top of page
साहित्य चपराक
साहित्य चपराक मासिक सप्टेंबर २०१७ अंक
साहित्य चपराक मासिक सप्टेंबर २०१७ अंक Read latest marathi magazine Sahitya Chaprak September 2017 ank online for free. साहित्य चपराक मासिक सप्टेंबर २०१७ अंक marathi magazines online free reading, read marathi magazine sahitya charprak online for free. Sahitya chaprak latest marathi magazine September 2017 ank available for free reading online. Read marathi masik online for free. Buy marathi books online published by chaprak prakashan online with free home delivery at Cha
Nov 26, 20171 min read
चपराक दिवाळी अंक २०१७ ऑनलाईन उपलब्ध
वाचकमित्रांनो नमस्कार! चपराक दिवाळी अंक आता तुम्ही ऑनलाईन देखील विकत घेऊ शकता. १० अथवा १० पेक्षा जास्त दिवाळी अंक घेतल्यावर प्रत्येक अंक आपणास १२५ रुपयात मिळेल. त्यासाठी " DIWALI17 " हा कूपन कोड पेमेंट करण्याआधी वापरा. दिवाळी म्हणजे प्रकाशोत्सव! अंधार दूर सारणार्या या सणानिमित्त आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘चपराक’चा दिवाळी महाविशेषांक प्रकाशित करीत आहोत. वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार साहित्यामुळे ‘चपराक’चा अंक एव्हाना तमाम मराठी बांधवांच्या घराघरात आणि मनामनात
Sep 27, 20174 min read
विषमतेचा पाया समता कशी आणणार?
भारतात राजकीय इतिहास लेखनाचीच विशेष परंपरा नव्हती, तर सामाजिक इतिहास कोठून मिळणार? जो इतिहास उपलब्ध आहे तो बव्हंशी मिथ्थककथा, कालविपर्यासाने भरलेला आणि त्रोटक स्वरुपाचा आहे. अनेकदा विविध काळात झालेल्या राजा-साहित्यिकांच्या नावातही साधर्म्य असल्याने सर्वांनाच एकच गृहीत धरत जो घोळ घातला गेला आहे त्याला तर तोड नाही. आदि शंकराचार्य नेमके कोणत्या शतकात झाले, याबाबतचा घोळ मिटलेला नाही. विक्रमादित्य नेमका कोण, हे आजही नीट समजलेले नाही. ते जाऊद्या, आद्य साम्राज्य स्थापन करणारा चंद्रग
Jul 7, 201713 min read
इतिहासाचे भीष्माचार्य - वा. सी. बेंद्रे
असे म्हणतात की, एकेक पायरी सोडवत गेल्यास गणित सुटते; मात्र इतिहासाचे तसे नसते! इतिहासलेखन जेव्हा पूर्ण होते तेव्हाच त्याला खरे फाटे फुटतात! म्हणूनच इतिहास लेखन हे आत्यंतिक जिकिरीचे आणि कष्टाचे काम असते. त्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो. तटस्थ वृत्ती लागते. ते जीवनध्येयच बनायला हवे. महाभारतकार व्यास मुनींनी म्हटलंय की, ‘इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे’ आपल्या राष्ट्राचा उज्ज्वल आणि स्फूर्तिदायी इतिहास समाजापुढे यावा यासाठी अनेकजण प्रामाणिकपणे झटत असतात. ज्यांना इतिहासलेखन क्षेत्रात
Jul 4, 20173 min read


आई मला पंख आहेत पण... (कथा)
एक मोठं झाड होतं. त्यावर अनेक पक्षी राहत होते. तिथं खूप सारे खोपे होते. एका खोप्यामध्ये तीन पक्षी होते. आई-बाबा आणि त्यांचे पिलू. दोघांचे आपल्या पिलावर खूप प्रेम होते. पिलू अगदी छोटेसे होते. चोचीतून आई-बाबा त्याला भरवत होते. दिवस जात होते. पिलू वाढत होते. खोप्यामध्येच खेळत होते. ‘तुला पंख आहेत. तू उडू शकतो. बागडू शकतो, पिलाला सांगण्यात आलं. शिकार्याच्या जाळ्यात अडकायचं नाही. सहजपणे मिळालेले अन्न घ्यायचं नाही. कष्टाने शोधूनच पोट भरायचं. असं सगळं आई-बाबा शिकवत होते. आता पिल
Jul 4, 20172 min read
वास्तवातील कैद
कल्पनेच्या जगात वावरत असताना कधीतरी मान वर करून बघावं, नकळत खूप काही दिसतं. नेमकं कुठं अन् कोणाकडं बघावं, कुठं लक्ष केंद्रीत करावं हे आपल्यावर असतं. मी असंच कल्पनेच्या जगात परंतु वास्तवरूपात जगत होते. तहान नाही, भूक नाही, झोप नाही, काही म्हणजे काहीच नाही. मनमुराद चाललं होतं सगळं! आनंदात कसलीच फिकिर नाही, की कसलीच चिंता नाही. अश्या वातावरणात बागडत असताना खर्या जगाची चाहूल लागता कामा नये. जर असं झालंच तर आतडे पिळवटून जातात, हातपाय निकामी होतात; नेमकं काय करावं हेच त्यावेळी सुच
Jul 3, 20174 min read
‘साहित्य चपराक’ दिवाळी २०१७ महाविशेषांकासाठी साहित्य पाठवा!
