चातुर्मास....परंपरेचा सुरेख भक्तीमय संगम | Chaturmas: A beautiful and devotional confluence of tradition
- Jyoti Ghanshyam
- Aug 2, 2025
- 7 min read
आपला भारत देश कृषीप्रधान आणि सुजलाम सुफलाम आहे. विविधतेने नटलेला, संत-महंतांची ही भूमी भक्तीमय गाथा सांगणारी, अखंड प्रेमाची, अभूतपूर्व क्रांतीची आणि थोर विचारांची आहे. आपल्या पूर्वजांकडून पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही संस्कृती आपणही तितक्याच प्रेमाने जपली पाहिजे. सायंकाळी दिवेलागणीच्या वेळी झोपू नये, रात्री लवकर निजून पहाटे लवकर उठावे, नियमित देवपूजा करावी, थोरामोठ्यांचा आदर करावा, अशा सर्व रीतीभाती आजी आम्हाला लहानपणी शिकवायची. "उतू नये, मातू नये... घेतला वसा टाकू नये..." हे आणि असे अनेक संस्कार माझ्या आईकडूनही पुन्हा शिकायला मिळाले. आपल्या सुंदर संस्कृतीची ओळख अधिक दृढ व्हावी आणि पुढच्या पिढीला हे आपले संचित समजावे, हाच माझा एक लहानसा प्रयत्न आहे.
मी स्वतः धार्मिक आहे आणि लहानपणापासूनच या गोष्टी माहीत असल्याने, आपले सण, व्रतवैकल्ये, पूजा-अर्चा, उपासना, सेवाभाव हे सर्व मी कटाक्षाने पाळत आले आहे. यामुळे खूप छान वाटतं. घरातले वातावरण प्रसन्न, शुद्ध आणि मुख्य म्हणजे सकारात्मक राहतं. माझ्या लहानपणी आजीकडून भागवत, रामायणातील गोष्टी ऐकताना 'चातुर्मास' हा शब्द खूप वेळा कानावर पडला होता. पुढे त्यातल्या बऱ्याच कथा नीट ऐकल्या गेल्या. म्हणूनच की काय, आज त्या सर्व गोष्टी मी मनापासून लिहीत आहे.
चातुर्मास म्हणजे काय? तो नेमका कधीपासून कधीपर्यंत असतो, हे आधी सांगते. आपल्या मराठी दिनदर्शिकेनुसार, या वर्षी (२०२५) चातुर्मासाची सुरुवात रविवार, ६ जुलै २०२५ रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या (शुक्ल पक्ष) दिवशी झाली. चातुर्मासाची समाप्ती कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला, म्हणजेच यावर्षी शनिवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.
परंपरेनुसार, चातुर्मासात भगवान श्रीविष्णूंनी या अखंड पृथ्वीतलाचा सांभाळ करण्याची जबाबदारी भगवान शिव भोलेनाथांकडे सोपवून, स्वतः योगनिद्रेसाठी क्षीरसागराकडे प्रस्थान केले. या चार महिन्यांच्या कालावधीला 'चातुर्मास' म्हणतात. या काळात महादेवांवर खूप मोठी जबाबदारी असते. कायम ध्यानमुद्रेत असणारे सदानंदी श्री महादेव या काळात मात्र सदा जागृत राहून सर्वांना भरभरून आशीर्वाद देतात. म्हणूनच भगवान शंकरांना 'भोलेनाथ' असेही संबोधले जाते.
