top of page
विशेष लेख
तरूणाईच्या काळजात घर केलेली ‘काळीजकाटा’
‘एकवेळ माझं साहित्य बाजूला ठेवा पण या नव्या दमाच्या प्रतिभावंत लेखकाचं आवर्जून वाचा,’ असं सांगणारे दिग्गज साहित्यक्षेत्रात दुर्दैवानं कमी झालेत. जे थोडेफार आहेत त्यांच्यामुळे हा साहित्यगाडा अव्याहतपणे सुरू आहे. अशाच गुणग्राहक लेखकांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे पंढरपूर येथील सुप्रसिद्ध ग्रामीण लेखक, विचारवंत डॉ. द. ता. भोसले. उमलत्या अंकुरांना बळ देण्यात भोसले सर कायम आघाडीवर असतात. त्यामुळेच त्यांनी लावलेली अनेक रोपटी आज फुला-फळांनी बहरताना दिसत आहेत. नेहमीप्रमाणे त्यांचा मल
Mar 11, 20194 min read
वा. ना. उत्पात यांचा ‘चपराक’कडे खुलासा
सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे नाव ‘अहल्या’ असावे अशी अपेक्षा साहित्यिक आणि विचारवंत वा. ना. उत्पात यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानानंतर धनगर बांधवात असंतोष पसरला होता. समाजशास्त्राचे अभ्यासक आणि इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी उत्पातांचे विधान सप्रमाण खोडून काढले. ‘चपराक’ने हे वृत्त प्रकाशित करताच वा. ना. उत्पात यांनी त्यांचा खुलासा ‘चपराक’कडे पाठवला आहे. तो त्यांच्याच शब्दात. पुण्याश्लोकी अहिल्याबाईंच्या नावाला माझा विरोध नाही -
Mar 9, 20191 min read
अहिल्यादेवी हेच नाव बरोबर!
वा. ना. उत्पातांनी समाजाची माफी मागावी संजय सोनवणी यांची मागणी होळकर घराण्याबाबत वारंवार खोटे आक्षेप घेत प्रवाद पसरवले जातात. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव देण्यासही होळकरांबद्दल असलेल्या असुयेपोटी विरोध केला जात होता. ‘विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव दिले तर समाजात तेढ माजेल’ असे वादग्रस्त विधानही शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी केले होते. आता विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यानंतर ज्यांचा पोटशूळ उठला आहे ते आता अनैतिहासिक वायफळ वाद उकरुन काढत आहेत. यामुळे समाजात
Mar 9, 20192 min read
स्वत: प्रथम हिंदू व्हा!
माझे मित्र प्रशांत आर्वे यांनी माझ्या हिंदू धर्म आणि वैदिक धर्म स्वतंत्र आहेत या सिद्धांतावर आक्षेप घेत एक लेख लिहिला. या लेखात त्यांनी भारतात घडलेल्या अनेक घटनांचा उल्लेख करत माझे मत हे समाजशास्त्रीयदृष्ट्या कसे विघातक ठरू शकते हे दाखवण्याचाही प्रयत्न केला आहे. तो ‘साहित्य चपराक’च्या जानेवारीच्या अंकामध्ये प्रसिद्ध झाला. या निमित्ताने सांस्कृतिक चर्चेला महाराष्ट्रात बहर येऊ पाहतो आहे हे निश्चितच सुखावह आहे. त्यांच्या आक्षेपांना सविस्तर उत्तर देणे हे महत्त्वाचे आहे कारण हे व
Mar 7, 201915 min read
सोनवणी सर, उत्तर द्या!