लिहित्या हातांना आवाहन... ‘साहित्य चपराक’ दिवाळी महाविशेषांकासाठी साहित्य पाठवा! ‘साहित्य चपराक’ दिवाळी महाविशेषांकाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील दर्जेदार साहित्याने नटलेला हा अंक वाचकप्रिय ठरला आहे. तब्बल पाचशे पानांचा आणि संपूर्ण बहुरंगी छपाई असलेला हा अंक सहा राज्यात वितरित होतो. आपणही या अंकात सहभाग नोंदवू शकता. त्यासाठी विषयाचे, साहित्य प्रकाराचे अथवा शब्दांचे बंधन नाही. ‘ गुणात्मक दर्जा ’ हा एकमेव निकष असेल. आपण जर काही सर्वोत्तम लिहिले असेल तर
Jul 1, 20171 min read
’गर्भ भाड्याने देणे आहे!’
घर भाड्याने देणे आहे, सायकल भाड्याने देणे आहे, टीव्ही भाड्याने देणे आहे, या श्रेणींत मानवी अवयवाने केव्हा स्थान मिळवले, कळलेही नाही. गर्भ भाड्याने देणे आहे किंवा गर्भाशय भाड्याने देणे आहे, काही वर्षांपूर्वी विचित्र वाटलेली या संकल्पना हळूहळू कळत नकळत आमच्या विचारात रुजू लागली आहे, नव्हे समाजात बर्यापैकी प्रस्थापित होऊ लागली आहे. कोणत्याही कारणाने स्त्री बाळाला जन्म देण्यास असमर्थ असेल व इच्छा असूनही तिला किंवा एखाद्या जोडप्याला स्वतःच्या अपत्याचे सौख्य लाभू शकत नसेल, अशा वेळ
Jun 29, 20174 min read
पहिले गौरवशाली साहित्य संमेलन : आदिवासी धनगर साहित्य संमेलन
दि. 7 व 8 जानेवारी 2017 रोजी पहिले ऐतिहासिक आदिवासी धनगर साहित्य संमेलनं सोलापूर येथे पार पडले. या साहित्य संमेलनामुळे नवा इतिहास घडला. धनगर समाजबांधवांना जगण्याची नवी उर्मी मिळाली. शेकडो वर्षांचा त्यांच्या जीवनातील काळोख दूर झाला. धनगरांचा एक नवा साहित्यिक प्रवाह सुरू झाला. सद्या सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. सर्व काही अभिमानास्पद आणि सुखद असेच आहे. त्यामुळे या साहित्य संमेलनाचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. हे संमेलन आयोजित करण्यामागे संयोजकांचा हेतू हा होता की, धनगर समाज
Jun 28, 20175 min read
सुंदर आठवणींचा सुंदर गोफ
खरंतर मी मनात गुंफलेला हा सुंदर आठवणींचा सुंदर गोफ आहे का? हा माझा मलाच पडलेला प्रश्न! जेव्हा मी उत्तर शोधायला जाते तेव्हा जगण्याचे अनेक पदर उलगडतात. मला तो काळ अजूनही पुसटसा आठवतोय. जास्त काही नाही पण पंधरा ते वीस वर्षापूर्वीचा! तेव्हा मी चौदा ते पंधरा वर्षांची असेन. त्यावेळी सुट्टी असली की मी आजोळी रहायला आजीकडे जायचे. आजीचं गाव माझ्या गावापासून जेमतेम सात-आठ किलोमीटर अंतरावर होतं. मामा-मामी, मामाची मुलं असं कुटुंब. आजोबांचा मोठा टोलेजंग वाडा होता! त्या वाड्यात सगळे भाऊ एक
Jun 28, 20176 min read
प्रशासकीय खेळीतील माहिती अधिकाराची भूमिका
माहितीचा अधिकार हा नियम किंवा कायदा सन 2005 मध्ये अस्तित्वात आला. त्याकरिता अण्णा हजारे यांचे योगदान महत्त्वाचे ठरते. त्यांनी उपोषण, मौनवृत याद्वारे शासनाला हा कायदा अस्तित्वात आणण्यास भाग पाडले. कारण या कायद्याबाबत शासनव्यवस्था व राजकारणी हे चालढकल करीत होते. अशा नाकर्तेपणामुळेच अण्णा हजारे यांना हा मौनव्रत व उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. या कायद्याचा फायदा प्रत्येक घटकास झाला. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटू लागले. त्यांना एक प्रकारे माहिती अधिकार नियमाचा वापर करून शासनाकडू
Jun 27, 20178 min read
एकाच या जन्मी जणू...
