व्यवस्थेला प्रश्न विचारणारा तरुणाईचा हुंकार: मयूर बागुल यांचा लेखसंग्रह | A Youthful Challenge to the System: Mayur Bagul's Anthology
- 1 day ago
- 12 min read
आपण सुसंगत विचार करतो का? हे आपले आपण जाणून घ्यायचे असेल तर लिखाण सुरु करून टाका. आपल्याला कोणते प्रश्न भिडतात? आपण कोणत्या प्रश्नावर विचार करतो? याचाही उलगडा होत जातो. मयूर बागुल यांचे हे पुस्तक या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.
अंमळनेरसारख्या छोट्या गावातून पुण्यासारख्या महानगरीत ते आले आहेत. त्यांना भिडणाऱ्या प्रश्नावर ते विचार करतात. मनात आलेले विचार शब्दबद्ध करतात. ते कोणते प्रश्न आहेत? आजच्या तरुण पिढीने विचार करायचा झाल्यावर कोणत्या मुद्द्यांवर विचार करेल? त्याची सारी नोंद या लेखसंग्रहात सापडते.
शेती-शेतकरी, पाणी-हवामान आणि लोकशाही-राजकारण हे तीन प्रमुख सर्वाधिक जिव्हाळ्याचे दिसतात. त्या शिवाय शेतकरीविरोधी कायदे, हवामानबदल, तरुणाई, शिक्षण, मराठी भाषा, जात-धर्मवाद, स्त्रियांचे स्थान, खुलीकरण, करोना, सामाजिक संस्था हेही लेखकाच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत.
या सर्व लेखांत एक सूर शोधायचा प्रयत्न केला तर केवळ मयूर बागुल यांची प्रामाणिक धडपड दिसेल. जपानीत एक म्हण आहे, मला त्या देशातील मुले कोणते गीत गातात ते सांगा, मी त्या देशाचे भवितव्य सांगतो. हीच म्हण येथे लावून पाहिली तर आपण असे म्हणू शकतो की, त्या देशातील तरुण पिढीने लिहिलेले लेख मला दाखवा, मी त्या देशाचे भविष्य सांगतो. त्यासाठी मयूर बागुल यांचा हा लेखसंग्रह तुमच्या हाती पडला तर निश्चितपणे आपण आपल्या देशाचे भवितव्य उजळ आहे, असे ठामपणे सांगू शकतो.
शेती-शेतकऱ्यांविषयी मराठीत विपुल लेखन झाले आहे. प्रामुख्याने दोन प्रकारचे लेखन दिसून येते. पहिला प्रकार शेती व शेतकऱ्यांचे उदात्तीकरण करणारा आहे. त्यात शेतकरी बळीराजा, अन्नदाता, पोशदा आदी शब्द आढळून येतात. दुसरा प्रकार विलाप करणाऱ्यांचा आहे. ते शेतकऱ्यांचे दुःख ओरडून सांगतात व सरकारकडून अपेक्षा करतात! पण शेतकऱ्यांची दुर्दशा कायद्यांनी केली आहे, असे क्वचित कोणी दाखवून देते. या ‘क्वचित’ मध्ये मयूर बागुल यांचा समावेश होतो. शेतीच्या दुर्दशेबद्दल मयूर बागुल यांनी अनेक लेख लिहिले आहेत. त्यात त्यांनी कमाल शेतजमीन धारणा (सीलग) कायदा, आवश्यक वस्तू कायदा या नरभक्षी कायद्यांनी शेतकऱ्यांना जर्जर केले असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी हेहे दाखवून दिले आहे की परिशिष्ट-9 किती भयंकर घटनादुरुस्ती आहे. घटना लागू झाल्यानंतर अवघ्या दीडच वर्षांनी पहिली घटनादुरुस्ती करण्यात आली. त्याद्वारे नववे परिशिष्ट घटनेत जोडले गेले. त्या परिशिष्टात टाकलेल्या कायद्याच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागता येत नाही. आज या परिशिष्टात 285 कायदे आहेत. त्यापैकी 250 कायदे शेतीशी निगडित आहेत. सीलग, आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण हे सर्व घटनाविरोधी कायदे कायम राहिले कारण ते परिशिष्ट 9 मध्ये टाकले आहेत.
