top of page

इक कुडी गुम है

  • Apr 11
  • 1 min read

‌‘उडता पंजाब‌’ या चित्रपटातलं ‌‘इक कुडी जिदा नाम मोहब्बत‌’ हे गीत ऐकताक्षणी मन एक विलक्षण अनुभव घेतं. सौंदर्य, पावित्र्य आणि निरागसता यांची मूर्ती असलेली ती ‌‘कुडी‌’, ती मुलगी आपल्याला एखाद्या स्वप्नात भेटावी आणि जाग येताच हातातून वाळूसारखी निसटून जावी, तशी आहे.


गाण्यातील प्रत्येक प्रतिमा मनाला हलवते. तिचं रूप पऱ्यांसारखं आहे पण तिचं अंतरंग मरियमप्रमाणे पवित्र. तिच्या हास्यानं फुलं गळतात, तिच्या चालीनं गझल आकार घेते. हे ऐकताना श्रोत्याला जाणवतं की सौंदर्य फक्त डोळ्यांना दिसत नाही, ते मनालाही स्पर्श करतं आणि अशा सौंदर्याला ‌‘प्रेम‌’ असं नाव दिलं तर ते किती यथार्थ आहे!


परंतु या गीताची खरी वेदना यात दडलेली आहे की, ही कुडी हरवली आहे, ‌‘गुम है‌’. जणू आपल्या जीवनातलं खरं प्रेम, खरं निरागसपण, हळूहळू लोप पावत चाललं आहे. समाजात हिंसा, व्यसनं आणि अस्वस्थता वाढत आहेत; पण यामध्ये सौंदर्य, निर्मळता आणि करुणा कुठं हरवलीत हे कुणालाच कळत नाही.


अमित त्रिवेदीचं संगीत आणि स्वरांचा साधेपणा या गीताला अधिक हृदयस्पर्शी करतात. ‌‘गुम है‌’ हा शब्द वारंवार कानावर येतो आणि मनात एक रिकामेपणाची पोकळी निर्माण करतो. श्रोता स्वतःलाच विचारतो, ‌‘आपल्या जीवनातील खरं प्रेम आपण हरवत आहोत का? आणि हरवत असू तर ते पुन्हा सापडेल का?‌’


ही कुडी केवळ एक प्रेयसी नाही, ती एक मूल्य आहे, एक आदर्श आहे, एक हरवलेलं स्वप्न आहे. तिच्या अनुपस्थितीत आपण स्वतःचं हरवलेलं सौंदर्य ओळख


अशा रीतीनं हे गीत फक्त शृंगाररस निर्माण करत नाही; तर करुणा, विचार आणि आत्मपरीक्षणाची छटा आपल्या मनात उमटवून जातं आणि म्हणूनच, ‌‘इक कुडी‌’ हे गाणं ऐकल्यावर मनाला जणू कुठे तरी आतल्या गाभाऱ्यातून एक हळू आवाज ऐकू येतो, ‌‘प्रेम हरवू देऊ नकोस कारण त्याच्यातच जगण्याचा खरा अर्थ आहे.‌’


- रमा जाधव

80079 97223

प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक (१३ ते १९ एप्रिल २०२६)

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page