top of page

वारीतून शिकूया उत्कृष्ट व्यवस्थापन | Excellent Management : Lessons from the Wari

पावसाळा सुरू झाला की जून-जुलैमध्ये पालख्यांचे वेध लागतात. दिंड्या, पताका घेऊन मुखाने ज्ञानोबा-तुकोबांचा आणि सर्व संतांना प्रिय असणाऱ्या विठ्ठलाचा गजर करीत वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. महाराष्ट्रातला अलौकिक असा हा वारीचा सोहळा जगाच्या कौतुकाचा, अभ्यासाचा आणि कुतूहलाचा विषय बनलेला आहे. त्यामुळे वारी अनुभवण्यासाठी दरवर्षी परदेशी पाहुणे येत असतात. गेल्या काही वर्षांत डॉक्टर्स, इंजिनिअर्स, आय.टी. क्षेत्रातील मंडळी, कॉर्पोरेट क्षेत्रातले आणि सरकारी अधिकारी, तसेच उच्चशिक्षितांचा वारीतील सहभाग वाढतो आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनाचा उत्तम वस्तुपाठ म्हणून वारीकडे पाहायला हवे. अगदी शिस्तीने पन्नास माणसे एकत्र निघाली तरी गोंधळ होतो. मग ही हजारो माणसे एवढ्या शिस्तीत कसा काय प्रवास करतात? ‘विठ्ठल’ नावाचे ध्येय कसे गाठतात? यासाठी वारीतले व्यवस्थापन जाणकारांनी अभ्यासले पाहिजे. वारीतल्या यशस्वी व्यवस्थापनाचे गमक खालील सूत्रात सापडते.

स्वयंस्फूर्त सहभाग

कोणतेही निमंत्रण न देता, एसएमएस न करता, मेल न पाठवता, मिस् कॉल न देता, व्हॉटस्ॲपवर चॅट न करता लाखो वारकरी एकाच वेळी, एकाच ठिकाणी जमा होतात. आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर हा प्रवास अतिशय शिस्तबद्ध रीतीने करतात. हा त्यांचा सहभाग स्वयंस्फूर्त असतो. त्यामुळे उत्साहात ते ध्येय गाठण्यासाठी वाटचाल करीत असतात.

अचूक नियोजन

दिंडीचा एक कार्यक्रम निश्चित केलेला असतो. पालखी निघण्यापूर्वी जेव्हा माउलींच्या पादुकांची पूजा केली जाते, तेव्हा पालखी निघण्याची वेळ झाली आहे हे समजण्यासाठी पाच-दहा मिनिटांच्या अंतराने तीन वेळा कर्णा होतो. पहिला कर्णा झाला की वारकरी निघण्याच्या तयारीला लागतात. सामानाची आवराआवर होते. दुसरा कर्णा होतो तेव्हा सर्व जण पालखी सोहळ्यात सहभागी होतात. तिसरा कर्णा झाला की, पालखी निघते. काही अंतर चालले की विसावा घेतला जातो. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाटचाल सुरू होते. दुपारच्या विश्रांतीसाठी पालखी थांबते, तेव्हा तिथेच भोजनाची व्यवस्था केलेली असते. भोजनानंतर विश्रांती घेऊन वारी चालून पुन्हा विसाव्यासाठी थांबते आणि सूर्यास्ताच्या सुमाराला मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचते. हे नियोजन इतके अचूक असते की व्यवस्थापनशास्त्राच्या जाणकारांनी तोंडात बोट घालावे.

स्वयंशिस्त

एरवी सार्वजनिक आणि नागरी जीवनात अभावानेच दिसणारी स्वयंशिस्त वारीत आपला वेगळा ठसा उमटवून जाते. नियोजनातल्या क्रमाची घडी कुठेही विस्कटताना दिसत नाही. शे-पाचशे किंवा हजार लोकांची व्यवस्था करणे तुलनेने सोपे असते, पण जिथे लक्षावधी लोक सहभागी झालेले असतात तिथेच व्यवस्थापनाचा खरा कस लागतो, पण स्वयंशिस्तीमुळे नियोजन कोलमडत नाही.

समूहभावना

वारी हे एकात्म आणि समूहभावनेचे उत्तम उदाहरण आहे. वर्षभर आपण ‘मी’ म्हणून जगत असतो. वारीत सहभागी होताना ‘मी’ विसरावा लागतो. ‘मी’चे ‘आम्ही’त रूपांतर करून वारी माणसांमध्ये समूहभावना निर्माण करते. माणसाला व्यापक आणि प्रसरणशील बनवते. मानव ही जात आणि मानवता हा धर्म हा विचार घेऊन एकात्मभावनेने वारकरी वारीत सहभागी झालेले असतात. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, सुशिक्षित-अशिक्षित असा कोणताही भेद वारीत नसतो.

