top of page
विशेष लेख
माझे माहेर...!
१९५६-५७ या वर्षामध्ये यवतमाळ येथे काम करीत असतानाच राम शेवाळकर यांच्या मनात नांदेडला जाण्याचा विचार घोळत होता. त्यावेळी पीपल्स कॉलेज नांदेड येथे प्राध्यापक पदाची एक जागा रिक्त होती परंतु अचानक यवतमाळ येथील ज्या महाविद्यालयात शेवाळकर प्राचार्य म्हणून काम बघत होते त्या कॉलेजचे संस्थापक बाबाजी दाते यांचा अपघात झाला आणि शेवाळकर यांच्यावर प्राचार्यपदाची जबाबदारी असल्यामुळे शेवाळकरांना तो विचार स्थगित ठेवावा लागला. त्यांचे मित्र मधू वाबगावकरांना पीपल्स कॉलेज, नांदेड येथे काम कराय
May 14, 20208 min read
आपण सारे कोरोनाग्रस्त
प्रिय सटू... ते तातू वगैरे आता जुनं झालं. किती वर्षे तीच ती जुनी नावं वापरायची? ओल्ड फॅशन्ड नाही का वाटत! आता बघ, आपल्या पिढीची नावं शिल्लक तरी आहेत का? (आता तुझं नाव सटवा पण मी त्याचा सट्यु केला!) अलीकडचं नाव तर पहा. ती माणसाची असल्यागत वाटतच नाहीत मात्र आपणाला त्याच नावानं बोलावं लागतं ना लेकरांना! परवा एकानं आपल्या लेकराचं नाव ठेवलं टॉमी. आता बोला. पूर्वी आजोबा-पणजोबाचं नाव वाढवायची. (आता हे वाढवायचं म्हणजे पुढच्या पिढीला तेच नाव ठेवायचं हे तुला माहीत आहेच) पण आता पूर्व
May 13, 20204 min read
हॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी
एखाद्या चित्रपटाचे परीक्षण लिहिताना आपण दोन प्रकारे ते काम करू शकतो. 1. त्या चित्रपटाची कथा, त्यातली कला, दिग्दर्शन, त्यातल्या नटांचे अभिनय इ. ह्यांचे विश्लेषण, रसग्रहण किंवा अगदी चिरफाडही आणि 2. त्या चित्रपटात आलेल्या विषयवस्तुचे, मांडलेल्या विचार, तत्त्वज्ञानाचे - ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक किंवा तदनुषंगिक इतर प्रकारे विश्लेषण. ...पण कधी कधी काही चित्रपट असा एखादा विषय, तत्त्वज्ञान किंवा विचार घेऊन येतात की त्याबद्दल बोलताना, लिहिताना, विचार करताना तो मूळ चित्रपट आणि त्यात
May 9, 20209 min read
कुणी देईल का मज त्या दु:खाची भूल?’
"राजा रविवर्म्यानं त्याच्या उर्वशीच्या चित्रासाठी जे मॉडेल वापरलं होतं त्याबद्दल तुला किती म्हणून उत्सुकता होती. रविवर्म्याला त्या मॉडेलच्या शरीराबद्दल आसक्ती होती का? प्रेक्षकाला तशी उर्वशीबद्दल आसक्ती वाटावी अशी रविवर्म्याला अपेक्षा होती का? असली कलाबाह्य चावट उत्सुकता तुला वाटली होती?" प्रा. विजय कारेकर यांचा ‘साहित्य चपराक’ मासिकाच्या मार्च 2010 च्या अंकातील हा लेख तुम्हाला नक्की आवडेल. अवश्य वाचा. प्रतिक्रिया द्या. चित्र वेळ, विचित्र स्थळ. विचित्र न्यायाधीश न्यायाधीश य
May 7, 20209 min read
या लेखकांनी पाडला आयुष्यावर प्रभाव
‘‘आयुष्यात दु:ख येतं ते वळवाच्या पावसासारखं पण सुख मिळतं ते गुलाब पाण्यासारखं’’, ‘‘माणसाला सुखाचं संबंध वर्ष जेवढं शहाणपण शिकवत नाहीत तेव्हढं संकटाचा एक क्षण शिकवून जातं.’’, ‘‘माणसाची इच्छा ही नंदनवनातील कल्पकता नाही तर ती वाळवंटातील हिरवळ आहे’’ ही वाक्यं म्हणजे ज्ञानपीठकार वि. स. खांडेकर उपाख्य भाऊसाहेब खांडेकर यांच्या साहित्यसागरातील मोती होत. सुविचारांची रत्ने होत . भाऊसाहेबांनी गरीबी अनुभवली. जवळून पाहिली. त्यामुळे गरिबांसाठी, दु:खीतांसाठी आस्था निर्माण करणारं साहित्य त्
May 7, 20208 min read
जिव्हायात्रा!