या चार महिन्यांतील पहिला महिना, जो आपल्या सगळ्यांचा खूप आवडता आहे, तो म्हणजे श्रावण. नुकतीच दिव्यांची अवस (दर्श अमावास्या) संपून श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. चोहोबाजूंनी हिरवागार पाचू नेसलेल्या, सृष्टीत नवचैतन्य निर्माण करणाऱ्या, मधूनच वाहणाऱ्या ओल्या वाऱ्याच्या सुखद श्रावणसरी... असा हा आसमंतात हर्ष फुलवणारा श्रावण महिना. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, या महिन्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण वातावरण भगवान शिव भोलेनाथांच्या भक्तीरसात भारलेले असते. उपवास, दानधर्म, व्रते, सेवा या सगळ्यांनी परिपूर्ण असलेला हा पवित्र महिना खास भगवान श्री शंकराच्या पूजेसाठी ओळखला जातो.
श्रावण महिन्यातील चारही सोमवारी उपवास करून प्रत्येक सोमवारी खास 'शिवामूठ' म्हणून तांदूळ, तीळ, मूग, जवस श्रद्धेने शिवलिंगावर वाहिले जातात. 'ओम नमः शिवाय', 'हर हर महादेव'चा जप केला जातो. याचबरोबर नागपंचमी, नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, दहीकाला, पिठोरी पूजा, जिवतीची पूजा असे सारे सण आनंदात साजरे केले जातात. तसेच मंगळवारी नववधूंसाठी मंगळागौर साजरी केली जाते. याचीही खास विधिवत पूजा असते. देवीची आरती करून मोठ्या संख्येने स्त्रिया नटूनथटून एकत्र येतात आणि मंगळागौरीचे खेळ खेळून हा सण उत्साहात साजरा करतात. बालकवी किती सुंदर लिहितात बघा... भाद्रपद महिन्याचा महिमाही सुंदर आहे. भाद्रपदसुद्धा तितकाच पवित्र असतो. हा महिना गणपती बाप्पाच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. स्त्रिया हरितालिकेचे व्रत श्रद्धेने करतात. दुसऱ्या दिवशी भगवान श्री गणेशाला मोठ्या उत्साहात दीड, पाच, सात आणि अकरा दिवस घरी आणून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. घरोघरी त्यांची सेवा होते. ठिकठिकाणी वाजतगाजत, जल्लोषात बाप्पाच्या मोठमोठ्या मूर्ती आणून सार्वजनिक गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जातो. बाप्पाला अकरा, एकवीस मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. अकराव्या दिवशी, म्हणजेच अनंत चतुर्दशीला, बाप्पाचे ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत पाण्यात विसर्जन केले जाते.
अश्विन शुक्ल पक्ष हा महिना माता पार्वतीच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. घटस्थापना करून ठिकठिकाणी नवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. माता दुर्गादेवीने घेतलेली नऊ तेजस्वी रूपे आपल्याला सार्वजनिक ठिकाणी पाहायला मिळतात. या नऊ दिवसांत आपण गरबा, भोंडला खेळून नवरात्रीचे जागरण करतो. दहावा दिवस विजयादशमी, म्हणजेच दसरा. त्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा, म्हणजेच अहंकाराचा आणि दुष्ट बुद्धीचा विनाश करून विजय मिळवला. म्हणून आपण तो शुभ दिवस 'सोनं' (आपट्याची पाने) लुटून जोशात साजरा करतो.
चौथा महिना, कार्तिक, भगवान कार्तिकेय यांच्या पूजेसाठी समर्पित असतो. या महिन्यात अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा दिव्यांचा लक्षणीय सण, 'दिवाळी', सर्वत्र साजरा केला जातो. दिवाळीच्या चारही दिवसांना महत्त्व आहे, त्यांतही लक्ष्मीपूजेला विशेष महत्त्व आहे. पंचांग वेळेनुसार सायंकाळी लक्ष्मीपूजन मनोभावे केले जाते. दारात आकाशकंदील, पणत्या, रांगोळी... सारं काही मंगलमय आणि अद्भुत असतं. खमंग लाडू, करंजी, शेव, चकली, चिवडा असा फराळ केला जातो. नंतर तुळशी विवाह असतो आणि त्यानंतर येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेला 'त्रिपुरारी पौर्णिमा' असे म्हणतात. त्या दिवशी दिव्यांची आरास केली जाते.
