top of page
विशेष लेख
स्वावलंबन आणि शिस्त
आपल्याला मिळालेलं हे सुंदर जीवन जगण्यासाठी स्वावलंबन आणि शिस्त जणू 'प्राण'च आहेत. आपल्या रोजच्या जगण्यात स्वावलंबन नसेल तर आळसामुळे आपलं जगणं निरस झाल्याशिवाय राहणार नाही. तसंच आपल्या वागण्यात शिस्त नसेल तर या सुंदर जीवनाचा आपण पुरेपूर आनंद उपभोगू शकणार नाही! त्यामुळे स्वावलंबन आणि शिस्तीला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे याबाबत कुणाचंही दुमत नसावं. आपल्या देशाचे तिसरे राष्ट्रपती होऊन गेलेले डॉ. झाकिर हुसेन हे शाळेत शिकत असताना त्यांना शिकवणारे शिक्षक सय्यद अल्ताफ हुस
Sep 29, 20203 min read
स्वमायेचे आडवस्त्र लावूनि एकला खेळवी सूत्र
परिपाठ झाला. हजेरी घेत होतो. माझ्या लक्षात आलं की ताई आजही गैरहजर आहे. मी तुझ्या शेजारच्या विद्यार्थ्याला विचारलं," काय रे? ताई आज का नाही आली?" तो म्हणाला,"त्या घरीच भांडुकली खेळतंय." एकदा गैरहजर राहायची सवय लागली की मुलांना शाळा गोड लागत नाही; म्हणून मी ताईच्या घरी गेलो. घरी कोणीच नव्हतं. ताई खेळत होती. स्वतःच स्वतःशी बोलत होती. त्यामुळे मी एकदम समोर न जाता वळचणीच्या आडोशाला उभा राहून तिचं बोलणं ऐकू लागलो. दगडाची चूल. दगडाची भाजी, दगडाचे ताट, दगडाची वाटी, दगडाचीच सर्व भ
Sep 26, 20204 min read
पोलिसांची मानसिकता!
कुठे लाठीहल्ला, कुठे अश्रुधारांचा वापर, कुठे हवेत गोळीबार, कुठे प्रत्यक्ष गोळीबार झाला की सामान्य नागरिकांपासून ते राजकारण्यांपर्यंत, अगदी गल्ली ते दिल्ली जर कुणाला जबाबदार धरले जात असेल तर ते म्हणजे पोलीस यंत्रणेला! पण खरेच का प्रत्येकवेळी, प्रत्येक ठिकाणी पोलिसच जबाबदार असतात काय? बारा-पंधरा तास सेवा बजावणारे पोलीस इतके निर्दयी, निष्ठुर आहेत का की ते निष्पाप लोकाच्या जीवावर उठतील? असे म्हणतात की नाण्याला दोन बाजू असतात. तद्वतच प्रत्येक घटनेलाही दुसरी बाजू असू शकते हे का कु
Sep 24, 20206 min read
शेतकऱ्यांना खुले बाजारस्वातंत्र्य मिळाले...!
भारत देश कृषिप्रधान देश आहे यांची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागली. कोविड १९ मुळे सर्व ठप्प असताना कृषी क्षेत्र सुरु होते म्हणून कृषी क्षेत्रातील GDP कुठेही घसरला नाही. देशातील कृषी व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणारे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणारे दोन विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. लोकसभेत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी 5 जून 2020 रोजी काढलेल्या अध्यादेशाची जागा घेण्यासाठी 14 सप्टेंबर 2020 रोजी शेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सु
Sep 23, 20205 min read
जागतिक शांतता आणि भारत
अलीकडेच एक बातमी माझ्या वाचनात आली, ती पुढीलप्रमाणे, 'भारत-चीन सीमेवर गोळीबार' नवी दिल्ली : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये शांतता राखण्यासाठी विविध स्तरावर चर्चा केल्या जात आहेत. अशातच दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी. मॉस्कोत भारत - चीन परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेआधी एलएसीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. वास्तविक चीनला भारताची गरज आहे. व्यापारासाठी चीन भारतावर अवलंबून आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय जनमत चीनच्या विरोधात आहे. शांतते
Sep 23, 20208 min read
'शस्त्र' वापरावं जपून!