1999 मध्ये पोप जॉन पाल द्वितीय भारतात आले आणि त्यांच्या दिल्ली येथील वास्तव्यात त्यांनी जे विधान केले त्याचे पडसाद देशात आणि माहाराष्ट्रात देखील आजतागायत उमटत आहेत. ते म्हणाले होते, ‘‘पहिल्या सहस्रकात आम्ही संपूर्ण युरोप ख्रिस्ती केला. दुसर्या सहस्रकात संपूर्ण अमेरिका आणि आफ्रिका आम्ही पादाक्रांत केला; आता येत्या एकविसाव्या शतकात आशिया आणि विशेषतः भारत आमचे लक्ष असणार आहे.’’ सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना 1999 ते 2018 याकाळात भारतात वाढलेल्या विघटनवादी शक्ती, द्रविडस्था
Mar 5, 20197 min read
निर्मितीच्या वाटेवर-इंदिरा ते मोदी
मराठी ही सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषांत जगात दहाव्या क्रमांकार आहे. असे असतानाही आपल्याकडे ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ असं सातत्यानं सर्व माध्यमांतून सांगितलं जातं. भाषा नष्ट होतेय का? याबाबतची चर्चा आपल्यासाठी नवीन नाही. यापूर्वी शंभरहून अधिक वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 1908 साली पुण्यात एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. विषय होता, ‘मराठी भाषा मृतावस्थेला जाते आहे काय?’ या परिसंवादाचे अध्यक्ष होते इतिहासाचार्य वि. का. राजवाडे. सर्व मान्यवरांनी भाषेच्या अस्तित्वाबद्दल
Mar 4, 20195 min read
नव्या भारताची सुरवात
हिंदीमध्ये एक उक्ती आहे, ‘लातो के भूत बातो से नही मानते.’ पाकिस्तान हा जगातला एक देश असा आहे की ज्याला कुठलीच मानवी भाषा कळत नाही. त्याला कंबरेत लाथ किंवा बंदुकीचीच भाषा कळ्त असेल तर त्याच भाषेत त्याच्याशी संवाद करण्याला पर्याय उरत नाही पण प्रश्न पाकिस्तानचा असण्यापेक्षाही आपल्याच देशातल्या बुद्धीचे अजिर्ण झालेल्या दिवाळखोरांचा आहे. मागली तीन दशके पाकिस्तान सतत दहशतवाद व जिहादी हिंसेचे हत्यार उपसून भारतात थैमान घालत असतानाही त्याच्याशी संवाद साधावा आणि दक्षिण आशियात शांतता
Mar 4, 20196 min read
एक मुलाखत
1989 चा तो काळ होता. म्हणजे त्याला आज जवळ-जवळ 30 वर्षे झालीत. तरीही असं वाटतंय की हे सगळं अगदी काल-परवाच घडलंय की काय! हो, अगदी खरं आहे हे. हे माझ्याच नाही तर तुमच्या सुद्धा बाबतीत असंच काहीसं घडलेलं असणार, घडत असणार. मी फक्त मन मोकळं करून हे अनुभव शब्दबद्ध करून माझ्या ह्या अविस्मरणीय स्मृतींचा हा अनमोल ठेवा जतन करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. तसेच त्यानिमित्ताने तुम्हा रसिक वाचकांशी संवाद साधण्याचे हे एक उत्तम असे साधन समजतोय. चूक भूल माफ असावी! आकुर्डीतील एका खाजगी कं
Mar 3, 20198 min read
‘अर्धशतकातला अधांतर’ आणि ‘काळीजकाटा’चे धडाक्यात प्रकाशन
मुंबईत ब्राह्मण उद्योजक परिषद संपन्न मुंबई : येथे पितांबरी उद्योग समूहाचे प्रमुख रवींद्र प्रभुदेसाई, गोविंद हर्डीकर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम स्वित्झर्लंडचे चेअरमन योगेश जोशी, भालचंद्र कुलकर्णी, संजय ओर्पे, ‘चपराक’चे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील अशा अडीचशे उद्योजकांच्या उपस्थितीत ‘ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्स’ पार पडली. यात ‘चपराक’तर्फे सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ‘ अर्धशतकातला अधांतर-इंदिरा ते मोदी ’ या पुस्तकाचे आणि वाचकप
Mar 2, 20192 min read
मराठी भाषा दिनानिमित्त 'चपराक'ची विशेष योजना
त्वरा करा... ‘चपराक प्रकाशन’ची भव्य योजना 1500 रूपयांचा संच अवघ्या 999 रूपयांत! मराठी भाषा दिनानिमित्त दहा दर्जेदार पुस्तके या योजनेतील पुस्तके कॉलेज गेट (कादंबरी) - सागर कळसाईत काळीजकाटा (कादंबरी) - सुनील जवंजाळ कुंकू ते दुनियादारी (चित्रपट संशोधन) - डॉ. राजेंद्र थोरात हॅप्पी रिटर्न्स (कथासंग्रह) - सदानंद भणगे आदमची गोष्ट (कथासंग्रह) - संजय सोनवणी गंध माणसांचा (प्रेरक चित्रणे) - संजय वाघ आई (ललित लेख) - द. गो. शिर्के बाळासाहेब एक अंगार (चरित्र) - नागेश शेवाळकर ‘ती’च्या मन
