top of page

लेकी - प्रतिभा पवार खैरनार

1 day ago
1 min read

एक वर्तुळ आखुन घेते मी

स्वतःभोवती

जिथे मी स्वतःला पुसट करून

गिरवत असते,

माझ्यावर ताणलेले

समाजाचे असंख्य खुळचट ताशेरे...

मर्यादेच्या अमर्याद नियमावलींची

चौकट घालून घेते

स्वप्नांच्या परिघाला...

जबाबदारी कर्तव्यांचा

फास आवळून घेते गळ्याभोवती

घरंदाज बाईचा दागिना म्हणत,

आणि

एक दिवस,

वीजेच्या कडकडाटासह

एका पावसाच्या सरीत

चिंब भिजून

मी होत जाते ठळक

आणि

ती वाहवत नेते

माझ्याभोवती वेढलेले

काटेरी झुडपांचे

जन्मभराचे दावेदार...

आणि

लोक म्हणतात,

लेकी जन्माला पूरत नसतात...



- प्रतिभा पवार खैरनार

नांदगाव, जि. नाशिक

7219551614

Recent Posts

See All
होता आलं पाहिजे झाड

माणसाला होता आलं पाहिजे झाड, त्याला उगवता आलं पाहिजे, प्रस्तराच्या नाभीतून... आणि सताड झेपावत आकाशात, पसरवता आल्या पाहिजे फांद्या... त्याला डोलता आलं पाहिजे, वाहणार्‍या वार्‍यासोबत, त्याला बोलता आलं प

 
 
 
हे जग तितकंसं वाईट नाही

भरभक्कम सावल्यांचे अंधार झाले आणि दिवसांचे लाईट लांबले लांब लांब काळोखाला ख्यालीखुशाली फिजूल बोलून आलो चूना जास्त झाला सोलली गेली शहराच्या दाढेत माझी त्वचा फुलपाखराचं वय लाभेल आणि मी जगायला सुरु करेल

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page