‘देवाचा नगारा’ | 'The Drum of God’
- साहित्य चपराक । Sahitya Chaprak

- 5 days ago
- 7 min read
Updated: 2 days ago
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘देवाचा नगारा’ या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखाचे विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी केलेले रसग्रहण.
भारतरत्न लता मंगेशकर यांचा चौथा स्मृतीदिन आहे. सहा फेब्रुवारी 2022 रोजी वसंत पंचमीच्या पवित्र मुहूर्तावर या जगातून त्यांचे महानिर्वाण झाले. हृदयनाथजी त्यांच्या भगिनी लतादीदींच्या आठवणींचा स्मृतिपट लेखांच्या शृंखलेतून स्वतःच्या शब्दांत मांडत आहेत. त्यांचे लेखन म्हणजे एक प्रकारच्या समिधाच आहेत. त्या वाचकांच्या अंतरात अनंतकाळ मंगेशकर घराण्याच्या अग्निशिखा शिलगावत ठेवतील. समिधा रुक्ष भासल्या तरी कधीकाळी त्या हिरव्यागार, रसरशीत, मृदुल असतात पण त्यात अग्नी ज्वलंत करण्याचे तेज त्या सुकुन रुक्ष झाल्यावरच येते. एकदा का कोवळ्या शाखेस समिधा स्वरुप प्राप्त झाले की त्यानंतर त्या अंतरअग्नी फुलवण्याची क्षमता अंगी बाणवतात. कोणतेही सामान्य गवत समिधा बनत नाही. समिधा बनण्यासाठीची पवित्रता, श्रेष्ठत्व, भव्यत्व जन्मजात असणे आवश्यक असते. एका खानदानी डेरेदार वृक्षाचीच ती शाखा असावी लागते. अग्नीकुंडात ज्याप्रमाणे समिधा स्वाहा केल्या जातात त्याप्रमाणे लतादीदींनी स्वतःच समिधास्वरूप साक्षी होऊन लहानपणापासून हृदयनाथांच्या मनात बाबांच्या दुःखाचे अग्निहोत्र ज्वलंत ठेवलेले होते.

लतादीदी स्वतःच तेजस्विता, द्रष्ट्या, ईश्वरीय आत्मा होत्या. त्यांच्या तेजस्वी अमृत स्वरांनी संपूर्ण भारतीय समाज गेली नऊ दशके प्रभावित झालेला आहे.
असे म्हणतात जातिवंत प्रतिभावंत कलाकार प्रतिभा जन्मजात घेऊन जन्मास येतो तरी सद्गुरुंच्या सहवासात त्याच्या कलेस पैलू पाडून कला बहुगुणी खुलते हे लतादीदींनी स्वतः अनुभवले होते. त्यांचे वडील प्रत्यक्षात मास्टर दीनानाथांची तालीम त्यांना मिळाली होती. तशी तालीम हृदयनाथजींना वडिलांकडून प्रत्यक्षात मिळाली नव्हती कारण ते साडेचार वर्षांचे असताना त्यांचे वडील स्वर्गवासी झाले होते. त्यामुळे वयात येणाऱ्या हृदयनाथांशी लतादीदी दररोज संवाद साधत असायच्या. ज्येष्ठ भगिनी, गुरुत्व व ममत्वाने ओतप्रोत असलेल्या दीदी त्यांचे लहान बंधू हृदयनाथ यांच्याशी जाणीवपूर्वक संवाद साधायच्या हे लक्षात येते. दीदींचे बाळशी (हृदयनाथांचे बालपणीचे नाव) झालेले त्या काळातील हितगूज म्हणजे बाळच्या मनात संस्कारांची, मंगेशकर घराण्याची बीजे पेरणीच होती असे हृदयनाथजींच्या लेखनातून जाणवते. या संवादातून त्या युवा हृदयनाथला घडवत आहेत असे लक्षात येते. जसे माता जिजाऊंनी बाल शिवबास घडविताना सनातनी पुराणातल्या कथा तर ऐकवल्या होत्याच पण त्या सोबत शहाजी राजांच्या आगतिकतेची जाणीवही करुन दिली होती. अगदी तसेच लतादीदींनी बाळासाहेब मंगेशकरांना आईच्या ममतेने व दूरदृष्टिकोन ठेवून घडविले होते.
