top of page
साहित्य चपराक
स्वित्झरलँड : टॉप ऑफ युरोप आणि माऊंट टिटलीस
‘थॉमस कुक’ तर्फे आम्ही युरोप सहलीला निघालो होतो. आमच्या तारखा सारख्या बदलत होत्या. शेवटी 3 जुलैच्या ऐवजी 6 जुलै तारीख नक्की ठरली आणि एकदाची आमची तयारी सुरू झाली. सगळा जमानिमा करून निघालो तर कधी न होणारी इमराईट्सची फ्लाईट रद्द होऊन आम्हाला पुढची फ्लाईट पकडावी लागली. त्यामुळे दुबईमधल्या इमराईट्सच्याच आलीशान हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागला. एवढ सगळं होऊन फायनली आम्ही सहा जण लंडनला पोहोचलो आणि आमच्या थॉमस कुक ग्रुपला जाऊन मिळालो. पंधरा दिवसांमध्ये दहा देश आम्ही पादाक्रांत करणार
Apr 25, 20207 min read
चिंता करितो विश्वाची...
मासिक साहित्य चपराक, डिसेंबर 2019 सज्जनगड... सोळाव्या शतकापासून ते आजतागायत प्रभू श्रीरामाच्या उपासनेत आकंठ बुडालेला हा गिरीदुर्ग. इथल्या प्रत्येक दगडात समर्थांचा आजही वास आहे. जगद्उद्धारासाठी स्वतः परमेश्वर जेव्हा भूतलावर वास्तव्य करु शकत नाही तेव्हा त्याची विचारधारा घेऊन प्रत्येक वेळी अशा विभूतींनी जन्म घेतला आहे, ज्यांनी समाज घडवला. माणसाला माणूस बनवण्याचे कार्य केले. समर्थ रामदास स्वामी हे त्याच विभूतींचे जनक म्हणले तर वावगे ठरणार नाही. जालना जिल्ह्यातील जांब गावी सूर्य
Dec 25, 20194 min read
प्राक्तन - प्रा. बी. एन. चौधरी यांची कथा
साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019 बहारो फुल बरसाओ, मेरा महेबूब आया है... हे गाणं मंडपात वाजायला लागलं आणि सार्यांच्या नजरा प्रवेशद्वाराकडं वळल्या. अंगावर लाल रंगाची ओढणी आणि पिवळ्या रंगाचं नऊवारी भरजरी वस्त्र ल्यालेली नववधू मोठ्या डौलदार चालिनं एक एक पाऊल टाकत मंडपात प्रवेशकर्ती झाली. तिच्या खांद्यावर आपले हात ठेवत तिचा भावी पती आश्वस्त होत संयमानं तिच्या चालीशी स्वतःची चाल जुळवत तिच्या मागून चालत होता. त्यांच्या पुढं पाच-सहा चिमुरड्या हातात फुलांच्या परड्या घेवून आणि त्या
Dec 18, 201910 min read
आचार्य अत्रे यांचा शक्तिमान विनोद
साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019 आचार्य अत्रे हा मराठी साहित्यातला एक चमत्कार होता. त्यांना ‘विनोदपीठाचे तिसरे शंकराचार्य’ म्हटले गेले असले तरी कोल्हटकर, गडकरी यांच्या विनोदाशी त्यांची तुलना होऊ शकत नाही. पूर्वसुरींचे ऋण त्यांनी घेतले होते, जरूर घेतले होते! पण ते त्या छायेत कायम राहिले नाहीत. याचे उत्तर अत्रे यांनीच दिले आहे. ते स्वतःला ‘जीवनाचा यात्रेकरू’ म्हणत असत. ही त्यांची यात्रा जशी आयुष्यभर संपन्न झाली तशी या दोघांना करता आलेली नाही. याचे कारण होते प्रकृतीभिन्नता.
