मराठी कवितेची साक्षेपी समीक्षा : जुन्या वाटा नवी वळणे
- Jul 6
- 5 min read
मराठीचे व्यासंगी अभ्यासक व प्रसिद्ध समीक्षक प्रा. सुहासकुमार बोबडे यांचा ‘जुन्या वाटा नवी वळणे’ हा निवडक मराठी कवितेची समीक्षा करणारा ग्रंथ श्री समर्थ प्रकाशन यांनी प्रकाशित केलेला आहे. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना काव्यसंग्रहाचे अध्यापन करत असताना कवितेविषयीची आवड प्रा. सुहासकुमार बोबडे यांच्यामध्ये निर्माण झाली. मनोगतामध्ये ते म्हणतात, “मी वृत्तीने समीक्षक नाही. मी जरी कवी म्हणून प्रसिद्ध नसलो तरी माझा मुळचा पिंड मात्र कवीचा आहे. साहजिकच एक कवी दुसऱ्या कवीला ज्या प्रकारे समजू शकतो तो दृष्टिकोन समीक्षकाचा असेलच असे नाही. विद्यापीठीय पातळीवर वेगवेगळे मान्यवर कवी शिकवत असताना त्यांच्या कवितेतील काही अंशी मला जो नवा आशय गवसला तो मी येथे नोंदवला आहे.”
.jpg)