लतादीदी बाळ हृदयनाथशी बोलताना त्यांचे बाबा मास्टर दीनानाथ यांची गोव्याच्या मंगेशी मंदिरातील एक आठवण सांगतात.
“लता इथेच थांब. पुढे जाऊ नकोस. ही जागा म्हणजे आपला गाभारा. हा नगारा बघतेस ना! तोच आपला मंगेश.” - बाबा म्हणतात.
“पण बाबा... मंगेशापासून आपण खूप लांब उभे आहोत,” लता.
बाबांनी म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी छोट्या लताला ही जाणीव करून दिली होती की मंगेशीच्या मंदिरातील नगाऱ्याची जागा हीच आपली हद्द आहे. त्यापुढे आपण जाऊ शकत नाही, याचे शल्य त्यांच्या मनात असावे. त्याच मंगेशाची सेवा त्यांनी आयुष्यभर केली आणि मंगेशाच्या आशीर्वादाने पुढे बाबांचे मंगेशकर हे आडनाव केवळ आडनाव म्हणून परिचित नाही तर भारतीय स्वरांचा पंचाक्षरी मंत्र म्हणून जगप्रसिद्ध झाले.
हृदयनाथजी लिहितात, “दीदींच्या मनात बाबा कसे होते? दिव्य सौंदर्याने नटलेले बाबा उभे होते. ते दिव्य सौंदर्य कसे होते? बाबांच्या दिव्यत्वाची प्रचीती लतादीदींना लहानपणीच आली होती.” यासाठी हृदयनाथजींनी ज्ञानेश्वरीतील विविध अद्वितीय ओव्यांचे संकलन करुन फार सुंदर काव्य निर्माण केले आहे. ही खास हृदयनाथी शैली आहे.
विद्युतल्लेची विडी । वन्हि ज्वाळांची घडी ।
पंथ रेयाची चोखडी । घोटीव जैसी ॥
केसराच्या स्वयमेव रंगासारखी रत्नरूप बीजाच्या नव अंकुशासारखी त्यात अवयवकांतीची झांक दिसते तसे बाबा होते...
मंगेशी मंदिरातील नगाऱ्याबद्दल हृदयनाथजींनी त्यांच्या मूळ लेखात भरपूर लिहिले आहे. त्यावरुन प्रश्न पडतो की, मास्टर दीनानाथांच्या बालपणातील मंगेशीच्या मंदीरातील नगारा हा त्यांच्या आयुष्यातील शत्रू समजावा की मित्र? की नियतीचं खेळणं? छोट्या बालकास चार पैसे मिळतात म्हणून नगारा वाजवायला लावणारे भटजी, वडील, आई कोणास दोष द्यावा? नगारा वाजवल्यामुळे बालकास तालाचे अंग कळले व नैसर्गिकच बाल दीनानाथ यांची लय अतिशय पक्की आहे हे जाणवून अंगभूत कलेची जाणीव झाली याबद्दल ऋणी राहावे? आयुष्यात घडणाऱ्या घटना परस्परसापेक्ष असतात. त्यातून मुक्त अर्थ प्रतीत होत राहतात. लहरी वाऱ्याप्रमाणे अर्थ वाहत राहतात. कोणी बोटांतून रक्त येईपर्यंत रियाज करुन स्वतःस घडवितात. कोणास नियती तशी परिस्थिती निर्माण करुन घडविते. शेवटी रसिकांना सगळा चमत्कारच वाटतो.
