top of page

हे जग तितकंसं वाईट नाही

  • Jul 31, 2024
  • 1 min read

भरभक्कम सावल्यांचे अंधार झाले आणि दिवसांचे लाईट लांबले लांब लांब काळोखाला ख्यालीखुशाली फिजूल बोलून आलो चूना जास्त झाला सोलली गेली शहराच्या दाढेत माझी त्वचा फुलपाखराचं वय लाभेल आणि मी जगायला सुरु करेल जसं चाळीसचा पास काढण्याआधी खूप जगू वाटत होतं इच्छा तर होती स्वतःचा खडकवासला होईल डंपगवर साचेबंद सौंदर्याचा थर आयुष्य पेलवेल असं अस्तित्वही नाही सैरभैर मनाचं जडत्व पळवाट आणि शोधूनही पळता येत नाही हा थकवा सोडून बघता येत नाही ते लांब गेलेलं असतं आधीच पकडून ठेवावं अशी वाळू नाही ह्या नदीजवळ उब संपलेल्या दिवसांची गोष्ट लिहीत होतो हे हात अजूनही गरम आहेत तुझ्या हातात एक खिडकी आणि मला अजूनही वाटतं हे जग तितकंसं वाईट नाही इथून... -कमलेश राजेंद्र महालेनंदुरबार, 8999924218

Recent Posts

See All
मुलाखतींचे पर्व निर्माण करणारे सुधीर गाडगीळ

सुधीर गाडगीळ - एक नाव जे मराठी रसिक श्रोत्यांच्या मनात निवेदनासाठी आणि प्रभावी मुलाखतींसाठी कोरले गेले आहे. या खास मुलाखतीमध्ये, घनश्याम पाटील यांनी सुधीर गाडगीळ यांच्या जीवनप्रवासातील अनेक पैलूंना स्

 
 
 
स्त्री लिखित आत्मचरित्रांचा प्रवास

म. ज्योतिबा फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. एक ऐतिहासिक घटना म्हणूनच याचं वर्णन करावं लागेल कारण स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती न समजण्याचा तो काळ. त्यामुळे

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page