Dec 17, 201911 min read
धोक्याच्या वळणावर लातूर पॅटर्न
साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019 दहावी व बारावीच्या निकालासोबतच नीट, सीईटी परीक्षांच्या धर्तीवर राज्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चर्चिले जाणारे लातूर काही काळापासून शिक्षण क्षेत्रातील अनिष्ट प्रवृत्तीमुळे चर्चेत आले आहे. शेतरानात ऊस, सोयाबीन, तूर आणि गावात शिक्षण व शिकवण्या वगळता इथे कोणतेही पीक पिकत नाही. सततचा दुष्काळ व पाणीटंचाई, अवर्षणप्रवण परिस्थिती, नेहमीचीच गारपीट व दळणवळणाच्या सुविधांअभावी इथे उद्योग व्यवसाय चालू शकत नाहीत. त्यामुळे साखर कारखानदारी, डाळ व तेलबिया प
Dec 17, 20197 min read
अपराध
कमल आणि विभावरी दोघी सख्या बहिणी. कमल मोठी, फारशी शिकली नाही. कॉलेजला शिकायला गेली आणि एका माणसाच्या प्रेमात पडली. विभावरी खूप हुशार. अभ्यासात, खेळात, दिसायलाही खूप सुंदर. देवाने सारं उजवं माप विभाला दिलेलं. तिचं सतत कौतुक व्हायचं. कमल मात्र अगदीच कपाळ करंटी. ऐन शिकायच्या वयात प्रेमात पडली. ज्या माणसाच्या प्रेमात पडली तो साधा मेकॅनिक. आईला वाटायचं कमलने शिकावं; पण कमल ऐकायला तयार नव्हती. घरी या दोघींशिवाय फक्त आई. वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलेलं. आईनं खूप कष्टानं या दोघींना
Aug 28, 201912 min read
दखलपात्र : वाचनीय अग्रलेखसंग्रह
माझ्या 'दखलपात्र' या अग्रलेख संग्रहाच्या दोन आवृत्या संपल्या. अनेक वाचक या पुस्तकांवर अजूनही अभिप्राय कळवतात. या पुस्तकानं मला अनेकांच्या मनात आणि हृदयात स्थान दिलं. आज दैनिक 'पुण्य नगरी'च्या 'मी आणि माझं वाचन' या सदरात ज्येष्ठ लेखक श्री. दिलीप देशपांडे यांनी 'दखलपात्र'विषयी लिहिले आहे. दिलीप देशपांडे सर, 'पुण्य नगरी'चे संपादक श्रीकांत साबळे सर आणि पुरवणी संयोजक स्वप्नील कुलकर्णी यांचे आभार! - घनश्याम पाटील दखलपात्र : वाचनीय अग्रलेखसंग्रह घनश्याम पाटील यांचे ‘दखलपात्र’ हे पुस
Aug 26, 20193 min read
शब्दाविना बरेच काही...
शब्द हे भावना व्यक्त करण्याचे साधन आहे. प्रेम, माया, विश्वास, सुख, दु:ख, राग, आनंद, वैताग, विचार या मनातील भावना पुढच्या व्यक्तिपर्यंत बर्याचदा शब्दांच्या मार्फत पोहोचवल्या जातात. लेखक, कवी, विचारवंत, वक्ता यांचे तर शब्द हेच सामर्थ्य आहे. विश्व, ब्रह्म आहे तरीही प्रत्येक जण बोलत असतोच की शब्दाविनाही बरेच काही! अगदीच तान्ह्या बाळाला कुठे काही सांगता येते? आई मात्र सारे काही समजून जाते. तसंही स्वतःचे मुल कितीही जाणते असले तरीही लेकराच्या भावना समजायला किमान आईला तरी शब्दांच
Aug 5, 20193 min read
रंग जीवनाचे!
रंग आणि माणूस यांचं गहिरं नातं आहे. निसर्गात अनेकानेक रंग आहेत. प्रत्येकाचा रुबाब वेगळा, मोहकता वेगळी. मूळ रंग कितीही असोत पण एका रंगात दुसरा मिसळून जे मिश्रण बनतं ना त्याला तोड नाही. ढोबळ मानाने रंग दोनात विभागावे वाटतात. भडक रंग आणि फिकट रंग! भडक रंग डोळ्यात पटकन जातात पण सुखावतातच असं नाही. याउलट फिकट मंद रंग मनाला शांत करतात, खुणावतात, मोहवतात! त्यांची सुंदरता मनाला भुरळ घालते. तसंही रंग आणि भावना यांचं जवळचं नातं आहे. भडक लाल रंग डोळ्यात भरतो. जो शक्ती, युद्ध आणि धोका
Aug 5, 20192 min read
सु(संवाद)...
‘‘ए मूर्खा तुला काय कळतं की नाही, ठेव ते बाजूला!’’ ‘‘जरा म्हणून अक्कल नाही...’’ ‘‘ये म्हातार्या जरा ऐक की...’’ ‘‘चल हो बाहेर, सगळी वाट लावली...’’ ‘‘अरे नीट खा की, सगळं कपड्यावर सांडवलं की...’’ ‘‘चल उरक की लवकर...’’ दररोज सकाळी ऑफिसला जायची गडबड एका बाजूला चालू असताना खालच्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून तावातावात चालू असलेली जुगलबंदी अगदी नको नको म्हणत असताना कानावर आदळत असते. आता या गोष्टीची इतकी सवय झालीय की एखाद्या दिवशी भांडणाचे आवाज आले नाही तर चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं.
