top of page

‘साहित्य चपराक’ दिवाळी २०१७ महाविशेषांकासाठी साहित्य पाठवा!

लिहित्या हातांना आवाहन... ‘साहित्य चपराक’ दिवाळी महाविशेषांकासाठी साहित्य पाठवा! ‘साहित्य चपराक’ दिवाळी महाविशेषांकाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील दर्जेदार साहित्याने नटलेला हा अंक वाचकप्रिय ठरला आहे. तब्बल पाचशे पानांचा आणि संपूर्ण बहुरंगी छपाई असलेला हा अंक सहा राज्यात वितरित होतो. आपणही या अंकात सहभाग नोंदवू शकता.

त्यासाठी विषयाचे, साहित्य प्रकाराचे अथवा शब्दांचे बंधन नाही. ‘गुणात्मक दर्जा’ हा एकमेव निकष असेल. आपण जर काही सर्वोत्तम लिहिले असेल तर 15 जुलै 2017 पर्यंत आमच्याकडे पाठवू शकता.

साहित्य निवडीचा अधिकार अर्थातच आमच्या संपादकीय सहकार्‍यांचा आहे. अस्विकृत साहित्य परत पाठवले जात नाही. ज्या साहित्याची निवड झालीय त्यांना 20 जुलैपर्यंत कळवले जाईल. त्याबाबत वेगळा पत्रव्यवहार अथवा दूरध्वनीवर सातत्याने विचारणा करू नये!

आपण जर लेखनाचे काही वेगळे प्रयोग केले असतील तर लाखो वाचकांपर्यंत पोहोचण्याची ही संधी आहे.

साहित्य पाठवण्याचा पत्ता - मासिक ‘चपराक’, 617, साईकृपा, पहिला मजला, शिवाजी रस्ता, शुक्रवार पेठ, पुणे 411 002. दूरध्वनी - 020- 24460909 ई-मेल - chaprakdiwali@gmail.com

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page