स्वत:च्या व्याख्यानप्रवासाला गुरुवर्य राम शेवाळकर 'जिव्हा यात्रा' संबोधताना म्हणत असत की वडिलांकडून मिळालेल्या सभाधीटपणा या गुणामुळे त्यांच्याच वाणीचा वारसा मी आत्मविश्वासाने चालविला. सुरुवातीला थोडा त्रास झाला; परंतु पुढेपुढे आत्मविश्वास वाढत गेला. जे जाणवले, स्फुरले, वाचले, लिहिले ते ते सारे वाणीतून मांडताना आनंद वाटत असे. हाच आनंद श्रोत्यांपर्यंत पोहचविताना माझे वक्तृत्व बहरत गेले. ही आवड आणि बोलण्याच्या ध्यासातून मी मराठवाडा, भारतात आणि पुढे जगातही फिरलो. प्रत्येक सफरीती
May 6, 20206 min read
ही वाट वैखरीची
माझ्या मनात वक्तृत्वाविषयीची आवड निर्माण करण्याचे काम प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केले. त्यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर शब्दशक्तीच्या अफाट ताकतीचा प्रत्यय मला आला. जाणत्या वयात मी त्यांच्या संपर्कात आलो. प्राचार्यांनी वक्तृत्वाची जी वाट चोखाळली, त्या वाटेने जावे असे मला वाटले. मी अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर. तसा माझा साहित्याशी संबंध नव्हता पण साहित्यप्रेमाने आणि वेडाने मला या क्षेत्रात आणले. गेली पंधरा वर्षे अव्याहतपणे व्याख्यानाच्या निमित्ताने माझी भ्रमंती महाराष्ट्रात आणि
May 6, 20208 min read
पू. साने गुरुजींच्या साहित्यातून दिसणारा स्त्रीविषयक दृष्टिकोन
पू. साने गुरुजींच्या साहित्यातून दिसणारा स्त्रीविषयक दृष्टिकोन पांडुरंग सदाशिव साने अर्थात पू. साने गुरुजी यांची विपुल साहित्य संपदा आहे. अभ्यासू आणि ज्ञानपिपासू गुरुजींना अध्यापन, पत्रकारिता, समाजकारण आणि राजकारणाचा मोठा व्यासंग. अनुभवांच्या कसोटीवर खरे उतरलेले आणि हृदयाच्या आतून आलेले असल्याने त्यांच्या साहित्याला वैचारिक अनुष्ठान होते. सततच्या सूक्ष्म अशा चिंतनातून आल्यामुळे त्याला वेगळी जीवनदृष्टी आहे. त्यांच्या लेखनाला मराठी वाङ्मयात स्वतंत्र स्थान आहे. त्यांनी 19 कादं
May 2, 20208 min read
मना सत्य संकल्प जिवी धरावा!
आचार्य गोविंददेव गिरी यांचा जांब येथील प्रबोधन मंत्र ‘साहित्य चपराक’ मासिक मार्च 2020 शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकीसारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा जयजय रघुवीर समर्थ तुम्हाला असं वाटत असेल की मी काही उपदेश करण्याकरिता, चैतन्य ज्ञानपीठाच्या वतीने ज्ञानामृताचे डोस पाजण्यासाठी आलोय तर ते मनातून काढून टाका. खरी गोष्ट अशी आहे मी केवळ, केवळ आणि केवळ जांबच्या मातीला वंदन करण्याकरिता आलेलो आहे. हे मी केवळ या ठिकाणी आज बसलोय म्हण
May 1, 20208 min read
मराठीतील स्त्री नाटककार
नाटक-रंगभूमी या शब्दसंकल्पना आपण सतत वापरत असतो. त्या व्यापक आहेत याची जाणीवही आपल्याला असते. मुळात नाटक अथवा रंगभूमी ही सांघिक कला आहे, परस्पराश्रयी कला आहे, याचे भान महत्त्वाचे असते. एखादे नाटक आवडले किंवा नावडले तर नेमके कोणते घटक कारणीभूत झाले, याचा शोध महत्त्वाचा असतो. कारण रंगभूमीवर आविष्कारासाठी नाट्यलेखक-नाटककार हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतोच पण त्याचबरोबर दिग्दर्शक, अभिनय करणारे कलाकार, प्रयोगतंत्रासाठी लागणारे तंत्रज्ञ आणि मुख्यतः प्रेक्षक अशा अनेक घटकांचा समावे
May 1, 202011 min read
सृजनाचा सुंदर प्रवास
नाशिक येथील युवा पत्रकार आणि वक्ते किरण सोनार यांचा ‘हजार धागे सुखाचे’ हा वेगळ्या धाटणीचा कथासंग्रह लवकरच ‘चपराक प्रकाशन’कडून प्रकाशित होत आहे. या संग्रहाला सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड यांच्या सदिच्छा लाभल्या आहेत. त्यांच्या या भावना खास आपल्यासाठी... किरण सोनार यांच्या कथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतील यासाठी विजयाताईंच्या या शब्दांशिवाय आणखी कोणतं परिमाण हवं? किरण सोनार या तरुण लेखकाजवळ एक सुंदर मन आहे, ज्यात कळवळा आहे, कणव आहे, सुंदरतेची अनोखी आस आहे आणि मनाच्या गाभार्
Apr 30, 20202 min read
तीरे तीरे नीरा...
