नसलेल्या त्या काळात मैदानी खेळांना प्राधान्य असायचं. क्वचितच आम्ही मुलं घरात असायचो! आंधळी कोशिंबीर, ऊन सावली, डोंगर का पाणी, डबा ऐसपैस, हुतुतू, आट्यापाट्या, गोट्या, भोवरा, लपाछपी, विषामृत, विटी दांडू असे इतर खेळही त्यावेळी आम्ही खेळत होतो. कदाचित आजच्या मुलांना यातील काही खेळांची नावं, ऐकून देखील माहिती नसतील. पण तुमच्या आई
Dec 27, 20207 min read
शांतता प्रस्थापित करण्यासाठी हवी शस्त्रसज्जता!
चपराक दिवाळी 2020 ‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि आमची नवनवीन पुस्तके मागविण्यासाठी संपर्क - 7057292092 कोणतीही क्रांती ही शस्त्राशिवाय होत नाही असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीच्या बळावर जुलूमी रावजटीविरूद्ध संघर्ष उभारला आणि त्यातूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. आजही अनेकदा स्वसंरक्षणासाठी शस्त्र उचलण्याशिवाय पर्याय नसतो. इतरांवर वार करण्यासाठी शस्त्र वापरणे चुकीचेच पण स्वतःवरील हल्ला परतवून लावायचा असेल, राष्ट्राच्या संरक्षणासाठी सीमे
Dec 26, 20207 min read
म्हाळसा कुठे गेली?
चपराक दिवाळी 2020 ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि आमची उत्तमोत्तम पुस्तके मागविण्यासाठी व्हाटस् अॅप क्रमांक - 7057292092 म्हाळसा कुठे गेली? असा काही प्रश्न होऊ शकतो का? मला वाटते असाही प्रश्न होऊ शकतो. या प्रश्नाची उत्तरे अनेक मिळू शकतात. उदाहरणार्थ, ‘जय मल्हार मालिका संपली. त्यामुळे म्हाळसा आता दिसत नाही’ असे एक उत्तर मिळू शकते. तसेच ‘म्हाळसा नेवाश्यातही असेल; कारण म्हाळसा ही खंडोबाची पत्नी होती.’ या म्हाळसेचे माहेर नेवासा होते. त्यामुळे म्हाळासेचे मंदिर नेवाश्यामध्ये
Dec 25, 20204 min read
bottom of page
.jpg)




