'द बंगाल फाइल्स' - एका मूक इतिहासाचा बोलपट | The Bengal Files: Giving Voice to a Silenced History
- Jyoti Ghanshyam
- Sep 16, 2025
- 5 min read
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट केवळ एक कलाकृती नसून, तो भारतीय समाजाच्या डोळ्यांत घातलेले एक दाहक अंजन आहे. आजवर ज्या इतिहासाच्या पानांवर सोयीस्करपणे पांघरूण घातले गेले, ज्या जखमा भरल्या आहेत असे भासवून आतल्या आत चिघळत ठेवल्या गेल्या, त्या जखमांवरील खपली काढण्याचे धाडसी कार्य हा चित्रपट करतो. ही कलाकृती पाहिल्यानंतर मनात विचारांचे काहूर माजते आणि अनेक अनुत्तरित प्रश्न डोके वर काढतात. आपल्या देशात इतिहासाचे दर्शन घडवताना नेहमीच एक विशिष्ट वैचारिक चाळणी लावण्यात आली. डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली, अल्पसंख्यकांच्या अनुनयापोटी आणि सामाजिक सलोखा टिकवण्याच्या भ्रामक कल्पनेतून रक्तरंजित सत्य दडपून, एक गुळगुळीत आणि सोयीस्कर इतिहास आपल्यासमोर ठेवण्यात आला. याचे भयंकर परिणाम आपण आजही भोगत आहोत. जागतिक पटलावर ज्यूंवर झालेल्या नाझींच्या अत्याचारावर किंवा अमेरिकेतील वर्णद्वेषावर बनलेले चित्रपट तेथील समाजाला त्यांच्या चुकांची जाणीव करून देतात, जेणेकरून भविष्यात त्याची पुनरावृत्ती होणार नाही. याउलट, भारतात मात्र सत्य लपवल्यामुळे काश्मीर, केरळ आणि बंगालसारख्या राज्यांत कट्टरतावादाची मुळे खोलवर रुजली आणि दहशतवादाने निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. भूतकाळातील चुकांपासून न शिकल्याने वर्तमान आणि भविष्य दोन्ही अंधारमय होते, हा या चित्रपटाचा मूळ सिद्धांत आहे. 'द बंगाल फाइल्स' हा केवळ घटनांचा पाढा वाचत नाही, तर त्यामागील वैचारिक संघर्षालाही वाचा फोडतो. गांधीजींच्या अहिंसेच्या उदात्त तत्त्वाला आत्यंतिक दीनवाण्या स्वरूपात स्वीकारल्यास काय अनर्थ ओढवू शकतो, याचे विदारक चित्रण यात आहे. जेव्हा पराक्रम आणि प्रतिकार या मूल्यांना हिंसक ठरवून केवळ सहनशीलतेलाच वीरांचे लक्षण मानले जाते, तेव्हा समाजाचे नैतिक अधःपतन कसे होते, हे दिग्दर्शकाने प्रभावीपणे मांडले आहे. 'स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः' या गीतेतील उक्तीचा खरा अर्थ चित्रपट उलगडून दाखवतो. गुण-कर्मानुसार स्वतःच्या मूळ धर्माचे (कर्तृत्वाचे) पालन न केल्यास येणारे मरण हे परधर्माच्या (दुसऱ्याच्या विचारधारेच्या) भयावह जीवनापेक्षा कसे श्रेष्ठ आहे, हा विचार प्रेक्षकाला अंतर्मुख करतो. चित्रपटातील एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची घुसमट आणि व्यवस्थेपुढील त्याचे हतबल होणे, हे भारतीय समाजव्यवस्थेचे कटू वास्तव आहे. 'वुई द पीपल ऑफ इंडिया' अर्थात 'आम्ही भारताचे लोक' या संविधानाच्या सुरुवातीतील शब्दांमधील 'लोक' आज किती दुबळे आणि लाचार झाले आहेत, हे हा चित्रपट अधोरेखित करतो. नागरिकाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे, पण शस्त्र बाळगण्यास परवानगी नाही, हा केवढा मोठा विरोधाभास! शस्त्रपूजा करणाऱ्या या देशात सामान्य नागरिकाला निःशस्त्र करून, गुंड आणि धनदांडग्यांच्या दयेवर सोडण्यात आले आहे. जेव्हा न्यायव्यवस्था, पोलीस यंत्रणा आणि समाजमाध्यमे हे लोकशाहीचे स्तंभच शक्तिशाली लोकांपुढे झुकतात, तेव्हा सामान्य नागरिकाने न्यायासाठी कोणाकडे पाहावे, हा चित्रपटाने विचारलेला प्रश्न प्रत्येकाच्या काळजाला भिडतो. चित्रपटाच्या उत्तरार्धात, शिवा पंडित नावाचे पात्र जेव्हा एका सरदार नावाच्या गुंडाचा वध करतो, तेव्हा तो क्षण केवळ एका दृश्यापुरता मर्यादित राहत नाही. तो प्रेक्षकांच्या मनात एक नैतिक द्वंद्व निर्माण करतो. चित्रपटाच्या शेवटी झालेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात, सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या दर्शन कुमार यांना विचारलेला प्रश्न आणि त्यांनी दिलेले, "याचे उत्तर प्रेक्षकांनीच ठरवावे," हे उत्तर अत्यंत मार्मिक आहे. कायद्याच्या चौकटीत हे कृत्य गुन्हा असेलही, पण न्यायाच्या आणि धर्माच्या तराजूत त्याचे वजन काय, हा विचार दिग्दर्शक प्रेक्षकांवर सोपवतो. अभिनयाच्या बाबतीत, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि अन्य कलाकारांनी आपापल्या भूमिकांना पूर्ण न्याय दिला आहे. त्यांचे संयत आणि तरीही भेदक अभिनय चित्रपटाच्या परिणामात भर घालतो. चित्रपट काहीसा मोठा असला तरी, त्याची पकड आणि विदारक प्रसंगांची मालिका प्रेक्षकाला खिळवून ठेवते. थोडक्यात सांगायचे तर, 'द बंगाल फाइल्स' हा केवळ मनोरंजनासाठी बनलेला चित्रपट नाही. तो एक वैचारिक यज्ञ आहे, जो समाजाच्या सुस्त आणि बधीर झालेल्या विवेकबुद्धीला जागृत करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या इतिहासातील अप्रिय सत्याला सामोरे जाण्याची हिंमत असेल, तरच उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होऊ शकते, हा संदेश देणारी ही एक अवश्य पाहावी अशी कलाकृती आहे. दत्तात्रेय नाईकवाडे+91 90287 46492 Vivek