सुप्रसिद्ध लेखक सुनील पांडे यांचे ‘तीरे तीरे नीरा...’ हे नीरामाईच्या परिक्रमेवर आधारित वाचनीय पुस्तक ‘चपराक’कडून प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील त्यांची 29 दिवसाची परिक्रमा वाचकाला एका वेगळ्याच विश्वाची तर सफर घडवतेच पण नद्या या आपल्या जीवनवाहिन्या कशा आहेत हेही शिकवते. या पुस्तकातील हे एक खास प्रकरण... नीरेच्या उपनद्या नीरामाईचा उगम भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाट मार्गावरील शिरगाव या ठिकाणी एका डोंगरात 1170 मिटर उंचीवर झाला आहे. नीरा नरसिंहपूर या ठिकाणी ती भीमेला मिळते. उगम
Apr 28, 20206 min read
खरंच, माणुसकी शिकलो!
चीनमधील वुहान शहरामध्ये कोरोना व्हायरसची सुरवात झाली. वुहानमध्ये कोरोनाचे अनेक रूग्ण आढळले. हा संसर्गजन्य रोग असल्याने नेपाळ, कॅनडा, थायलंड, अमेरिका, जपान, इटली, भारत अशा अनेक देशांमध्ये हा रोग पसरला. भारतातील हवामान बदलत असून कोरोना विषाणुचा धोका वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला. कोरोना व्हायरस हा प्रथम सामान्य सर्दीसारखा भासतो मात्र नंतर श्वास घेण्यात अडचणी येतात व अंगदुखी वाढीस लागते. यावरुन कोरोना झाल्याचे निदान होते. हा आजार बळावल्यामुळे निमोनिया, किड
Apr 27, 20204 min read
तीन कायद्यांनी केले शेतकऱयांचे तीन तेरा
1990 ला ‘इंडिया’ च्या सरकारने जागतिकीकरण, उदारीकरण स्वीकारले. मात्र ते धोरण ‘भारता’ला म्हणजेच शेतीक्षेत्राला लागू केले नाही. आज शेतकर्यांना त्याचीच किंमत मोजावी लागत आहे. 'उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे शेतकर्यांची दुर्दशा झाली आहे,' असे ठाम प्रतिपादन करणारे अनेक विद्वान आहेत. त्यांनी तोडेलेले तारे पाहून मला एक विनोद आठवला. एका दवाखान्यात एक रोगी पांघरून घेऊन झोपला होता. डॉक्टर त्याच्या खाटेजवळ गेले. हाक मारली. तो गाढ झोपला होता. उठला नाही. डॉक्टरांनी पुन्हा हाक मारली. का
Apr 27, 20206 min read
आठवण पुस्तकाची... गोडी वाचनाची...