हे कायदे काँग्रेसने केले. डाव्या पक्षांनी त्याना वारंवार पाठींबा दिला परंतु उजव्या समजल्या जाणाऱ्या भाजपने देखील हे कायदे जपले आहेत. एवढेच नव्हे तर मिटक्या मारीत त्यांची अंमलबजावणी केली आहे. परिशिष्ट-9 आणि सीलग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण या कायद्यांच्या बाबत आज सगळेजण दुर्लक्ष करतात. सत्ताधारी असो की विरोधी पक्ष तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प आहे. मीडीयाला शेतकरी आत्महत्यांशी घेणे-देणे नाही. सगळ्यात दु:खद गोष्ट अशी की, कोणीही विद्वान म्हणवणारा माणूस या बाबत आवाज उठवताना दिसत नाही. अशा काळात मयूरसारखा तरुण निधड्या छातीने हे सत्य उजागर करीत आहे. हे या लेखसंग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
लोक चळवळीचे राजकारणात प्रतिबब उमटत नाही. हा एक मोठा तिढा आहे. तरुणांना एवढेच लक्षात येते की, विद्यमान राजकारणी भ्रष्ट आहेत. समाजात भेदाभेद पसरवतात. सत्तेचा दुरुपयोग करतात पण हे असे का आहे याच्या ते खोलात जात नाहीत. सत्ता भ्रष्ट होण्याचे व त्यात एकाधिकारशाही येण्याची दोन मुख्य कारणे आहेत. 1) सत्ता आणि तिजोरी यांची जवळीक 2) निवडणूक पद्धत.
आपण सुरुवातीपासून सरकारीकरणाचा स्वीकार केला. सरकारला मायबाप समजले. 1990 ला आपण खुलीकरण स्वीकारले तरी आपला सरकारीकरणाचा मार्ग आपल्या सरकारने सोडला नाही. सत्ताधीशांना देशाची तिजोरी वापरायला मिळू लागली. जी.एस.टी.ने अमाप सरकारी उत्पन्नाची सोय लावून दिली. जेथे गुळाची ढेप असते तेथे मुंगळे जाणारच आणि ही ढेप आता खूप मोठी झाली आहे, म्हणून मुंगळ्याची आपसातील स्पर्धा जिवघेणी झाली आहे. सत्ता आणि संपत्ती यांचे अंतर वाढले पाहिजे तरच यावर उपाय निघू शकेल पण हे कोण करणार? सत्ताधीशांनाच करावे लागेल. ते का करतील? मुंगळे कधीच गुळाची ढेप पाण्यात ढकलून देत नसतात.
चांगल्या लोकांनी सत्तेत जाऊन ते बदलून टाकावे, असा एक उपाय सांगितला जातो. यात पहिला प्रश्न पडतो की, चांगला माणूस कसा ओळखावा? चांगला माणूस ओळखायचे यंत्र अद्याप तरी निघालेले नाही. चांगली माणसे राजकारणात अजिबात नव्हती असेही नाही पण त्यांना काही करता आले नाही. सत्ता आणि तिजोरीचे अंतर वाढवण्याऐवजी ते तिजोरीचा लोकहितासाठी वापर करण्याचा दावा करतात. मुद्दा हा आहे की लोकहित काय आहे? व ते कोण ठरवणार? सत्ताधारी जर लोकहित ठरवत असेल तर व्यवस्थेत बदल तो काय होणार?
चळवळींचा प्रभाव सत्तेवर पडायचा असेल तर निवडणूक पद्धत बदलावी लागेल. आज ज्याला वीस आणि तीस टक्के मते पडतात, तोही निवडून येऊ शकतो. किमान एक्कावन्न टक्के मते मिळाली तरच तो निवडून येईल, एवढा तरी बदल तातडीने व्हायला हवा. या शिवायही आणखीन बरेच बदल करावे लागणार आहेत पण हे बदल कोण करू शकतो? सत्ताधारीच हे बदल करू शकतात. सत्ताधारी त्यांच्या गैरसोयीचे बदल का करतील? हा प्रश्न पुन्हा इथेही विचारात घेणे भाग पडते. आपण सत्ताधारी वर्गाच्या हातात सगळे सोपवून बसलो म्हणून आज ही अगतिक परिस्थिती निर्माण झाली आहे.