मास्टर दीनानाथ छोट्या लतास सांगतात, “लता, या नगाऱ्याचा नाद म्हणजे आपला देव,”
खरंय! बालपणी ज्या नगाऱ्याने अक्षरशः दीनानाथांचे रक्त शोषून घेतले होते, त्याचे फलीत म्हणजे नभाकाराचे स्वर बाल दीनानाथांना प्राप्त झाले आणि पुढे ते मास्टर दीनानाथ झाले. दीनानाथांची जीवन कथा फार अद्भुत आहे. दीनानाथांची ही कथा वाचताना कित्येकदा गळा दाटून येतो, डोळ्यात अश्रुंचा पूर दाटतो... त्यांच्या जखमी हृदयातील रक्ताचे शिंतोडे मंगेशीच्या मंदिरातील गाभाऱ्यात पसरलेले दिसू लागतात. स्वतःचेच रक्त स्वतःच पुसणारा बाल दीनानाथ दिसू लागतो. कठीण हृदयाचे रागीट, काळेकुट्ट भटजी नजरेत आग निर्माण करतात... पण दिव्य आत्म्यांची कुंपणे आजवर अशी काटेरीच आढळलीयत... नाही का? मीराबाई, ज्ञानेश्वर, कान्होपात्रा, येशू अपवाद होते का? नाही ना? सोनं जाळल्यानंतरच कळते की ते बावनखणी आहे की खोटं आहे! नियतीची ती योजनाच असते असे म्हणावे का? अद्वितीय कलाकाराच्या बाबतीतही तसेच होते. लतादीदींच्या स्मृती गंगाजलाप्रमाणे आहेत, मनात पाझरल्या की मन पवित्र होते.
कमल यूंही कमल नही होता
काटों की दिवार चुभती होगी
मिट्टी की दलदल डुबाती होगी
किचड अंदर खिंचता होगा
पर फिर भी कमल हसकर
मुस्कुराता फिर खिलता होगा
तभी ऐसा कमल विष्णूपद पर
विराजित पद्माकर बनता हैं
खुबसूरती बरकरार रखकर
कमलाकर कहलाता हैं!
- लक्ष्मीमंगेश (कवी)
-सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
नाशिक
मो. नं. 9822683799
‘The Drum of God’ (Devacha Nagara)
An appreciation by Vijayalakshmi Manerikar of the article written by Pandit Hridaynath Mangeshkar in memory of Bharat Ratna Lata Mangeshkar.
We are observing the fourth death anniversary of Bharat Ratna Lata Mangeshkar. It was on the auspicious occasion of Vasant Panchami, February 6, 2022, that she took her final journey to the great beyond. In a touching tribute, Pandit Hridaynath Mangeshkar is weaving a tapestry of memories of his beloved sister, Lata Didi, through a series of articles.
His writing serves as Samidha—the sacrificial firewood offered to a sacred fire. These memories will keep the flame of the Mangeshkar legacy burning eternally in the hearts of readers. To the naked eye, Samidha may appear as dry wood, yet it was once green, sap-filled, and tender. However, it is only after it dries and withers that it gains the potency to ignite the holy fire. Once a tender branch transforms into Samidha, it acquires the capacity to fuel the inner spiritual flame. Not just any grass can become Samidha; to attain this sanctity, grandeur, and nobility, it must belong to a lineage—it must be a branch of a noble, ancestral tree. Just as the wood consumes itself in the Yagna (fire ritual), Lata Didi became the Samidha of her family. Since childhood, she bore witness to her father’s struggles, keeping the sacred fire of his memories burning within Hridaynath’s heart.
Lata Didi was the embodiment of radiance, a visionary, a divine soul. For nine decades, her luminous, ambrosial voice has held the entire Indian society under a spell.
It is said that a true artist is born with genius, yet it is in the company of a Sadguru (true master) that the art is polished and blooms. Lata Didi experienced this firsthand, having received training directly from her father, Master Deenanath Mangeshkar. Hridaynathji, however, did not have this privilege, as their father passed away when he was merely four and a half years old. Consequently, Lata Didi stepped in to fill that void. She would converse daily with the adolescent Hridaynath. One can see that Didi, filled with the gravity of a Guru and the affection of a mother, consciously communicated with her younger brother.