अशा या चातुर्मासावर अनेकांची गाढ श्रद्धा आहे. काही लोक फक्त एक वेळ जेवतात, तर बरेच जण मांसाहार न करता केवळ सात्त्विक आहार घेतात. या चार महिन्यांत शिवलिंगावर पांढरी फुले आणि बेलपत्र वाहिले जातात. या चातुर्मासात आपल्या कुलस्वामिनीचे, अन्नपूर्णा देवीचे कुंकुमार्चन करण्याचीही पद्धत आहे. नियमितपणे श्री सूक्त, दुर्गा सप्तशती, शिवलीलामृत, गुरुचरित्र या पवित्र ग्रंथांचे पारायण केले जाते. आपल्या वास्तूत नित्यनियमाने पूजा-हवन केल्याने आपली वास्तू कायम आनंदी आणि प्रसन्न राहते.
असा हा आपला चार महिन्यांचा शुद्ध, पवित्र आणि मंगलमय संगम म्हणजेच 'चातुर्मास'. तिन्हीसांजेला मंद तेवणाऱ्या निरांजनासमोर बसून घरातली गृहिणी जेव्हा कहाणी वाचत असते... "ऐका देवा, तुमची कहाणी... आटपाट नगर होतं..." आणि "जसा तिला देव प्रसन्न झाला, तसा तुम्हां-आम्हां होवो... ही साठा उत्तरांची कहाणी, पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण," हे शब्द कानांत गुंजायला लागतात, तेव्हा मन स्वच्छ आणि प्रसन्न होतं. श्रावणातला तो मंगल दरवळ मनात जाणवायला लागतो. खरंच, आपल्या या परंपरा खूप उज्ज्वल आहेत.
|| शुभं भवतु ||
- सौ. मेघा विकास वायंगणकर
चार बंगला, अंधेरी
Chaturmas: A beautiful and devotional confluence of tradition
Our country, India, is an agrarian nation, bounteous and fertile. Adorned with diversity, this is a land of saints and sages, a land that tells tales of devotion, of unending love, unprecedented revolution, and profound thoughts. We must also cherish and preserve this culture, passed down through generations from our ancestors, with the same love. My grandmother used to teach us in our childhood: "Do not sleep at dusk when the lamps are lit, sleep early at night and wake up early in the morning, perform daily prayers (), and respect your elders." Proverbs like, "Don't let success go to your head and become arrogant... Don't abandon a vow once taken..." and many such values I learned again from my mother. This is my humble attempt to strengthen the understanding of our beautiful culture and to help the next generation appreciate this heritage.
Being religious myself and having known these things since childhood, I have meticulously followed our festivals, fasts (), rituals (), worship, and service. It feels wonderful. The atmosphere at home remains cheerful, pure, and most importantly, positive. In my childhood, while listening to stories from the Bhagavata Purana and Ramayana from my grandmother, I often heard the word 'Chaturmas'. That is perhaps why, today, I am writing about all these things from the heart.
What is Chaturmas? Let me first explain what it is and its exact duration. According to our Marathi calendar, this year (2025), Chaturmas begins on Sunday, July 6, 2025, which is Devshayani Ashadhi Ekadashi (the 11th day of the waxing moon in the month of Ashadh). The period concludes on Saturday, November 1, 2025, on Kartiki Ekadashi, also known as Dev Uthani Ekadashi.
Tradition tells us that during Chaturmas, Lord Vishnu entrusts the responsibility of nurturing the entire earth to Lord Shiva and departs for the (the cosmic ocean of milk) to enter a state of yogic sleep (). This four-month period is called 'Chaturmas'. During this time, a great responsibility rests on Lord Mahadev (Shiva). The ever-blissful Lord Mahadev, who is usually in deep meditation, remains ever-awake during this period, showering everyone with abundant blessings. This is why Lord Shankar is also affectionately called 'Bholenath' (the innocent lord).
