top of page
साहित्य चपराक
संत नामदेवांच्या जीवनचरित्राचा वेध घेणारी प्रासादिक कादंबरी
रवीन्द्र भट यांची संत नामदेवांच्या जीवनचरित्राचा वेध घेणारी ‘घास घेई पांडुरंगा’ ही रसाळ व प्रासादिक शैलीतील सात्विक आनंद देणारी कादंबरी 1994 मध्ये प्रसिद्ध झाली. रवीन्द्र भट संस्कार शिबिराच्या निमित्ताने पंढरपूरात असताना संत नामदेव समाजोन्नती मंडळाचे कार्यकर्ते श्री प्र. द. निकते शिंपी समाजाच्या वतीने संत नामदेवांच्या चरित्रावर आधारित कादंबरी लिहावी अशी विनंती करतात. सायंकाळी धूपारतीच्या वेळी राऊळाच्या गाभार्यात रवीन्द्र भट यांच्या मनात या कादंबरीचे बीज रूजते. ‘इंद्रायणीकाठ
Jul 20, 20194 min read
लाखाची गोष्ट
मथळा वाचल्यानंतर याला लाखाची लॉटरी लागली की काय? असा प्रश्न वाचकांच्या मनात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर याने लाखाचे बारा हजार तर केले नाहीत ना, अशी शंका येण्याची शक्यता आहे पण त्या लाखाची ही गोष्ट नव्हे. मराठी मनाच्या बदललेल्या मानसिकतेची ही गोष्ट आहे. गेल्या काही वर्षात इंग्रजी शिक्षण आणि इंग्रजी शाळा यांचा पालकांच्या मनावर मोठा प्रभाव राहिल्याचे आपण पाहतो. शहरी भाग सोडा पण ग्रामीण भागात कष्टकर्यालासुद्धा आपला मुलगा जगाबरोबर राहिला पाहिजे. त्यासाठी इंग्रजी शाळेतच गेला
Jul 20, 20193 min read
निजात्मप्राप्ती साधावी!
बालपणापासूनच माझ्या घरात संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला रामरक्षा म्हणण्याची पद्धत होती. त्यातून मनाला एक वेगळ्या प्रकारची शांती मिळत असे. रोज कानी पडणार्या त्या सात्त्विक शब्दांमुळे वाणी शुद्ध होत असे. ही पद्धत वर्षानुवर्षे आमच्या घरात चालू होती. ही परंपरा टिकवण्याचे सारे श्रेय जाते ते माझ्या प. पू. आदरणीय गुरूवर्य आणि संत एकनाथ महाराज यांचे तेरावे वंशज श्री. रावसाहेब महाराज गोसावी यांना. नात्याने जरी ते माझे वडील असले तरी देखील ते मला नेहमीच माझ्या गुरूस्थानी आहेत. माझ
Jul 15, 20193 min read
सद्गुरू... सौख्याचा सागरू!
एखादं बाळ जन्माला आल्यावर जेव्हा त्याच्या पाठीत बळ येतं, तेव्हा ते पालथं पडतं. मग काही दिवसांनी त्याच्या हातात बळ आलं की ते रांगायला लागतं... आणि कालांतरानं त्या बाळाच्या पायात बळ येतं तेव्हा ते चालायला शिकतं. त्यावेळी ते बाळ आपलं पहिलं पाऊल आपल्या आईच्या साक्षीनं टाकतं! मग जसजसं बाळ मोठं होतं, तसतसं ते जास्तीत जास्त वेळ आपल्या आईच्या सानिध्यातच आपलं बालपण उपभोगत असतं. त्यावेळी त्या नकळत्या वयात त्याच्यावर संस्कार रुजले जातात. नंतर काही वर्षानं तो जगाच्या पाठीवर कुठंही गेला
Jul 15, 20195 min read
यशाची केमिस्ट्री शिकवणारे शिंदे गुरुजी