सत्ताधीश आणि तिजोरीतले अंतर वाढविणे काय कवा निवडणूक पद्धतीत बदल करणे काय, ह्या दोन्ही गोष्टी लोकांच्या अखत्यारीत राहिलेल्या नाहीत. तेव्हा कोणत्या मार्गाने हे बदल करवून घेता येतील? याचा तरुणांनी सखोल विचार केला पाहिजे.
मयूर बागुल यांनी करोना काळात पुण्यात मोठे काम केले होते, याची मला कल्पना आहे. त्यांनी सामाजिक कार्य या विषयात उच्च शिक्षण घेतले आहे. त्याहीपेक्षा सामाजिक कामाचा त्यांचा पड आहे. संकटग्रस्तांसाठी धाऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. अतिवृष्टीग्रस्तांसाठी देखील त्यांनी निधी गोळा केला होता व पुण्याहून धाराशिवला जाऊन त्यांनी त्या मदतीचे वाटप केले होते. या व्यक्तिमत्त्वाची छाप असणारे काही लेख या संग्रहात आहेत. ते स्वाभाविक आहे.
पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत. अनेक सामाजिक संस्था पाण्यावर काम करतात. गेल्या अनेक वर्षापासून काम करतात पण प्रश्नाचा तिढा त्यांनाही उकलता आला नाही. पर्यावरणवाद्यांचे एक लाडके विधान असते. ते म्हणतात, तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल. करोनाची आपत्ती आली. त्याला अनेकांनी जागतिक युद्ध असे संबोधले. ते खरे मानले तर तिसरे जागतिक युद्ध आता होऊन गेले आहे. ते मानव विरुद्ध विषाणू असे होते आणि तो धोका कायम आहे.
जोपर्यंत पृथ्वीवर समुद्र आहे, समुद्रात पाणी आहे, तोपर्यंत पाण्याचा तुटवडा कवा टंचाईचा बागुलबुवा करण्याची आवश्यकता नाही. प्रश्न क्रयशक्तिचा आहे. तुमची क्रयशक्ती बळकट असेल तर तुम्ही त्यावर सहज मात करू शकता. अरबस्थानमध्ये सगळीकडे वाळवंट आहे. मैलोन मैल पाण्याचा थेंब मिळत नाही. अशा वाळवंटात दरवर्षी हज यात्रा भरते. जगभरातून लाखो नव्हे कोट्यवधी लोक येऊन तेथे राहतात. त्यांना लागणाऱ्या पाण्याची त्यांनी काय सोय केली? त्यांनी चक्क समुद्रातील पाणी शुद्ध करून, पाचशे किलोमीटरची पाईप लाईन टाकून मक्क्यापर्यंत आणले. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे ती सोय त्यांना करता आली. सीलगचा कायदा नसता व मराठवाड्यात कोणाच्या कंपनीकडे दोन हजार एकर जमीन असती तर त्याने दुष्काळात होणारे नुकसान टाळण्यासाठी थेट समुद्रातून पाईपलाईन टाकून पाणी आणले असते पण कायदे लादून आमच्या शेतकऱ्यांना विकलांग करून टाकले व विकलांग करणाऱ्याच्याच पुढे याचक म्हणून उभे केले.
मुद्दा सरकारीकरणाचा कवा खाजगीकरणाचा नाही. मुद्दा स्पर्धेचा आहे. महामंडळाची एस.टी. बसही चालावी आणि खाजगी ट्रॅव्हल्सही चालावी. दोघांत स्पर्धा राहावी. पाण्याच्या बाबतीत दोन्ही पर्याय खुले ठेवले तरच लोकांना चांगली सेवा रास्त भावात मिळू शकेल. 75 वर्ष आपण एकमेव सरकारी पर्याय वापरून पाहिला. आपण लोकांना स्वच्छ आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून देऊ शकलो नाही म्हणून आपण आता दुसरेही दार उघडले पाहिजे.