Agnihotri's directorial, ‘The Bengal Files’, is not merely a work of art; it is a searing admonishment for Indian society. It is a courageous endeavor that peels back the scab on wounds that were declared healed but left to fester underneath, exposing a history that has been conveniently whitewashed for far too long. Watching this film unleashes a whirlwind of thoughts and raises many unanswered questions. In our country, history has always been presented through a specific ideological filter. Under the influence of leftist thought, for the sake of minority appeasement, and under the illusion of maintaining social harmony, a sanitised and convenient history was fed to us, suppressing the blood-soaked truth. We are still suffering the dire consequences of this today. On the global stage, films about Nazi atrocities against the Jews or racial discrimination in America serve to remind their societies of past mistakes, ensuring they are not repeated. In India, however, the concealment of truth has allowed the roots of radicalism to grow deep in states like Kashmir, Kerala, and Bengal, leading to the loss of innocent lives to terrorism. The film's core thesis is that by refusing to learn from the mistakes of the past, we condemn both our present and future to darkness. 'The Bengal Files' does not merely recite a sequence of events; it gives voice to the ideological conflict behind them. It presents a devastating portrayal of the catastrophe that can unfold when the noble principle of Gandhian non-violence is adopted in its most pitiful and submissive form. The director effectively illustrates how a society undergoes moral decay when mere tolerance is championed as a virtue of heroes, while valour and resistance are dismissed as violent. The film unravels the true meaning of the verse from the Gita: 'स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः' (Death in the pursuit of one's own dharma is superior to the frightening life lived by adopting another's path). The idea that death, while upholding one's own inherent nature (dharma of action) is preferable to a terrifying existence under a foreign ideology forces the viewer into deep introspection. The suffocation of an honest police officer and his helplessness before the system is a bitter reflection of Indian society. The film underscores how the 'People' in the constitutional preamble, 'We the People of India,' have become weak and powerless today. What a profound paradox it is that in a country that practices 'Shastra Puja' (worship of weapons), the ordinary citizen is disarmed and left to the mercy of criminals and the wealthy elite. When the very pillars of democracy—the judiciary, the police, and the media—bow before the powerful, where should the common citizen look for justice? This question, posed by the film, strikes a chord in everyone's heart. In the film's latter half, when the character Shiva Pandit kills a goon named Sardar, the moment transcends the screen. It creates a moral conflict in the minds of the audience. At a post-screening Q&A session, a question was posed to Darshan Kumaar, who plays a CBI officer, and his poignant reply, "The audience must decide the answer to that," is truly telling. While the act may be a crime within the framework of the law, the director leaves it to the audience to weigh its significance on the scales of justice and dharma. In terms of performances, Mithun Chakraborty, Anupam Kher, Pallavi Joshi, and the rest of the cast have done complete justice to their roles. Their restrained yet piercing performances add immense depth to the film's impact. Although the film is somewhat long, its gripping narrative and series of harrowing events keep the audience riveted. In essence, 'The Bengal Files' is not a film made for mere entertainment. It is an ideological crucible, a cinematic ritual that attempts to awaken the dormant and numbed conscience of society. It is a must-watch masterpiece that delivers a powerful message: the foundation for a bright future can only be laid if we have the courage to face the unpleasant truths of our past. Dattatrey Naikwade+91 90287 46492
.jpg)







Comments