इसवी सन 2000 साली माझे बारावीचे शिक्षण पूर्ण झाले. बारावी हा करिअर आणि शैक्षणिक आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो. बारावीच्या शिक्षणाला सुरुवात ही साधारणतः वयाच्या सोळाव्या वर्षी होते. आपण सोळावे वर्ष हे धोक्याचे वर्ष मानतो कारण हे वर्ष तारुण्याच्या प्रदार्पणाचे वर्ष मानले जाते. अशा तारुण्याच्या उंबरठ्यावर बारावीसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांकडून चुका होऊ नयेत म्हणून गरज असते ती एका उत्तम मार्गदर्शकाची. अशाच एका मार्गदर्शक व्यक्तीसोबत माझा त
Jul 15, 20192 min read
पतंगे गुरूजी
माणसाच्या आयुष्यात शालेय जिवनातील संस्काराचे महत्त्व असतेच. माझे बहुतांश आयुष्य ग्रामीण भागात गेले. जुन्या निलंगा आणि नवीन शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ हे आमचे गांव. 1972, 73 ला मी मँट्रीकची परीक्षा पास झालो. जिल्हा परिषद शाळा, येरोळ येथील आमच्या वर्गात त्यावेळी19 मुले होती. त्यात तीन मुलींचाही समावेश. त्यावर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आम्ही तिघे होतो आणि शाळेतली ती फर्स्ट क्लासची पहिलीच बँच होती म्हणून विशेष कौतुक. अर्थात सर्व श्रेय आमच्या गुरुजी लोकांचेच होते. मला
Jul 15, 20192 min read
गुरुत्वाकर्षण
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे लोक, मार्गदर्शक, सल्लागार, मित्र, मैत्रिणी, सहकारी, नातेवाईक, आप्तेष्ट, वाचक, रसिक, विरोधक, निंदक ह्या रुपात भेटत असतात. हेच ते आपले खरे गुरु असतात. यंदाच्या गुरूपौर्णिमेनिमित्त मला लाभलेल्या ह्या गुरूंची आठवण झाली व अतिशय कृतज्ञपणे मला ह्या लेखाद्वारे माझी गुरुदक्षिणा अर्पण करावीशी वाटली. आयुष्यात मला लाभलेल्या ह्या गुरुंबद्दल मला कायमच आकषर्ण वाटले आहे. गुरुत्वाकर्षण म्हणा हवे तर! माझ्याच काय पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात
Jul 15, 20194 min read
महामेरू
श्रीगुरूचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदू श्रीचरण। श्रीगुरूंचे ॥ ज्ञानेश्वरांच्या या ओवीतूनच जीवनातील गुरूचे महत्त्व व अढळ स्थान अधोरेखित होते. दशदिशा अंधारलेल्या असताना जीवनात प्रकाशाचा कवडसा दाखविणारी व्यक्ती, शक्ती किंवा विचार म्हणजे ‘गुरू’. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरूला अढळ स्थान असते. माझ्या आयुष्यातही माझे वडील आणि गुरू ह.भ.प. श्री बापूसाहेब डफळ यांचे स्थान महामेरूप्रमाणे आहे. राजकारण, समाजकारणात उल्लेखनीय कामगिरी, कुटुंबाचा आधारस्तंभ, उत्तम
Jul 15, 20192 min read
गुरू हा संतकुळीचा राजा
गुरू हा फारच भव्य, व्यापक, उदात्त आणि आदर्श शब्द आहे. त्यामानाने शिक्षक हा मर्यादित अर्थ असणारा व्यवहारी शब्द आहे. भारतीय संस्कृतीच्या संदर्भात गुरू हा शब्द बहुधा आध्यात्मिक अर्थाने वापरला जातो. ‘गुरूवीण उनभव कैसा कळे?’ असा प्रश्न संत ज्ञानेश्वर माऊलींनी विचारलेला आहे. अर्थात गुरूशिवाय आध्यत्मिक अनुभव येणार नाही असा त्याचा अर्थ आहे. आध्यात्मिक गुरूंना सद्गुरू असेही म्हणतात. या आध्यत्मिक गुरूंचे किंवा सद्गुरूंचे माहात्म्य संतसाहित्यात आपणास पानापानांवर असलेले दिसून येते. भार
Jul 15, 20197 min read
माझा जगावेगळा सद्गुरू, माझा सखा श्रीहरी!