ध्येयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा

वारी हे अलौकिक भक्तिनाट्य आहे. चैतन्यस्वरूप परब्रह्म पांडुरंग हे त्यांचे ध्येय आहे. वारकरी तहानभूक हरपून, प्रसंगी गैरसोयींवर मात करीत, संकटांचा सामना करीत वाटचाल करीत असतात. केवळ ‘ध्येय’ केंद्रस्थानी ठेवून इतर गोष्टी गौण मानून ध्येयाप्रती वाटचाल कशी करायची हे वारकऱ्यांकडून शिकायला हवे.

समर्पण

इतर कार्यक्षेत्रात अभावानेच आढळणारी समर्पणवृत्ती वारीत आढळते. वारकरी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या तर पार पाडतच असतात, पण त्याखेरीज आयत्या वेळी अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्याही बिनबोभाट पार पाडत असतात. कार्याप्रती समर्पण कसे असावे हे वारीतून अवश्य शिकावे.

सुसंवाद आणि सहकार्य

‘पांडुरंग’ हे ध्येय गाठण्यासाठी वारीत सहभागी झालेली माणसे अहंकार आणि स्वाभिमान विसरून वाटचाल करीत असतात. एकमेकांना ‘माउली’ म्हणून साद घालत असतात. त्यांच्यात सुसंवाद असतो. सहकार्याची भावना असते. त्यातून हा जगन्नाथाचा रथ पुढे जात असतो.

परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाण्याची मानसिकता

एका बंदिस्त इमारतीतल्या ए.सी. कार्यालयाच्या खुर्चीत बसून उत्तम व्यवस्थापक म्हणून नाव मिळवणं वेगळं, कारण तो परिघ मर्यादित असतो. माणसं आणि समस्या मर्यादित असतात. त्या तात्काळ सोडवण्याची सक्षम यंत्रणा उपलब्ध असते. वारीत रोज नवे गाव, नवीन परिस्थिती आणि मुख्य म्हणजे येणाऱ्या समस्यांचे प्रकार आणि आकारही वेगळे. या साऱ्यावर मात करीत वारी सुरूच राहते. वाटेत एखादा अपघात होतो, दुर्घटना घडते, पण मागचे मागे सोडून पुढची वाटचाल सुरूच राहते. परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्याची वृत्ती वारीतून शिकली पाहिजे. उपलब्ध साधन-सामग्रीचा सुयोग्य वापर करून गरजा भागवणे हे आदर्श व्यवस्थापनाचे सूत्र मानले जाते. ते वारीत प्रत्ययाला येते.

आनंद आणि समाधान

नफा, मोठे पद, लठ्ठ पगार, इन्क्रीमेंट, प्रमोशन या गोष्टी मिळूनही माणसे आनंदी नसतात. समाधानी असणं ही तर खूप दूरची गोष्ट आहे. ‘जॉब सॅटिसफॅक्शन’च्या चर्चा करीत अशी माणसे अस्वस्थ होत असतात. वारीत लाभ कोणताही नसतो. तरीही आनंद आणि समाधान वारकऱ्याना मिळत असते. निरपेक्ष वृत्तीने कसे काम करावे याचा तो वस्तुपाठ असतो. कामाशी पूर्णत: एकरूप झाल्यानंतर आनंद आणि समाधान मिळते याचा तो अनुभव असतो.

वारी हा पाहण्याचा किंवा ऐकण्याचा विषय नाही. अनुभूतीच्या पातळीवर वारीचे जे दर्शन घडते, ते माणसांना जीवनाचे व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन करते. ‘ध्येय हेच पंढरपूर’ आणि ‘प्रयत्नांची पराकाष्ठा’ हीच वारी समजून वाटचाल केली तर ‘यशाचा पांडुरंग’ भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच ‘होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ।’ असं संतांनी म्हटलं आहे. वारीतले हे आदर्श व्यवस्थापन पाहिल्यानंतर मुंबईच्या डबेवाल्यांप्रमाणे वारीचाही ‘सिक्स सिग्मा’साठी विचार व्हायला काय हरकत आहे? असे वाटते.

- प्रा. मिलिंद जोशी (लेखक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत.)

Excellent Management : Lessons from the Wari

When the monsoon arrives in June-July, the anticipation for the Palkhi (pilgrim palanquin processions) begins. Carrying 'dindya' (pilgrim groups) and 'pataka' (holy banners), chanting the names of Sant Dnyaneshwar and Sant Tukaram, and the beloved deity Vitthal, the Warkaris (pilgrim devotees) set off towards Pandharpur. This extraordinary Wari pilgrimage in Maharashtra has become a subject of global admiration, study, and curiosity. Consequently, foreign visitors come every year to experience the Wari. In recent years, there's been an increase in participation from doctors, engineers, IT professionals, corporate executives, government officials, and highly educated individuals.