These conversations with ‘Bal’ (Hridaynath’s childhood nickname) were not mere chats; they were the sowing of seeds—the values and musical heritage of the Mangeshkar lineage. Through his writing, one realizes she was molding the young Hridaynath. Much like Mata Jijabai, who, while shaping the young Shivaji, told him legends from the Puranas but also made him acutely aware of his father Shahaji Raje’s helplessness, Lata Didi shaped Balasaheb Mangeshkar with maternal love and far-sighted vision.
In one such conversation, Lata Didi recounts a memory of their father, Master Deenanath, at the Mangeshi Temple in Goa. “Lata, stop right here. Do not go further. This spot is our sanctum. Do you see this Nagara (Drum)? That is our Mangesh,” Baba said. “But Baba... we are standing so far away from the deity Mangesh,” little Lata replied.
Master Deenanath was making his daughter aware of the harsh reality: the place of the Drum in the temple was their limit; they were not permitted to go beyond it. The pain of this social exclusion must have pierced his heart. Yet, he spent his life serving that Mangesh. It is through the blessings of that Mangesh that the surname ‘Mangeskar’ is today not just a family name, but a world-renowned five-syllable mantra of Indian music.
Hridaynath writes, “How did Baba appear in Didi’s mind? He stood adorned in divine beauty.” What was this beauty like? Lata Didi had perceived her father's divinity in her very childhood. To describe this, Hridaynathji employs a unique style, weaving together exquisite verses (Ovis) from the Dnyaneshwari. He describes him as having the brilliance of lightning, the heat of fire, and the luster of a polished gem—pure as saffron, possessing the radiance of a precious stone.
In his original article, Hridaynathji writes extensively about that Drum in the Mangeshi temple. It raises a poignant question: Was the drum in the temple of Master Deenanath’s childhood an enemy, a friend, or a toy of destiny? Who is to blame for the child who was made to beat the drum for a few coins—the priest, the father, or the mother? Or should we be grateful that playing that drum instilled a concrete sense of rhythm (Laya) in the child, awakening his innate artistry? Events in life are relative; their meanings flow like the wind. some carve themselves out by practicing until their fingers bleed; others are shaped by destiny’s design. In the end, to the audience, it all seems like a miracle.
Master Deenanath tells little Lata, “Lata, the sound of this drum is our God.”
It is true! The very drum that literally sucked the blood from child Deenanath’s fingers yielded a fruit: the young boy was gifted with notes as vast as the sky, eventually becoming the legendary Master Deenanath. The life story of Deenanath is extraordinary. Reading it often chokes the throat and fills the eyes with a flood of tears. One can almost see the blood spattered from his wounded heart onto the sanctum of the Mangeshi temple. One can visualize the child Deenanath wiping his own blood. The cruel, stone-hearted priest with eyes of fire comes to mind... But haven’t divine souls always faced such thorny paths? Meera, Dnyaneshwar, Kanhopatra, Jesus—were they exceptions? No. Gold is proven pure only after it is tested in fire. Perhaps this is Destiny’s plan. The same applies to unique artists.
Lata Didi’s memories are like the holy water of the Ganges; when they seep into the mind, they purify the soul.
Poetic Conclusion
(Translation of the concluding Hindi poem by LakshmiMangesh)
A Lotus does not become a Lotus just like that, The wall of thorns must surely pierce, The swampy soil must surely drown, The mud must pull it deep within... Yet, despite it all, the Lotus laughs, It smiles and blooms again. Only then does such a Lotus Become the Padmakar seated at Lord Vishnu's feet. Keeping its beauty intact, It earns the name Kamlakar!
Author: Sau. Vijayalakshmi Manerikar Nashik
.jpg)







Comments