मागच्या काही वर्षापासून माझे बाबा सतत सुचवताहेत की, ‘‘ताई, वयाच्या या टप्प्यावर तू आता एखादा गुरू कर!’’ त्यांचं मन राखण्यासाठी मी त्यांना ‘हो’ म्हणत वेळ मारून नेते; पण मग विचार करत राहते की, खरं तर आई ही मुलाचा पहिला गुरू असते मात्र त्यानंतर सांगायचं तर माझा सुपुत्र श्रीहरी हाच माझा गुरू आहे. त्यानंच मला खरं जगणं शिकवलं, आयुष्याचा सुदंर अर्थ दाखवून दिला. फक्त आणि फक्त त्याच्यामुळेच आज मी इतकं मोठं शिवधनुष्य पेलण्याचं धाडस करू शकले. कोणे एके काळी आपलंही एक चाकोरीबद्ध पण सुदंर
Jul 15, 20193 min read
स्त्री मनावर फुंकर घालणारा प्रयत्न
सोलापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी 'चपराक प्रकाशन'ची सुनील जवंजाळ लिखित 'काळीजकाटा' ही कादंबरी वाचून दिलेली प्रतिक्रिया. ही कादंबरी घरपोच मागवण्यासाठी या लिंकला भेट द्या - http://shop.chaprak.com/product/kaalijkaata/ प्रिय जवंजाळ सर... स. न. वि. वि. आपण पाठवलेली कादंबरी मिळाली. आनंद वाटला .उत्सुकतेने वाचू लागलो. तस तशी उत्कंठा वाढत गेली. जे साहित्य उत्कंठा वाढवते तेच खरे साहित्य असते. सावली एक निरागस तरुणी. साहित्यावर प्रेम करते. तिच्या कवितासंग्रहाला पारि
Jul 11, 20192 min read
कोटीच्या कोटी उड्डाणे...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षापासून वृक्ष लागवड मोहिमेवर आणि पाणी प्रश्नांवर विशेष लक्ष दिल्याचे पहायला मिळते. वृक्ष लागवडीसाठी तेहतीस कोटीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कोणतीही योजना चांगली असते, आकर्षक असते, त्याची चर्चा होते; परंतु यंत्रणा त्याची कार्यवाही कशाप्रकारे करते यावरच त्याचे यशापयश अवलंबून असते. आजअखेर वृक्षारोपण आणि त्या अनुषंगाने होणारे कार्यक्रम टीकेचे विषय झालेले आहेत. तोच खड्डा, तेच रोपटे, तीच जागा, तेच
Jul 10, 20193 min read
कलंदर काकाची चाराछावणी!
परिसरात चाराछावण्यांची चर्चा सुरु होती. दुष्काळ पडलाय का? तर हो पडलाय! कोणाला दुष्काळ आहे तर सर्व मुक्यापशूंना. चाराछावणीवाल्यांनी थोडा वाटून घेतलाय. माणसं या मोदीसरकारनं बिघडीलीत... आपसात एकच चर्चा... ‘‘लाल्या अनुदान आलं का?’’ ‘‘ईमा आला का?’’ ‘‘कर्ज माफ झालं का?’’ ‘‘खालच्या बँकीत आलं का?’’ ‘‘वरच्या बँकीत आलं का?’’ ‘‘माव्ह संमदं कर्ज माफ झालं.’’ ‘‘हे बग मेसिज आलाय.’’ याशिवाय बोलणं नाही की चर्चा नाही. हे वाईटच आहे. भिकार्याला तुकडे टाकल्यासारखे झालेय. त्याच्यावर भीक मागण्याच
Jul 10, 20197 min read
झुमरी
माझ्या लेकीची नवी कोरी सायकल घरी आली अन् तिच्या आनंदाला उधाण आले. मला म्हणाली, ‘‘आई, तुझ्या बाईकला तू ‘हरणी’ म्हणतेस ना! मग माझ्या सायकलला नाव सुचव!’’ मी गमतीनंच म्हटलं ‘‘झुमरी..!’ घरातील सगळेच हसायला लागले अन् माझी मनी मात्र रुसून बसली. तिला काही हे नाव आवडले नाही पण मला मात्र जाम आवडले. या झुमरीने माझ्या बालपणातील हरवलेले कित्येक क्षण परत दिले. वाटून गेलं, सायकलचा वेग आपण आपल्या इच्छेप्रमाने कमी-जास्त करू शकतो. कुठं जायचं, कुठं थांबायचं, कुठं गतिमान व्हायचं अन् कुठून परत
Jul 8, 20192 min read
गोष्ट गुगलची
या एक-दीड दशकात वाचणे, लिहिणे, पाहणे, ऐकणे या क्रियापदांसारखे अजून एक क्रियापद आपल्याला ऐकायला मिळते, ते म्हणजे गुगल करणे! अर्थात ‘गुगल’वर शोधणे. गुगल या कंपनीचं नाव माहीत नसलेला एक साक्षर माणूस सापडणार नाही, अगदी असंच गुगलबद्दलचं चित्र आहे. आजच्या युगात गुगल म्हणजे एक माहितीचं भांडार आहे. कशाबद्दलही माहिती शोधायची असली की मग गुगल उघडा, अगदी इंटरनेट चालू आहे की नाही हेही तपासण्यासाठी लोक गुगलच उघडतात. एखादं ठिकाण शोधायचं असेल, मग गुगल मॅप्स वापरा. कोणतं पुस्तक मिळवायचं अ