Aug 5, 20192 min read
पायी वारीचा इतिहास
महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘वारी’ हा वारकरी संप्रदायाचा आचार मार्ग आहे. समृद्ध परंपरा असलेली पंढरपूरची वारी वारकर्यांना पिढ्यान-पिढ्या आत्मिक समाधान देत आहे. कोणतेही निमंत्रण नसताना लाखो वारकरी ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय यांच्या पालखीबरोबर पंढरपूरला जातात. आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या वारीबरोबरच दर एकादशीला विठूरायाच्या दर्शनासाठी वारकरी जात असतो. वारकरी संत, वारकरी संप्रदाय यावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे व यापुढेही
Aug 5, 20193 min read
आगीतून उठून फुफाट्यात!
आकुर्डीच्या कंपनीतील नोकरी मी सलग पाच वर्षे केली परंतु रोज 70-80 किलोमीटर मोटरसायकलचा प्रवास मला नंतर नंतर पाठदुखीने त्रस्त करू लागल्यामुळे मी पुण्यातल्या संगम पुलाजवळील एका पॅकेजिंग मशीन बनवणार्या कंपनीत 1994 च्या सप्टेंबरला रुजू झालो. चांगला दीड वर्ष म्हणजे 1996 पर्यंत मस्त रुळलो होतो. मस्त मजेत चालले होते सगळे. नुकताच कुठे माझा जम ह्या कंपनीत बसू लागला होता. कलकत्ता, दिल्ली, चंडीगड अशी महाराष्ट्रभर माझी फिरतीही चालू होती. 1996 ला मी एक जुनी फियाट गाडीही घेतली होती. ही गाड
Aug 5, 20194 min read
कस्तुरी गंध
कुमुदिनी काय जाणे परिमळ । भ्रमर सकळ भोगितसे ॥ संत तुकोबांच्या या अभंगाला लतादीदींनी किती सुमधुर स्वरात गायलं आहे. हा अभंग जाणिवेच्या एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातो. गहिरा अर्थ सांगून जातो. खरेच, कमळाला कुठं ठाऊक असतो ना त्याच्या अंतरीचा परिमळ? त्याचा भोग तर भ्रमरच घेत असतो. आपलंही असंच होत काहीसं. स्वतःजवळ काय आहे हे बहुधा स्वतःलाच ठाऊक नसतं अन् त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही करत नाही. निबीड अरण्यामध्ये, तळपत्या उन्हात, हरीण मृगजळामागं सैरावैरा धावत राहतं. हा आभास आहे हे उमगत
Jul 27, 20192 min read
पत्र आणि पत्रावळ
आजच्या संगणक किंवा मोबाईलच्या युगात पत्रलेखन हा कालबाह्य पर्याय असावा. कोरा कागद, शाईचं पेन आणि मनाच्या झर्यातून वाहतं खळखळ पाणी. पांढर्या शुभ्र कागदावरचं ते टपोर्या मोत्यांसारखं अक्षर वाचताना समोरचा हरखून जाई कधीकाळी. मजकूराच्या इतकंच त्यातल्या वळणदार वा गिचमिड अक्षराला महत्त्व होतं पण आता मात्र गेले ते दिन गेले म्हणायची वेळ आलीये. मोबाईलच्या एका रिंगने समोरचा उपलब्ध होतो. काम, निरोप, व्यक्त होणं या संदर्भात जे जसं असेल तसं माणूस बोलतो, संपला विषय. भावनांना तसा थारा कमीच
Jul 27, 20192 min read
1984, सुरूच न होता संपलेली प्रेमकहाणी!
1984 ला लॉ कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत होतो तेव्हाची ही गोष्ट. मी आणि माझा एक मित्र त्याच्या स्कूटरवरून एका गुरवारी लॉ कॉलेजवरून परत येता येता गरवारे कॉलेजवरून येत होतो. खंडूजी बाबा चौकातून पुढे गरवारे पुलावरून जात असताना, माझ्या मित्राला सायकलवरून चाललेली एक मुलगी खूप आवडली आणि तो मला म्हणाला ‘‘रव्या तिला आपण तिचे नाव विचारायचे का?’’ मी त्याला म्हणालो ‘‘कशाला उगाच गडबड करतो!’’ मला म्हणाला ‘‘मला ती फारच आवडली आहे,’’ असे म्हणून त्याने स्कूटर त्या मुलीच्या सायकलच्या जवळ नेल
Jul 27, 20194 min read
सुख आले माझ्या द्वारी!