"शब्द संभलकर बोलिए, शब्द को हाथ ना पांव। एक शब्द करे भलाई , तो दुजा करे घाव ॥" क्रांतिकारक संत कबीर महाराजांच्या वरील वचनाप्रमाणे शब्द हे किती मोठं प्रभावी 'शस्त्र' आहे हे आपण सगळेच अनुभवत असतो. शब्दानं शब्द वाढत गेला की त्याचं पर्यावसान भांडणात होणं हे ठरलेलंच असतं! तसंच सहानुभूती दर्शविणारे आपुलकीचे चार शब्द देखील एखाद्या वाट चुकलेल्या 'मुसाफिराला' दिशादर्शक ठरू शकतात! शस्त्राचा आपण शब्दशः अर्थ घेतला तर पूर्वीच्या काळी युद्धात वापरल्या जाणाऱ्या तलवारी, भाले, कट्यारी इत्याद
Sep 22, 20202 min read
कवितेचं गाणं होतांना.. एक अनुभव !
‘आईचा मान कधी देवाला नाही’ नमस्कार मंडळी, आज मला माझ्या “प्रांजळ” ह्या काव्यसंग्रहातील ‘आईचा मान कधी देवाला नाही’ ह्या कवितेचे गाणं झालंय म्हणून खूप खूप आनंद होत आहे. आपल्या सगळ्यांच्याच अतिशय जिव्हाळ्याचा विषय ही आपली ‘आई’ असते आणि म्हणूनच जगभरातील मातृशक्तीला माझे हे गीत मी आज समर्पित करून ‘आई’प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. तिचे उपकार तर ह्या जन्मीच काय; पण कधीच फेडता येणार नाहीत! त्यामुळे तिच्या ऋणात राहणेच जास्त योग्य आहे असे मला वाटलं; म्हणून ‘मातृशक्ती’ला माझी ही ‘गीतांजली
Sep 21, 20207 min read
तेवीं जालेनि सुखलेशें
सुशील अतिशय गरीब मुलगा. मी जेव्हा शाळेवर नव्याने रुजू झालो तेव्हा स्वागताला पहिल्यांदा हाच हजर होता. कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. सुशिक्षित होता. शाळेमध्ये कुठलीही नवीन गोष्ट करायची असली तरी मोकळ्या मनाने काम करायला कधीही तयार असायचा. बोलणंही छान. अंगामध्ये नम्रता. सगळं काही व्यवस्थित. फक्त एकाच गोष्टीची कमी होती. श्रीमंती. तीही काही दिवसांनी दूर झाली. सुशीलची गावाच्या शेजारीच बारा एकर शेती होती, परंतु पाण्याची अडचण असल्यामुळे शेतीमध्ये काही पिकायचं नाही. हा मोलमजुरी क
Sep 19, 20203 min read
हैदराबाद संग्राम : जनसामान्यांचा लढा!
‘‘हैदराबाद हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे; तो हिंदुस्थानात विलीन झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही...’’ -स्वामी रामानंद तीर्थ) 15 ऑगस्ट 1947! भारतीय इतिहासातील एक सुवर्णदिन! शेकडो वर्षे पारतंत्र्यात असणार्या भारतीयांनी यादिवशी उगवलेल्या, ग्रहणमुक्त झालेल्या सूर्याचे दर्शन घेतले. एक वेगळी स्फूर्ती, एक आगळे चैतन्य! मोठ्या आशेने, अपेक्षेने भारतीय जनता मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद उपभोगत होती. भारतात खर्या अर्थाने लोकशाहीचा जन्म झाला होता. मिळालेले स्वातंत्र्य सहजासहजी म
Sep 17, 202029 min read
हे जीवन सुंदर आहे!
अलीकडेच एक बातमी वाचनात आली... फेसबुकवर एकाने पोस्ट टाकली की, 'मी माझे जीवन संपवित आहे' दुसऱ्याने पोस्टचे गांभीर्य लक्षात घेऊन ही गोष्ट शिवसेनेच्या एका आमदाराना कळवली. आमदारांनी पुणे पोलिसांना कळविले. पोलीस त्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोचले. पोलिसांनी समुपदेशन करून आत्महत्येपासून त्या व्यक्तीला परावृत्त केलं! अवघ्या पंचवीस मिनिटात पुण्यामध्ये हे घडले. त्या नंतर 'त्या' व्यक्तीने फेसबुकवरची पोस्ट डिलीट केली. तसेच पोलीस आणि सर्व संबंधितांशी चर्चा झाल्यावर आत्महत्येचा विचार बदलल
Sep 16, 20207 min read
डिजीटल मार्केटिंग एक जादुई दुनिया (भाग २)
‘डिजीटल मार्केटिंग’ या विषयावरील पहिल्याच लेखाला ‘चपराक’च्या वाचकांनी भरभरून उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी ‘चपराक’च्या वाचकांच्या ऋणात आहे. जगात अवघड असं काही नसतं फक्त ते सोपं करून समजून घ्यायला हवं, ‘डिजीटल मार्केटिंग’ या अवघड वाटणाऱ्या विषय सोपं करून सांगण्याचा या लेखमालेतून प्रयत्न आहे. या लेखमालेतील पहिला लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://chaprak.com/2020/09/ek-jadui-duniya-by-vyanktesh-kalyankar/ या लेखमालेतील दुसऱ्या लेखाला सुरुवात करण्यापूर्वी
Sep 15, 20203 min read
आपण आरोग्याबाबत जागरूक आहोत का?
