top of page

वा. ना. उत्पात यांचा ‘चपराक’कडे खुलासा

  • Mar 9, 2019
  • 1 min read

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे नाव ‘अहल्या’ असावे अशी अपेक्षा साहित्यिक आणि विचारवंत वा. ना. उत्पात यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानानंतर धनगर बांधवात असंतोष पसरला होता. समाजशास्त्राचे अभ्यासक आणि इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी उत्पातांचे विधान सप्रमाण खोडून काढले. ‘चपराक’ने हे वृत्त प्रकाशित करताच वा. ना. उत्पात यांनी त्यांचा खुलासा ‘चपराक’कडे पाठवला आहे. तो त्यांच्याच शब्दात.पुण्याश्लोकी अहिल्याबाईंच्या नावाला माझा विरोध नाही - उत्पात

सोलापूर विद्यापीठाचे नाव पुण्यश्‍लोकी अहल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ असे दुरूस्त करावे, हे माझे वैयक्तिक मत आहे. अहल्याबाईंची थोरवी सर्व भारतात बद्रीनाथ ते कन्याकुमारी पर्यंत आजही गायिली जाते. त्यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला दिल्याने सोलापूर विद्यापीठाचा गौरव झाला आहे. माझ्याकडे धनगर समाजातील काही बांधव आले व त्यांच्या आहे त्या नावाचा आग्रह आहे, असे सांगितले. माझा त्या नावाला विरोध नाही. मी पुण्यश्‍लोकी अहल्यादेवींवर पुस्तक लिहिले आहे. त्यांचा स्मृतीदिन मी श्री रूक्मिणी मंदिरात अनेक वर्षे साजरा करीत होतो. त्यांच्या जीवनावर मी अनेक व्याख्याने दिली आहेत. इतका त्यांच्याविषयी मला आदर आहे. या विषयावर कलह होऊ नये. सर्व समाजाला आहे हे नाव मान्य असेल तर माझा काहीही आक्षेप नाही. - भागवताचार्य वा. ना. उत्पात पंढरपूर

संजय सोनवणी यांची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा - http://chaprak.com/2019/03/ahilyadevi-hech-nav-barobar/

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page