Feb 16, 20191 min read
विद्यापीठ नेटवर्कींगच्या जाळ्यापुढे ‘स्पायडरमॅन’ नमला
विद्यापीठ हे शिक्षणक्षेत्र. शासकीय विभाग. इतर विभागांसारखेच त्याचे प्रशासकीय संबंध इतर विभागांशी. त्यामध्ये सहसंचालक, संचालक (उच्च शिक्षण विभाग), उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय, समाजकल्याण विभाग, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालयाचा वित्त व सामान्य प्रशासन विभाग, कुलपती तथा राज्यपाल कार्यालय, राष्ट्रीय मूल्यांकन (नॅक) कार्यालय, बेंगलोर, विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली, नियोजन विभाग, मनुष्यबळ विकास मंत्रालय, नवी दिल्ली, पोलीस प्रशासन, अनुसूचित जाती-जमाती आयोग, नवी दिल्ली, मानवी हक्
Jul 4, 20177 min read


धडाकेबाज महेश भागवत
स्वातंत्र्यानंतर खाकी आणि खादी हीच आपल्या देशाची ओळख झाली. मात्र हे दोन्ही घटक इतके बदनाम झाले की लोक खाकी आणि खादीवाल्यांचा सर्वाधिक तिरस्कार करू लागले. त्यांना शिव्या घालू लागले. यांच्यातीलच काहींनी हे क्षेत्र पुरते बदनाम केले. असे असले तरी या क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक लोकानी या क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. सगळंच काही संपलेलं नाही हा विश्वास निर्माण केला आणि चांगुलपणाच्या जोरावर सामान्य माणसाच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. खाकीतला माणूस जेव्हा
Jul 3, 20175 min read
संवाद साधनांद्वारे किती होतोय खराखुरा संवाद?
‘मेरे पिया गये है रंगून, किया है वहां से टेलिफुन; तुम्हारी याद सताती है, जीया मे आग लगाती है...’ हे प्रचंड गाजलेलं गीत आहे! 1949 साली आलेल्या ’पतंगा’ या चित्रपटासाठी प्रसिद्ध गायिका शमशाद यांनी गायलेलं. कोणत्याही कलाकृतीवर तत्कालीन समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव असतो हे विचारात घेऊन हे गीत ऐकल्यास लक्षात येते की त्या काळी समाजाला टेलिफोनचे किती प्रचंड कौतुक होते! दूरवरच्या जीवलगाला टेलीफोनवर बोलता येणे ही बाबच मुळी प्रचंड कुतुहलाची आणि कौतुकाची! शमशाद बेगमच्या आवाजातून हा भाव ख
Jun 29, 20176 min read


ग्रंथ व्यवहार - दशा आणि दिशा
महाराष्ट्रात 1970-80 च्या दरम्यान मोजकेच प्रकाशक होते. त्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि नंतर नाशिकचा समावेश होता. सोलापूरात एक प्रकाशक कार्यरत आहे. दैवयोगाने पूर्वी अनेक मात्तबर लेखक होते. त्यामुळे प्रकाशकांची चलती होती. त्यांच्यात स्पर्धा नव्हती. त्यावेळी प्रकाशकांकडे शालेय क्रमिक पुस्तके असल्याने लाखोंची विक्री व्हायची. त्यातून त्यांनी भव्य इमारती बांधल्या. त्यामुळे त्या संस्था नावारूपाला आल्या. 80 च्या दशकानंतर नवनवीन प्रकाशन संस्था उदयास आल्या. त्यात का
Jun 28, 20175 min read


अपूर्व मेघदूत : हृदयद्विजेत्या प्रतिभेचा रंगमंचीय आविष्कार!
आषाढाच्या पहिल्याच दिवशी कवीकुलगुरू कालिदासांचे मेघदूत रंगमंचावर जिवंत अवतरलेले पहायला मिळणे हे भाग्यच आहे. मेघदूत हा निवांत वाचत अनुभवण्याचा विषय अशी सर्वसाधारण समजूत असल्यास नवल नाही. कालिदासाची प्रतिभाच एवढी की काव्याविष्कारात जेव्हा तो बोलतो तेव्हा तो हृद्य प्रतिमांच्या विलक्षण जगात घेऊन जात असतो. मेघदूतात त्याने विरही यक्षाचा पत्नीला संदेश देण्यासाठी निवड केलीय तीही एका मेघाची. कालिदासाशिवाय मेघ-दूताची निवड तरी कोण करणार? हे अजरामर काव्य मंचित करण्याचा विचार करणे हाच एक
Jun 25, 20172 min read
असहिष्णुता चांगली की वाईट?