Jun 21, 20196 min read
जनाबाईंच्या निवडक अभंगांचा विवेचक पुनर्विचार
महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे योगदान आहे. वारकरी संतांनी आपल्या विचारातून व कार्यातून समाजात प्रबोधन घडवून आणले. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखोबा, संत मुक्ताई इत्यादी संतांच्या अभंगांनी समाजात जागृती घडवून आणतानाच मराठीला समृद्ध केले आहे. संतसाहित्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे व वर्तमानातही होत आहे. ‘संत वाटिकेतील जाईची वेल’ म्हणून ज्यांना संबोधले जाते त्या संत जनाबाईंच्या निवडक अभंगांचा विवेचक अभ्यास प्रा. डॉ
Jun 17, 20193 min read
नगर-एक पर्यटन स्थळ
आम्हाला नगर शहरच नाही तर सबंध जिल्ह्याचा अभिमान आहे. अहमदनगर जिल्हा संतांची पावनभूमी म्हणून ओळखला जातो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ई.स. 1272 मध्ये ज्ञानेश्वरी कथन करताना ज्या खांबाला ते टेकून बसत तो नेवासे येथील ‘पैस’ खांब भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे. या पवित्र स्तंभावर चंद्र, सूर्य आणि शिलालेख कोरलेला आहे. नेवासे नगरहून केवळ 56 किलोमीटरवर आहे. देव आहे पण देऊळ नाही, घरे आहेत पण दारे नाहीत असं शनी देवाचं जागृत देवस्थान शनी-शिंगणापूर नगरपासून 38 किलोमीटरवर आहे. आंतरर
Apr 27, 20196 min read
हाऊ इज द जोश...?
दिवसभर पक्षाच्या कार्यालयात प्रचाराची तयारी पूर्ण करून रात्री तो उशीरा घरी येतो. कपाटातले पांढरे खादीचे कपडे बाहेर काढून, त्याला कडक इस्त्री करून, बुटाला पॉलिश करून न जेवता तो झोपतो. असंही त्याला जेवण जाणार नव्हतं कारण उद्याचा उजाडणारा दिवस हा त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तो ज्या पक्षासाठी, नेत्यासाठी दिवसरात्र लढायचा आज तोच नेता त्याच्या भागात, गावात येणार होता. शेजारच्या गावात तसं सभेचं रणशिंग फुंकेलेलं होतं. उद्या साहेबांना पाहता येणार, भेटता येणार, त्यांना केलेलं काम
Apr 9, 20193 min read
कामत गुरूजींची गोष्ट
कामत गुरूजी. नारायण विष्णुपंत कामत. वय वर्षे - 104. 1915 सालचा जन्म. शिक्षक म्हणून नोकरी. सुरूवातीचा पगार फक्त 4 रूपये तीस वर्षे नोकरी. त्यानंतर 60 वर्षे सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत. स्वातंत्र्यलढ्याचे साक्षीदार. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राधाकृष्णन, साने गुरूजी यांना पाहिले, ऐकले. आज कोल्हापुरातील आपल्या मुलांकडे वास्तव्य. ही एका शिक्षकाची आणि वयाची शंभरी पार केेलेल्या माणसाची गोष्ट. शिक्षक म्हणून नोकरी तीस वर्षे आणि त्यानंतर त्याच्या दुप्पट म्हणजे सुमारे 6
Apr 9, 20194 min read
बोलक्या रेषा
सकाळचा प्रहर जसजसा पुढे सरकतो तसतशी संवादाची साखळीही एक एक करुन पुढे सरकते. ज्योत से ज्योत जलाते चलो सारखं कडी से कडी मिलाते चलो, संभाषण धारा बढाते चलो असंच काहीसं. शब्द, संवाद हा मानवी जीवनातला अहम हिस्सा आहे. न बोलणं ही माझ्यासाठी शिक्षा आहे, सांगणारी कितीतरी माणसं तुम्हाला भेटतील. बोलणं ही काहींसाठी भावनिक गरजही असू शकते तर काहींचं जगणं हे त्यांच्या बोलण्यावर अवलंबून असतं. संवाद हा नेहमी चतुर असावा. तो करताना समोरच्याला न दुखावता त्याची चूक त्याला दाखवता येण्याचं कौशल्य त्
Apr 2, 20192 min read
bottom of page
.jpg)