The Wari should be viewed as an excellent case study in superb management. Even if fifty people travel together with discipline, there can be chaos. So how do these thousands of people travel with such discipline? How do they achieve their goal, 'Vitthal'? Management experts should study the Wari's management. The secret to the Wari's successful management lies in the following principles:

Spontaneous Participation

Without any invitations, SMS, emails, missed calls, or WhatsApp chats, millions of Warkaris gather at the same time, in the same place. They travel from Alandi to Pandharpur and Dehu to Pandharpur in an extremely disciplined manner. Their participation is spontaneous, allowing them to march towards their goal with enthusiasm.

Precise Planning

Each Dindi (pilgrim group) has a fixed schedule. Before the Palkhi departs, when the holy footwear of Mauli (Sant Dnyaneshwar) is worshipped, a horn (karna) sounds three times at intervals of five to ten minutes, signaling the departure time. The first horn prompts Warkaris to prepare to leave; they pack their belongings. The second horn signifies that everyone should join the Palkhi procession. With the third horn, the Palkhi begins its journey. After walking some distance, they take a short rest. After a half-hour break, the journey resumes. When the Palkhi stops for the afternoon rest, food arrangements are made right there. After lunch and rest, the Wari continues, stops for another break, and reaches its overnight halt around sunset. This planning is so precise that it would astonish management experts.

Self-Discipline

The self-discipline rarely seen in public and civic life leaves a distinct mark in the Wari. The flow of the planned schedule never seems to falter. Managing a hundred, five hundred, or even a thousand people is relatively easy, but where millions participate, that's where true management is tested. However, due to self-discipline, the planning never collapses.

Group Spirit

The Wari is an excellent example of unity and group spirit. Throughout the year, we live as 'I'. Participating in the Wari requires forgetting the 'I'. By transforming 'I' into 'we', the Wari fosters a collective spirit among people. It makes individuals broad-minded and expansive. Warkaris participate in the Wari with a sense of unity, holding the belief that humanity is one caste and compassion is the religion. There is no distinction of rich-poor, young-old, educated-uneducated in the Wari.

Utmost Effort for the Goal

The Wari is an extraordinary devotional spectacle. The vibrant supreme being, Pandurang, is their goal. Warkaris travel forgetting hunger and thirst, often overcoming inconveniences and confronting challenges. One should learn from the Warkaris how to keep the 'goal' central, considering other things secondary, and move towards it with unwavering focus.

Dedication

The dedication rarely found in other fields of work is evident in the Wari. Warkaris not only fulfill their assigned responsibilities but also unhesitatingly undertake duties that unexpectedly fall upon them. One must surely learn about dedication to work from the Wari.

Harmony and Cooperation

To reach the goal of 'Pandurang', people participating in the Wari shed their ego and pride as they travel. They address each other as 'Mauli' (mother-like figure, a term of respect and affection). There is harmony among them, and a spirit of cooperation. It is through this that the chariot of Jagannath (the immense procession) moves forward.

Mental Fortitude to Face Situations

Earning a name as an excellent manager while sitting in an air-conditioned office chair in a confined building is different, because that scope is limited. People and problems are limited, and effective systems are available to solve them immediately. In the Wari, there's a new village, a new situation every day, and most importantly, the types and sizes of problems encountered are also different. The Wari continues despite overcoming all these challenges. An accident or mishap might occur on the way, but leaving the past behind, the journey continues. One should learn from the Wari the attitude of bravely facing circumstances. Making optimal use of available resources to meet needs is considered a principle of ideal management, and it is truly experienced in the Wari.

Joy and Contentment

Even after achieving profits, high positions, hefty salaries, increments, and promotions, people are not happy. Being content is an even more distant goal. Such people become restless discussing 'job satisfaction'. In the Wari, there are no personal gains. Yet, Warkaris experience joy and contentment. It is a perfect example of how to work with a selfless attitude. It is the experience that true joy and satisfaction come from completely immersing oneself in work.

The Wari is not merely something to watch or hear. The experience of the Wari, at the level of personal realization, guides people on how to manage their lives. If one travels considering 'Pandharpur as the only goal' and 'utmost effort' as the Wari itself, then the 'Pandurang of success' will surely be attained. That's why the saints said, "Yes, yes, Warkari! Look, look, Pandhari!" After witnessing this ideal management in the Wari, one might wonder, why shouldn't the Wari, like Mumbai's Dabbawalas, be considered for 'Six Sigma' analysis?

- Prof. Milind Joshi (The author is the President of Akhil Bharatiya Marathi Sahitya Mahamandal.)

Recent Posts

See All
चातुर्मास....परंपरेचा सुरेख भक्तीमय संगम | Chaturmas: A beautiful and devotional confluence of tradition

आपला भारत देश कृषीप्रधान आणि सुजलाम सुफलाम आहे. विविधतेने नटलेला, संत-महंतांची ही भूमी भक्तीमय गाथा सांगणारी, अखंड प्रेमाची, अभूतपूर्व क्रांतीची आणि थोर विचारांची आहे. आपल्या पूर्वजांकडून पिढ्यानपिढ्य

 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page