सध्या प्रसारमाध्यमांद्वारे सर्वात जास्त चर्चिल्या जाणार्या ‘असहिष्णुता’ या शब्दाच्या मुळाशी जाताना आधी हा ज्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे त्या ‘सहिष्णुता’ या शब्दाकडे लक्ष द्यायला हवे. मुळात इंग्रजी प्रसारमाध्यमांनी चर्चेत आणलेल्या ‘टॉलरन्स’ या इंग्रजी शब्दाचे हे मराठी भाषांतर आहे. सध्या भारतात असहिष्णुता आहे की नाही, यावर मोठा वाद चालू आहे आणि नजिकच्या भविष्यकाळात हा वाद संपुष्टात येण्याचे काहीच चिन्ह दिसत नाही. यातही वैशिष्ट्यपूर्ण भाग असा की, दोन्ही बाजूंचे प्रतिद्वंद्
Jun 24, 20179 min read


बदल्यांचे राजकारण : नोकरशाहीतील माफियांचे वर्चस्व
बदल हा निसर्गाचा नियम आहे. पशु-पक्षी काळ व वातावरणानुसार स्थलांतर करतात. वृक्षांची पानेदेखील गळणे, नवी पालवी येणे, नदीच्या-ओढ्यांच्या पाण्याची पातळी पावसाळ्यात वाढणे किंवा उन्हाळ्यात कमी होणे, तारुण्य जाऊन वार्धक्यात त्वचेला सुरकुत्या येणे, आजारपणात हवाबदल करणे हा त्या बदलांचा एक भाग आहे. परंतु नोकरशाहीच्या भाषेत हा बदल म्हणजे ‘बदली’ समजला जातो. पण ‘बदली’ हा शब्द जरी उच्चारला तरी नोकरदार वर्गाच्या पोटात भीतीने गोळा येतो. घरापासून दूर अंतरावर किंवा परगावी बदली, कुटुंबापासून ला
Jun 24, 20176 min read
कार्ल मार्क्स समजून घेताना...
आजवर या जगावर अनेक विचारवंत, कलाकार, राज्यकर्ते, लेखक इत्यादींनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे, चांगला किंवा वाईट प्रभाव टाकला. त्यातूनच आजचा समाज घडला. आपल्या समाजाच्या सद्यस्थितीस कारणीभूत असलेले कित्येक विचारवंत आपल्याच नव्हे तर इतिहासाच्या देखील विस्मृतीत गेले आहेत. काही व्यक्ती असतात ज्या या कालपटलावर आपल्या विचारांनी स्वतःच एक अढळ स्थान निर्माण करतात. त्यातलाच एक विचारवंत म्हणजे कार्ल मार्क्स! आजच्या जगावर ‘न भूतो, न भविष्यती’ असा प्रभाव टाकणार्या मार्क्सला तटस्थपणे सम
Jun 23, 20177 min read
पाऊले चालती पंढरीची वाट
पाऊले चालती पंढरीची वाट । सुखी संसाराची सोडूनीया गाठ ॥ असं म्हणत विठूरायाची लेकरं पावसा-पाण्याची, वादळ-वार्याची तमा न बाळगता पंढरपूरला जायला निघतात. संतजनांच्या पालख्या आपापल्या ठिकाणांहून निघतात. एकत्र येतात जणू वेगवेगळ्या सरिताच एकत्र येऊन त्यांचा महासंगम होतो आणि ही भावसरिता त्या पंढरपूरच्या कल्लोळात विलीन होण्यासाठी प्रवाहीत होते. विटेवर उभ्या सावळ्या परब्रह्माला भेटण्यासाठी, त्याला कडकडून मिठी मारण्यासाठी, त्याच्या पायावर डोई ठेवण्यासाठी, निदान त्याचं मुखदर्शन घेण्यासा
Jun 19, 20173 min read
कोविंदाऽ कोविंदाऽऽ कोविंदाऽऽऽ
भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर केले आहे. कोविंद हे उत्तरप्रदेशातील कानपूर येथील असून दोन वेळा भाजपतर्फेच राज्यसभेवर गेले होते. अगदी प्रारंभीपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून भाजपच्या दलित मोर्चाचे अध्यक्ष होते. आदिवासी असलेल्या द्रोपदी मुरूमू यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीने कोविंदा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे र
Jun 19, 20173 min read
bottom of page
.jpg)




