top of page

होता आलं पाहिजे झाड

  • Apr 19, 2025
  • 1 min read

माणसाला होता आलं पाहिजे झाड, त्याला उगवता आलं पाहिजे, प्रस्तराच्या नाभीतून... आणि सताड झेपावत आकाशात, पसरवता आल्या पाहिजे फांद्या... त्याला डोलता आलं पाहिजे, वाहणार्‍या वार्‍यासोबत, त्याला बोलता आलं पाहिजे, बरसणार्‍या धारांसोबत... तो हसत राहावा, हिवातील दवबिंदूंच्या कणांतून नि रापत्या उन्हातून... त्याला सहता यावीत सारेच ऋतुरंग, गाळून शिशिरात पाने, वसंतात पुन्हा बहरावे... ...खोडाने उभे असावे कणखर, मुळांनी शोधत ओल, रुतावे मातीत खोल खोल... -राम बागडे गोंदिया. 7798159213

Recent Posts

See All
हे जग तितकंसं वाईट नाही

भरभक्कम सावल्यांचे अंधार झाले आणि दिवसांचे लाईट लांबले लांब लांब काळोखाला ख्यालीखुशाली फिजूल बोलून आलो चूना जास्त झाला सोलली गेली शहराच्या दाढेत माझी त्वचा फुलपाखराचं वय लाभेल आणि मी जगायला सुरु करेल

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page