मयूर बागुल यांनी तरुणाईकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत व त्या रास्त आहेत. जेपी आंदोलनाच्या काळात आम्ही युवा होतो. तो काळ आजही आम्हाला आठवतो आणि आम्ही रोमांचित होतो. त्या काळात आपण तरुण होतो म्हणूनच ते करू शकलो होतो. मयूर बागुल यांनी वाचक चळवळीचे जोरदार समर्थन केले आहे. तो त्यांचा अधिकार आहे. मयूर बागुल खूप चांगले वाचक आहेत. त्यांचे मराठी, हदी आणि इंग्रजीचे उत्तम वाचन आहे. त्यांच्या लिखाणात अनेक ठिकाणी खूप समर्पक कोटेशन्स येतात, ते त्यामुळेच. त्यांनी तरुण मित्रांना वाचनाचा दिलेला सल्ला गंभीरपणे घेतला पाहिजे. शिक्षण आणि भाषा या विषयावर त्यांनी लिहिलेल्या लेखांवर देखील चर्चा होऊ शकते.
जो शेतकरी प्रश्नाला भिडला तो आपोआप स्त्री प्रश्नाकडे वळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये शेतकरी आणि स्त्रियांना सन्मान दिला होता. महात्मा फुले यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ लिहिला तसेच स्त्रियांच्या प्रश्नांवर अनेक क्रांतिकारी पाउले उचलली. चम्पारणला शेतकऱ्यांचा प्रश्न होता पण महात्मा गांधींनी तेथे स्त्रियांचा सहभाग असेल तरच मी येईन अशी अट टाकली होती. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आंदोलन केले व त्यास शेतकरी महिला आघाडीची जोड दिली. या सर्वांच्याकडे पाहून आपण असे म्हणू शकतो की, सर्जकांचे स्वातंत्र्य या सर्वांसाठी महत्त्वाचे होते. शेतकरी आणि स्त्री दोघे सर्जक आहेत आणि हे दोघेच सर्वात जास्त वाईट परिस्थितीत आहेत. मयूर बागुल यांनी देखील स्त्री प्रश्नाचा विचार केला आहे.
भारतात राहणारा कोणीही संवेदनशील माणूस जातवाद आणि धर्मवाद याचा विचार करणार नाही असे होऊच शकत नाही. हदू-मुस्लीम, शूद्र-ब्राह्मण, आगडे-पिछडे, बहुजन-सवर्ण हे वाद येथे आहेत. काहींनी सोपा पण कालबाह्य मार्ग पत्करला, मुस्लीम राष्ट्र कवा हदू राष्ट्र. हा मार्ग मानवजातीला पुढे नेणारा नाही, हा जगाचा अनुभव आहे. म्हणून महात्मा गांधी यांनी मानवतेच्या आधारावर देश उभा करण्याचा प्रयत्न केला. जाती-धर्माच्या पलीकडे माणूस असतो. तिथपर्यंत पोचायला हवे. दुर्दैवाने आपल्या देशातील निवडणूक पद्धतीमुळे झुंडींना महत्त्व आले. जात धर्माच्या झुंडी तयार करणे सोपे जाते म्हणून या देशातील अनेक राजकीय पक्षांनी जात-धर्माच्या द्वेषाला खतपाणी घातले. आज ह्या प्रश्नाने राक्षसाचे रूप घेतले आहे. मयूर बागुल यांनी त्यांच्या लेखात या मुद्द्याचाही उहापोह केला आहे.
सामाजिक जाण असणाऱ्या तरुणांना कोणते मुद्दे अस्वस्थ करतात? या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकाची अनुक्रमणिका वाचून मिळेल पण अस्वस्थतेचे स्वरूप काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक वाचावे लागेल. मयूर बागुल यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
अमर हबीब
किसानपुत्र आंदोलन
आंबाजोगाई
मो. 8411909909
Do we think coherently? If one wishes to discover the answer to this, one must simply begin to write. Writing unravels the questions that haunt us and reveals the issues we truly ponder. In this regard, this book by Mayur Bagul is of significant importance.