इतक्यात वटपौर्णिमा संदर्भात एक वेगळी बातमी टिव्हीवर पाहिली व वर्तमानपत्रात देखील वाचली. ती बातमी म्हणजे वटपौर्णिमेला पुरुषांनीही पत्नीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाला धागा बांधून वडाला फे-या मारल्या व वडाची पूजा केली. आणि हा उपक्रम स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणारा आहे असे सांगण्यात आले. आपला समाज परिवर्तनशील आहे. वेळोवेळी बदलत्या काळानुसार आपल्या समाजात परिवर्तन घडून येते आणि समाजाने ते परिवर्तन उशीरा का होईना स्वीकारलेले आहे. पुरुषांनी बायकोसाठी वडाची पूजा करणं हे स
Jun 27, 20173 min read
अगतिक, वास्तविक, प्रामाणिक, प्रेमळ, मायाळू क्षण!
काही क्षण हे असे असतात की जे काळजात खोलवर रुतून बसलेले असतात. आपण जेव्हा एकांतात असतो तेव्हा हे क्षण असे काही छळतात ना की विचारू नका! ह्या क्षणांचे गणित जरा वेगळेच असते. ते काय व कसे आपल्या स्मृतीपटलावर अवचित उमटून जाते ना तेच तर कधी कधी कळतच नाही. त्यात जर का हे क्षण प्रेमाचे असतील ना तर काही विचारूच नका. मनाची जी काही हळवी आणि केविलवाणी अवस्था होऊन जाते ना की पहायलाच नको! हेच ते क्षण जेव्हा आपल्या आयुष्यात आधी कधी तरी येऊन गेलेले असतात; पण त्यावेळेस त्या क्षणांचे महत्त्व म
Jun 27, 20172 min read
धोका प्रतिक्रियावाद्यांचा!
मध्यंतरी व्हॉट्स ऍपला एक विनोद आला. एकदा एक परदेशी कुत्रा भारतात आला. देशी कुत्र्यांनी त्याला विचारलं, ‘‘मित्रा, तुमच्याकडे कशाची कमतरता होती, ज्यामुळं तू इथं आलास?’’ तो म्हणाला, ‘‘आमच्याकडं राहणीमान, वातावरण, खाणंपिणं, जीवनाचा स्तर सगळं इथल्यापेक्षा कैक पटीनं झकासच आहे.... पण भुंकण्याचं जे स्वातंत्र्य भारतात आहे तसलं स्वातंत्र्य जगात कुठंही नाही...!’’ यातील विनोदाचा भाग सोडला तरी किती खरे आहे हे! कुणीही उठतो आणि वाटेल ते मत मांडून मोकळा होतो. ‘अभिव्यक्ती’च्या नावावर आपण फक्
Jun 18, 20174 min read
आयुष्यावर बोलतो काही!
