आदर्श बाबा
Jul 30
1 min read
बाबा, अडगळीत पडलेली तुझी चप्पल आज घालून पाहिली!
आपसूकच तुझ्या जीवनाची संघर्षयात्रा मज उमगली!!
कळत नकळत पाय माझे थोडे जड झाले, रे!
तुझ्या त्या भेगाळलेल्या पावलांची वेदना जाणवली!!
स्मरला तू आणि आईने ओढलेला संसाराचा गाडा, तो!
संघर्षात त्या तुझी अपुरी राहिलेली स्वप्नेही सापडली!!
स्मरतो आम्हा सदा तुझा तो त्याग रे, बाबा!
तुझ्या त्या समर्पणातच तुझी कर्तव्यनिष्ठा समजली!!
स्मरला तुझ्या भावनांचा फुटलेला बांध, तो!
तुझ्यात दडलेल्या आईची हळवी मायाही कळली!!
मलाही व्हायचे आहे तुझ्यासारखा रे आदर्श बाबा!
कल्पनेनेच मान माझी अभिमानाने ताठ जाहली!!
- रवींद्र कामठे
9421218528
.jpg)



Comments