Hailing from the small town of Amalner to the metropolis of Pune, Mayur reflects deeply on the questions that confront him. He translates these thoughts into words. What are these questions? If the youth of today were to sit down and think, what issues would they contemplate? A record of this collective consciousness is found in this collection of essays.
Agriculture-Farmers, Water-Climate, and Democracy-Politics appear to be the three subjects closest to his heart. Beyond these, the author deeply engages with topics such as anti-farmer laws, climate change, the youth, education, the Marathi language, caste-religion dynamics, the status of women, liberalization, the Corona pandemic, and social institutions.
If one attempts to find a common thread running through all these essays, one finds Mayur Bagul’s honest struggle. There is a Japanese proverb: "Tell me the songs the children of that nation sing, and I will tell you its future." Applying this wisdom here, we might say: "Show me the articles written by the youth of a nation, and I will tell you its future." If Mayur Bagul’s collection falls into your hands, we can state with conviction that our country’s future is indeed bright.
There has been prolific writing on agriculture and farmers in Marathi. Broadly, two types of writing emerge. The first type glorifies the farmer, using terms like Baliraja (King Bali), Annadata (Provider of Food), and Poshinda (Provider). The second type is of those who lament; they scream about the farmers' sorrow and beg for relief from the government! However, rarely does anyone demonstrate that the farmer’s misery is manufactured by laws. Mayur Bagul belongs to this rare category.
Mayur has written several articles on the plight of agriculture. He notes how draconian laws like the Land Ceiling Act and the Essential Commodities Act have crippled farmers. He exposes just how terrifying Schedule 9 of the Constitution is. Barely a year and a half after the Constitution was adopted, the First Amendment was passed, inserting the Ninth Schedule. Laws placed in this Schedule cannot be challenged in court. Today, there are 285 laws in this Schedule, of which 250 are related to agriculture. The Ceiling Act, Essential Commodities Act, and Land Acquisition Act—all fundamentally anti-constitutional—remain in force simply because they are locked in Schedule 9.
These laws were enacted by the Congress. The Leftist parties repeatedly supported them. Yet, the BJP, considered right-wing, has also preserved them—nay, they have implemented them with gusto. Today, everyone ignores the reality of Schedule 9 and these oppressive laws. Whether in power or in opposition, political parties keep a convenient silence. The media has no concern for farmer suicides. The tragedy is that no self-proclaimed "intellectual" is seen raising a voice against this. In such times, a youth like Mayur is exposing this truth with a broad chest. This is the greatest feature of this collection.
People's movements do not find reflection in politics. This is a major dilemma. The youth realize that current politicians are corrupt, that they spread discrimination and abuse power, but they do not delve into why this is so. There are two main reasons for power becoming corrupt and authoritarian: 1) The proximity of Power to the Treasury, and 2) The Electoral System.
We accepted statism (government control) from the beginning. We treated the government as Mai-Baap (parents). Even though we accepted liberalization in 1990, our government did not abandon the path of control. Those in power gained access to the nation's treasury. GST provided a mechanism for immense government revenue. Where there is a lump of jaggery, ants are bound to gather. This lump has now become massive, making the competition among the ants deadly. The distance between Power and Wealth must increase for a solution to emerge—but who will do this? The rulers themselves must do it. But why would they? Ants never push the jaggery into the water.
A solution is often suggested: "Good people should enter power and change it." The first question is, how does one identify a good person? The machine to identify a 'good person' has not yet been invented. It is not that good people were never in politics, but they could achieve little. Instead of increasing the distance between power and the treasury, they claim they will use the treasury for "public interest." The point is, what is public interest? And who decides it? If the ruler decides what is in the public interest, what change will occur in the system?
If movements are to impact power, the electoral system must change. Today, a candidate with 20% or 30% of the vote can get elected. Immediate change is needed so that a candidate is elected only if they secure at least 51% of the votes. Many other changes are needed, but who can execute them? Only those in power. Why would rulers make changes that inconvenience them? We are forced to consider this question again. Because we have surrendered everything into the hands of the ruling class, this helpless situation has arisen.