आपल्या देशात इंग्रजांच्या काळात एखाद्या भयंकर रोगाची साथ आली की लोक पटापट मृत्यूमुखी पडायचे! पुरेशा वैद्यकीय उपाययोजना नसल्यामुळे सर्वसामान्य जनता अगदी हतबल व्हायची. त्याकाळात प्लेग रोगाची साथ आल्यानं लोकाना जगण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला होता! कारण त्यावेळी आजच्यासारख्या आरोग्यसेवा उपलब्ध नव्हत्या आणि ज्या काही परंपरागत उपचार पध्दती होत्या, त्या सुद्धा तोकड्या पडायच्या. कधीकधी कुचकामी ठरायच्या. नाही म्हणायला इंग्रजी राजवटीच्या अमलाखालील मिशनरी दवाखाने अस्तित्वात होते
Sep 15, 20203 min read
समईच्या शुभ्रकळ्या
सातारा येथील लेखिका अनघा कारखानीस यांनी लिहिलेले ‘समईच्या शुभ्रकळ्या’ हे पुस्तक ‘चपराक’ने प्रकाशित केले. आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित सत्यकथा मांडल्याने मराठी साहित्यातील हा एक वेगळा प्रयोग झाला आहे. या पुस्तकाला सुप्रसिद्ध कवी आणि समीक्षक विश्वास वसेकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. हे आणि ‘चपराक’ची इतरही उत्तमोत्तम पुस्तके घरपोहच मागण्यासाठी आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. तुम्ही ‘कॉफी विथ करण’ हा कार्यक्रम कधी पाहिला आहे का? त्यात शेवटी कर
Sep 14, 20207 min read
तुका म्हणे ज्याला अर्थ आहे भेटी
लगबगीने मॅडम वर्गात आल्या. पर्स टेबलवर ठेवली. स्कार्फने घाम पुसला. पर्समधला फोन काढून टेबलवर ठेवला. तेवढ्यात व्हाट्सअपची नोटिफिकेशन बेल वाजली. कोणाचा मेसेज असावा म्हणून त्यांनी व्हाट्सअप ओपन केलं तर व्हाट्सअपवर एका अनोळखी नंबरवरून काही फोटो पाठवलेले होते. त्यांनी फोटोमध्ये बघितलं तर त्यांचाच फोटो होता. कालचा. गांधी जयंती साजरी करतानाचा. नंबर ओळखीचा नाही म्हणून मॅडमांनी त्या नंबरवर फोन लावला. विचारलं, "कोण तुम्ही?' तिकडून आवाज आला,"मी अमुक-तमुक वर्तमानपत्रातला पत्रकार आहे. का
Sep 12, 20204 min read
रामची आई!
राम शेवाळकर यांना त्यांच्या आईची आठवण येताच गहिवरून यायचे. गोपिकाबाई हे त्यांच्या आईचे नाव. मात्र तिच्या बाबतीत ते वयाच्या अडीच वर्षापासून दुरावले होते. एखाद्या अपत्यास जन्मत:च एखादा अवयव नसावा आणि त्याला त्या अपंगत्वाची सवय व्हावी, त्याप्रमाणे त्यांच्यासाठी आईचे नाते होते. गोपिकाबाईना सारेच बाई म्हणत, म्हणून राम शेवाळकर यांची भावंडेही त्यांना 'बाई' असेच संबोधत असत. बाईंच्या आईस आजीऐवजी सारी भावंडे 'आई' या नावानेच हाका मारीत असत. बाई लहानपणीच रामास सोडून गेली आणि मातेचे प्रे
Sep 10, 20205 min read
अंक आणि अक्षर बनवतील साक्षर
नुकताच पाच सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा केला. विद्यार्थ्याला घडवण्याचं, शिक्षण देण्याचं, साक्षर करण्याचं, संस्कार करण्याचं काम शिक्षक अगदी मनापासून जीव तोडून करत असतात. तन, मन, धन खर्च करून राबत असतात. या शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण 'शिक्षक दिन' साजरा करतो! पण लोकाना साक्षर करण्याचे काम फक्त शिक्षकांचे आहे का? फ़क्त सरकारचेच आहे का? याचे उत्तर 'नाही' असेच द्यावे लागेल. शाळेत जाणाऱ्या मुलांना शिक्षक साक्षर करतील पण जे
Sep 9, 20205 min read
यांच्याकडे कोणी लक्ष देणार का?