The first of these four months, and a favorite of many, is Shravan. Just after the 'Divyanchi Amavasya' (the new moon of lamps), the month of Shravan begins. Shravan fills the entire cosmos with joy, with nature draped in emerald green, a new life force pulsating through creation, and the pleasant showers bringing a cool, moist breeze. Most importantly, the special feature of this month is that the entire atmosphere is steeped in devotion to Lord Shiva. This sacred month, filled with fasting, charity, vows, and service, is especially known for the worship of Lord Shiva.
On all four Mondays of Shravan, people fast and offer a 'Shiva-mooth'—a symbolic fistful of grains like rice, sesame seeds, moong beans, or flax seeds—to the Shivalinga with deep faith. Chants of 'Om Namah Shivaya' and 'Har Har Mahadev' resonate everywhere. Along with this, festivals like Nag Panchami, Narali Purnima, Raksha Bandhan, Krishna Janmashtami, Dahi Kala, and Pithori Puja are all celebrated with great joy. Furthermore, Tuesdays are for 'Mangalagaur,' celebrated by newly married women. This also involves a special, ritualistic puja. After performing the Devi's (ritual of waving lamps), a large number of women, dressed in their finest, gather to celebrate with traditional games and enthusiasm. Look how beautifully the poet Balakavi writes...
The glory of the month of Bhadrapad is also beautiful. This month is famous for the worship of Ganpati Bappa. Women observe the 'Haritalika' fast with devotion. The next day, Lord Ganesha is welcomed into homes with great enthusiasm for one and a half, five, seven, or eleven days, and worshipped with heartfelt devotion. Public Ganeshotsav is also celebrated grandly, with large idols of Bappa being brought in with music and joyous processions. An offering () of eleven or twenty-one is made to Bappa. On the eleventh day, Anant Chaturdashi, the idol is immersed in water with grand processions.
The waxing moon phase of the month of Ashwin is dedicated to the worship of Mother Parvati. The Navratri festival is celebrated with great pomp by performing 'Ghatasthapana' (the ritual of installing a sacred pot). During these nine days, we celebrate by playing Garba and Bhondla. The tenth day is Vijayadashami, or Dussehra. On this day, Lord Rama achieved victory by destroying Ravana, who symbolized ego and malevolence. Therefore, we celebrate this auspicious day with great zeal by exchanging 'gold' (leaves of the Apta tree).
The fourth month, Kartik, is dedicated to the worship of Lord Kartikeya. During this month, the festival of lights, Diwali, which leads us from darkness to light, is celebrated everywhere. All four days are significant, with Lakshmi Puja holding special importance. The (sky lantern) at the door, the earthen lamps, the ... everything is auspicious and wonderful. This is followed by Tulsi Vivah (the ritual marriage of the holy basil plant). The subsequent Kartik Purnima is called 'Tripurari Purnima,' on which day we create beautiful arrangements of lamps.
Many people have deep faith in this period of Chaturmas. Some people eat only once a day, while many consume only a (pure and simple) diet. During these four months, white flowers and (bilva leaves) are offered to the Shivalinga. Sacred texts like the Sri Sukta, Durga Saptashati, and Shivlilamrut are regularly recited. By regularly performing and (fire rituals) in our homes, the dwelling remains happy and serene.
Such is this confluence of four months—pure, sacred, and auspicious—which we call 'Chaturmas'. At twilight, when the lady of the house sits before a gently glowing lamp and reads a traditional story, her words start to echo in the ears, and the mind becomes clear and serene. The auspicious fragrance of Shravan begins to fill the heart. Truly, these traditions of ours are incredibly radiant.
|| Shubham Bhavatu || (May all be auspicious)
Mrs. Megha Vikas Vayangankar Char Bungla, Andheri
.jpg)







Comments