पुण्यातील कर्वे रस्त्यावरील मृत्युंजयेश्वर मंदिरात भजनाच्या कार्यक्रमाला गेलेल्या मंगलाताई भजन संपल्यानंतर घरी निघाल्या. सोबतच्या मैत्रीणींनी थोडे थांबावयास सांगितले म्हणून बसल्या. आज मैत्रिणींची विशेष सभा असावी असा त्यांनी विचार केला. हो! आज विशेष सभा आयोजित केली होती. विषय होता घरातील ताणतणाव. मग एकीने प्रस्तावना केल्यावर प्रत्येकीने आपल्या घरात घडणार्या घटनांचे वर्णन सांगण्यास सुरुवात केली. घटनांचा केंद्रबिंदु, अर्थातच सूनबाई. मी किती चांगली आहे, मी किती कष्ट करुन मुलाला
Jul 27, 201913 min read
गंधांची अजब दुनिया
सुगंधाची अशी एक मोहक अगोचर दुनिया असते. या दुनियेला वेगवेगळ्या खिडक्या किंवा झरोके असतात. कधी सुगंध या झरोक्यातून प्रवेशतात तर कधी आपण सुगंधांकडे ओढले जातो. अगदी पुराण काळापासून सुवास किंवा अत्तराचे वेड माणसाला आहे. हे सुगंध माणसाला वेडं करतात. आपली पत जाऊ नये म्हणून थेंबभर अत्तरासाठी कुणा बादशहाने अत्तराने भरलेला अख्खा हौद खुला केला होता म्हणतात. उंची अत्तरे, सुगंधी द्रव्ये वापरणे हे त्या बादशहालाच शक्य होतं. आपण उगाच चिमुटभर कापूस कानात घालून फिरणारी माणसं! हल्ली तर स्प्रे
Jul 21, 20192 min read
चीनची सफर
2009 च्या ऑक्टोबरमध्ये मला चायनाला कंपनीच्या एका कामासाठी महिनाभरासाठी जाण्याचा योग आला होता. चिंदाव ह्या उत्तर चायनामधील शहरातील एका शैक्षणिक विद्यापीठाबरोबर करार करून काही विशिष्ट कौशल्य ह्या चायनीज मुलांना शिकवण्याचा हा करार होता. त्यानुसार 26 ऑक्टोबर 2009ला मी आणि माझे अजून दोन सहकारी मुंबईहून शांघाई आणि शांघाईहून ह्या चिंदावला गेलो होतो. शांघाई ते हुंदाव हा साधारण 2 तास विमानाचा प्रवास करून आम्ही हुंदाव विमानतळावर उतरलो तेव्हा रात्र होती. हुंदाव विमानतळावर तिकडचा अमेरिक
Jul 21, 20194 min read
सावळबाधा
तुला शब्दांत उतरवणं खरंच सोपं नाहीये. तुझ्या अदा, मुड्स, नजाकती, यामुळेच खूप मुलखावेगळा भासतोस! ...म्हणून कदाचित तू मनापासून भावतोस. तुझं रिमझिमनं... संततधार झरणं... बेदरकारपणे बरसणं सारं आवडतं... मात्र रौद्ररूप तेवढं खटकतं. गोकुळातल्या नटखट कान्हासारख्या खोड्या करतोस. लक्ष लोचणे तुझ्या बरसण्यासाठी जेव्हा आतुर असतात तेव्हा सार्यांना तरसवणं तुला भारी जमतं...! आमच्या हातात मात्र तुझ्या झरण्यासाठी झुरणं इतकंच उरतं. तू बरसतोस आणि तापलेल्या धरेला जणू सुखाच्या सरींनी शमवतोस. तुझ्
Jul 21, 20192 min read
समर्पण
एकदा संत कबीर महाराजांकडे एक युवक आला. त्यानं कबीरांना विचारलं, ‘‘महाराज विवाह करणं योग्य आहे की अयोग्य?’’ ते ऐकून न ऐकल्यासारखं करत कबीरांनी प्रथम त्या युवकाकडे दुर्लक्षच केलं! काही वेळाने युवकाने अधीर होऊन परत तोच प्रश्न विचारला. मात्र त्यावेळीही कबीरांनी काही उत्तर न देता आपल्या पत्नीला हाक मारली व म्हणाले, ‘‘अगं आतून जरा कंदील घेऊन ये.’’ तेव्हा युवकाला मोठं आश्चर्य वाटलं. न राहवून तो म्हणाला, ‘‘महाराज आता दिवसाढवळ्या कंदिलाची काय गरज आहे? एवढ्या उजेडात तर सगळं काही स्वच्छ
Jul 20, 20193 min read
bottom of page
.jpg)