"आजकल सब खामोश है कोई आवाज नही करता, शायद सच बोलकर कोई किसीको नाराज नही करता!" आज उद्भवलेली परिस्थिती याहून वेगळी नाही असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. कारण हातावर पोट असणाऱ्यांवर आज तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली आहे. कधी अर्धपोटी तर कधी उपाशी राहण्याची भयंकर वेळ येऊन ठेपली आहे! आज काम मिळण्याची मारामार असल्यानं, जे काय मिळालं ते काम मुकाटपणे करायचं आणि येणारा दिवस कसातरी ढकलायचा... जेवढी मजुरी मिळते ती काही न बोलता घ्यायची अन् निघायचं हेच आज मजुरांच्या नशिब
Sep 8, 20204 min read
डिजीटल मार्केटिंग : एक जादूई दुनिया (भाग १)
ही तीन उदाहरणं बघा - 01 बारामतीतील एक तरुण. लॉकडाऊनमुळे मोठा व्यवसाय ठप्प पडलेला. करायचं काय? घरात शेती. नातेवाईकांची शेती. शेतीत बऱ्यापैकी भाज्या घेतलेल्या पण लॉकडाऊनच्या काळात भाजी विकणार तरी कुठे आणि कसे? मित्राच्या सल्ल्यानं त्यानं डिजीटल मार्केटिंगचा पर्याय निवडला आणि अवघ्या आठ दिवसात त्याला तीन दुकानात मासिक किमान ८० हजार रुपयांच्या भाजीची कायमस्वरुपी ऑर्डर मिळाली. त्याचा उत्साह शतपटीने वाढला. 02 समीर. एक अत्यंत कष्टाळू, कल्पक, सर्जनशील तरुण. नोकरी आणि छपाईची स्वत: कंत्
Sep 8, 20203 min read
संवेदनशील माणसांमुळे जगलो !
आजी-आजोबा दूर जाताना दिसतात. स्वत:च्या विचारात गढलेले दिसतात. शरीरस्वास्थ्य नसते. भावना गेलेल्या असतात, आशा जिवंत असते. उघडय़ा डोळ्यांनी सारं पाहायचं असतं. नजरेतला धाक आता संपलेला असतो. सहनशक्तीसुद्धा थुंकीसारखी गिळावी लागते कारण इथे यांची बडबड ऐकायला कुणालाच वेळ नाही. "तुम्ही गप्प बसा, मिळेल ते जेवा आणि पडून राहा" असं ऐकायची वेळ येते आणि आपण मुलांचे आश्रित असल्याची जाणीव होते. एवढं सारं बदललंय तर, जातो तो दिवस चांगला म्हणायचा. एकमेकांनी एकमेकांचा आधार बनायचं आणि केव्हातरी एक
Sep 7, 20205 min read
"अहंकाराचा वारा...."
माझ्या मराठवाड्यातल्या नरसीचे श्रेष्ठ संत नामदेव महाराज यांचा एक अभंग कालपरवा वाचनात आला. 'अहंकाराचा वारा | न लागो राजसा | माझिया विष्णूदासा | भाविकांसी |' असा त्या अभंगातला एक चरण. या ओळी नकळतच कानातून मनात शिरल्या अन् विचारांची एक शृंखला अगदी माझ्या नकळतच मनातल्या मनात जोडली जाऊ लागली. अहंकार. शुगर हा रक्ताचा जितका अविभाज्य घटक असतो तितकाच अहंकार हाही माणसाचा एक अविभक्त भाग. माणसाच्या शरीराला एका मर्यादेपर्यंत साखरेची गरज असतेच पण तिचं प्रमाण वाढले की प्रॉब्लेम निर्माण हो
Sep 7, 20202 min read
bottom of page
.jpg)