Increasing the distance between the ruler and the treasury, or changing the electoral system—neither of these remains within the people's jurisdiction. So, by what means can these changes be forced? The youth must think deeply about this.
I am aware of the extensive work Mayur Bagul did in Pune during the Corona period. He holds a higher degree in social work, but more than that, he has a natural inclination for it. He has a temperament to rush to the aid of the distressed. He collected funds for flood victims and traveled from Pune to Dharashiv to distribute aid. Essays bearing the imprint of this personality are naturally present in this collection.
He has written many articles on the water crisis. Many NGOs work on water. They have worked for years, yet the puzzle remains unsolved. Environmentalists have a favorite statement: "The Third World War will be fought over water." Then came the disaster of Corona. Many called it a World War. If we accept that, the Third World War has already happened—it was Human vs. Virus, and that danger remains.
As long as there is a sea on Earth, and water in the sea, there is no need to create a bogeyman of water scarcity. The question is of purchasing power. If your purchasing power is strong, you can easily overcome it. Saudi Arabia is entirely desert. For miles, there is not a drop of water. Yet, the Hajj pilgrimage takes place there every year. Millions, nay billions, gather there. How did they arrange for water? They simply desalinated sea water and piped it 500 kilometers to Mecca. They have abundant money, so they could provide that facility.
If there were no Ceiling Act, and if a company in Marathwada owned two thousand acres of land, it would have laid a pipeline directly from the sea to prevent drought losses. But by imposing laws, we crippled our farmers and forced them to stand as beggars before the very people who crippled them.
The issue is not of Nationalization or Privatization. The issue is of Competition. The state transport bus should run, and private travels should also run. There should be competition between the two. Only if both options are kept open regarding water will people get good service at reasonable rates. For 75 years, we tried the single option of government control. We could not provide clean and adequate water to the people, so now we must open the second door.
Mayur Bagul has expressed many expectations from the youth, and they are justified. We were young during the JP Movement (Jayaprakash Narayan). We still remember those days and feel thrilled. We could do what we did because we were young. Mayur has strongly supported the reading movement. That is his prerogative. Mayur is an avid reader of Marathi, Hindi, and English. That is why very apt quotations appear in many places in his writing. Young friends should take his advice on reading seriously. His essays on education and language are also worthy of discussion.
Whoever tackles the agrarian question automatically turns to the question of women. Chhatrapati Shivaji Maharaj gave dignity to farmers and women in Swarajya. Mahatma Phule wrote Shetkaryacha Aasud (The Cultivator's Whip-cord) and took revolutionary steps regarding women's issues. The issue in Champaran was about farmers, yet Mahatma Gandhi laid down a condition that he would only come if women participated. Sharad Joshi led a massive farmers' movement and attached a specialized women's front to it. Looking at all of them, we can say that the freedom of the creator was important to all of them. Both the farmer and the woman are creators (Srajak), and these two are in the worst condition. Mayur Bagul has also contemplated the women's question.
It is impossible for any sensitive person living in India not to think about casteism and communalism. Hindu-Muslim, Shudra-Brahmin, Forward-Backward, Bahujan-Savarna—these conflicts exist here. Some chose the easy but outdated path: a Muslim Nation or a Hindu Nation. The world's experience shows this path does not lead humanity forward. Therefore, Mahatma Gandhi tried to build a nation based on humanity. A human being exists beyond caste and religion. We need to reach there. Unfortunately, due to our electoral system, importance has been given to "herds" (vote banks). Since it is easy to form herds based on caste and religion, many political parties in this country have fueled hatred. Today, this issue has taken a monstrous form. Mayur Bagul has discussed this point in his articles as well.
What issues unsettle the socially conscious youth? The answer to this can be found by reading the table of contents, but to understand the nature of this unrest, you must read this book.
Best wishes for Mayur Bagul’s future journey!
Amar Habib
Kisanputra Andolan Ambajogai
Mobile: 8411909909
.jpg)








Comments