मी सहावीत होते तेव्हा लोकमान्य टिळकांवरचे ४० पानी पुस्तक ग्रंथालयातून वाचायला मिळाले. मला खूप आवडले ते. मी वाचनात रंगले पण वाचन झाल्यावर हे पुस्तक परत करायला लागणार म्हणून मी ते लिहून ठेवले. त्यावेळी ते काम चिमुकल्या हातांना कठीण होते पण पुस्तक प्रेमाने ते सहज झाले. खेडेगाव होते माझे. त्यामुळे अगदी एखाद्या घरी चांदोबा मासिक, वर्तमानपत्र, एखादे पुस्तक बघायला मिळायचे. आवडीच्या खाद्यपदार्थाकडे एवढ्या आधाशीपणाने कुणी पाहणार नाही तशी मी पुस्तकाकडे पहायची आणि ते पुस्तक मला वाचायल
Apr 26, 20202 min read
भटक्या विमुक्तांचे सामाजिक, शैक्षणिक जीवन व समस्या
भारती य समाज हा जातीपोटजातीमध्ये विभागलेला समाज आहे. या समाजात प्रत्येक जात जमात ही स्वतंत्र आहे. प्रत्येक जातीच्या रूढी, परंपरा, चालीरीती, रिवाज, व्यवसाय, देवदेवता, सणवार, उत्सव, भाषा आणि जगण्याच्या तर्हा वेगवेगळ्या आहेत. अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेला जाती जमातींचा समूह म्हणजे भारत देश आहे. जगाच्या पाठीवर एवढ्या मोठ्या संख्येने जाती जमातीत विभागलेला बहुदा भारत हा एकमेव देश असावा. त्यांचे वैशिष्ट्य असे की तो समानतेऐवजी विषम समाजव्यवस्थेवर अवलंबलेला आहे. भारतीय समाजाचे
Apr 26, 20207 min read
माणूस म्हणून जगताना
चपराक दिवाळी अंक 2012 एक छोटासाच प्रसंग! दोन छोटी मुलं, असतील आठ-दहा वर्षांची. शाळा सुटल्याने आपापले दप्तर सांभाळत, बसची वाट बघत, आपापसात गप्पा मारत झाडाखाली उभी. त्यांचं संभाषण ओघानेच माझ्या कानावर पडलं... अरे, चिन्या म्हटलं आज माझा वाढदिवस आहे. मग तुझे बाबा केक काणणार का? चिन्याचा भाबडा प्रश्न. नाही रे, माझी आई मस्तपैकी पुरणपोळी करणार आहे आज. मग मी बाबांची टोपी घालून पाटावर बसणार. आई मला ओवाळणार, आणि हो बाबा मला दहा रूपयेवाला मोठ्ठा चॉकलेट आणणार आहेत. त्यातला अर्धा मी
Apr 25, 20203 min read
असामान्य सामान्य
चपराक दिवाळी अंक 2012 आपल्याला रोज कित्येक माणसे भेटत असतात. काही ओळखीची, काही अनोळखी. काही प्रत्यक्ष भेटतात तर काही कुणाच्या सांगण्यातून. अश्याच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटलेल्या, लौकिकार्थाने सामान्य समजल्या जाणार्या माणसांच्यात मला जे असामान्यत्व जाणवले, ते खूप काही शिकवून गेले. एका लहान गावात माझा ‘चर्पटमंजिरी’ कार्यक्रम होता. गावातल्या प्रतिष्ठित घरी माझी उतरायची सोय केली होती. राहायचे नव्हते पण गावात पोचल्यावर जेवणखाण, जरा आराम करण्याची सोय त्यांच्याकडे होती. त्यांचा म
Apr 25, 20204 min read
प्रबोधन समितीची वाटचाल
श्री रामदास स्वामी श्रीराम दर्शन चतु:शताब्दी प्रबोधन समितीची वाटचाल बालपणापासून संघ संस्कारात वाढलो. शाखेत राष्ट्रपुरुषांबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या. अनेक महापुरुषांची चरित्रे ऐकण्याचा छंद त्यातूनच जडला. त्यातच काही पराक्रमी राजे व संतमहंतांची चरित्रे आवडीने वाचली. शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ रामदास स्वामी, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद अशा अनेकांची चरित्रे वाचली. या चरित्रांमधून काही गोष्टी कळल्या व त्या अंगवळ
Apr 21, 202010 min read
बाभूळकांड
ऐश्वर्य पाटेकर युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, नाशिक. 9822295672 मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक 2019 वारदात घडली तेव्हा एकही प्रत्यक्षदर्शी पुरावा नव्हता. भरदिवसा, भरगल्लीत बाभूळकांड घडवलं जातं अन् एकही साक्षीदार नाही! असं कसं होऊ शकतं? एकमात्र आहे की, माणसांचं जग सोयीनं आंधळं, मुकं, बहिरं होऊ शकतं याचा हा ढळढळीत पुरावा म्हणून आपण या घटनेकडं पाहू शकतो. होरपळून मेलेले पक्षी, त्यांच्या चोचीतून उठणारे अतीव वेदनेचे अंतिम चित्कार कुणीच ऐकले नाहीत! अग्नीच्या ज्वाळा आक
Dec 27, 20198 min read
bottom of page
.jpg)