जगण्यासाठी मरतो कशाला, मरण्यासाठीच जगणे हे कर्म तू करीत रहा, फळ ज्याचे त्यातच आहे नको करूस क्रोध त्रागा, जो तुलाच तुझ्यापासून दुरावेल तू तुझाच आहेस, परंतु सर्वांना हवा आहेस दु:ख हे सर्वांनाच असते, नाही त्यातून तुझी सुटका दु:खातही सुख शोधावे, हेच जीवनाचे सार्थक आहे आपले आयुष्य हे आपणच घडवायचे असते, हे सांगावयास का लागते हे मात्र मलाच काय पण बर्याचजणांना कळत नाही. म्हणूनच मला माझ्या ‘जगावे परी कीर्तिरूपे उरावे’ ह्या कवितेच्या ओळी आठवल्या. आयुष्याचे खूप मोठे तत्त्वज्ञान ह्यात
Jun 18, 201710 min read


विठ्ठलाचे ‘देखणे’
वारकरी संप्रदायाच्या सानिध्यात आयुष्याचं मार्गक्रमण असताना वाटेत दिसणारी प्रत्येक व्यक्ती ही तुकोबा-माऊलींच्या रूपात पाहणे आणि त्यांच्यातला अंतर्रुपी विठ्ठल शोधणे यात जे आध्यात्मिक, आत्मिक समाधान मिळते, त्याची तुलना जगात कुणासोबतही होऊ शकत नाही. या आनंदातून मिळणारी विठ्ठलाच्या सहवासाची एकरूपता ही जगण्याच्या वास्तवाचं भान मिळवून देते. शेवटी वारी म्हणजे काय तर तुम्हाला मिळालेला सर्वसामान्यांच्या आध्यात्मिकतेचा आत्मिक साक्षात्कारी आनंद... आणि त्यातून विठ्ठलाचं देखणेपण रामरूपी चं
Jun 18, 20174 min read


वाडे चिरेबंदी; रस्ते माणुसकीचे!
पाचशे वर्ष दिमाखाने उभी असणारी किल्ल्याची वास्तू जशी नगरची शान आहे, तशाच अनेक ऐतिहासिक वास्तू देखील शहरात आहेत. नगर शहरात नऊ वेशी होत्या! पैकी माळीवाडा आणि दिल्ली दरवाजा वेस आजही अस्तित्त्व टिकवून आहेत. त्या पाडण्याची मोहीम निघाली होती पण इतिहास संशोधकांनी कोर्टात जाऊन त्या वाचवल्या. त्यावेळी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार ह्यांची मदत झाल्याचा इतिहास आहे. बागरोजा, दमडी मशीद, चांदबीबी महाल अशा अनेक वास्तू नगरची शान आहेत; तरीही आम्हाला आठवतात ते आमचे दगडी वाडे! आमच्या शाळेच्या
Jun 18, 20173 min read


महिलांच्या विकासाचा निर्धार हाच खरा पुरुषार्थ
सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले तर आजची स्त्री ही दिवसेंदिवस नुसती शिकत नाही तरी ती सुशिक्षित होऊन आपल्या समाजाला निश्चितपणे प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते आहे हे चित्र आज सर्वदूर पहायला मिळते आहे. ह्याची पाळेमुळे एकोणविसाव्या शतकातच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांनी समाजात रुजवून आपल्या समाजावर फार मोठे उपकारच केले आहेत असे नमूद करणे गरजेचे वाटते. ज्या काळी स्त्री ही फक्त चूल आणि मूल ह्यासाठीच जन्माला आली आहे असा प्रघात असताना त्यांनी केलेले हे धाडस आज एकविसाव्या शतकात म
Jun 16, 20173 min read
ही नोकरी सोड
‘काय रे कुठं काम करतो? पगार किती आहे?’ हे बोलणं ऐकू आलं आणि माझ्या आठवणी जाग्या झाल्या. कारण मलाही असे प्रश्न विचारणारे भरपूर होते. तेव्हाची ही गोष्ट. तेव्हा मी नुकताच कॉलेज संपवून नोकरीच्या शोधात होतो. एका ठिकाणी कामही मिळालं होतं; पण अचानक आई आजारी पडली म्हणून नोकरी सोडून घरी यावं लागलं. एके दिवशी आईला घेऊन जवळच नवीन झालेल्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला गेलो होतो. हॉस्पिटलमधील काम झाल्यानंतर मी सहज विचारावं म्हणून चौकशीच्या खिडकीत विचारलं, ‘‘इथं काही काम मिळेल का?’’ कारण
Jun 16, 20177 min read
माझं लिखाण!
ज्या समाजात आपण राहतो, ज्या समाजाने आपली जडणघडण केली त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. विधात्याने जर माझ्या हातात लिखाणाचे कौशल्य दिले असेल तर मी माझी लेखणी समाजाला काहीतरी चांगलं देण्यासाठी वापरावी किंबहुना प्रत्येक कलावंताने आपली कला समाज समृद्धीसाठीच निर्माण करावी असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातूनच मी लिहितो. 1991 साली माझे पहिले पुस्तक प्रकाशित झाले ते विविध मासिकातील विनोदी कथांचे. आजवर छोटी मोठी मिळून 27 पुस्तके माझ्या नावावर आहेत. मला तर वाटतं कवितांप्रमाणेच गद
Jun 14, 20176 min read
bottom of page
.jpg)