top of page

वारी : भेदाला भेदणारा समाजसंस्कार | Wari: A Societal Sacrament that Pierces All Division

महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृतीचे वर्णन करताना पंढरीची वारी कधीच कुणालाही वगळता येणार नाही. ती मराठी माणसाच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. ज्याने कधीही वारी केली नाही अगदी त्याचेही. वारीने दिलेले ज्ञान आणि शिकवण आपल्या सर्वांच्याच जीवनात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अनुभवास येते.  मराठी माणसाच्या आयुष्याला तिचा परिसस्पर्श कधी ना कधीतरी होतोच. 

भक्तियोगात लीन झालेल्या या कर्मयोग्यांनी, कित्येक शतके परकीय आक्रमणांना न जुमानता वारीची ही अनमोल परंपरा जतन केली. या मंथनातून मिळालेले ज्ञानाचे अमृत तितकीच वर्षे आपल्या संतांनी आणि कीर्तनकारांनी आम्हा सर्वांना पाजले. स्वराज्यस्थापना, स्वराज्यरक्षण, भारताचा स्वातंत्र्यलढा, समाजसुधारणा आणि लोकजागरणामध्ये संतांनी दिलेले हेच ज्ञान महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहिले. हेच ज्ञान मार्ग शोधत मंदिरातील भजन, कीर्तन, पाठ्यपुस्तकं, कविता, अभंग, भक्तिगीतं, नाट्यगीतं, ललित लेख आणि अगदी चित्रपटगीतांद्वारे कुठल्या ना कुठल्या मार्गातून आजही आपल्यापर्यंत पोहोचते. अशा लेखातील एखादा परिच्छेद किंवा गाण्याच्या ओळी अचानक एखाद्या क्षणी मनाला स्पर्श करून जातात आणि अनुभूतीची कळी उमलते. अंतर्मनात दिव्य संस्काराचे बीज पेरले जाते. हेच बीज कुठल्या ना कुठल्या प्रसंगात मार्गदर्शक आणि बिकट परिस्थितीत तारक ठरते. अशी अनुभूती घेणारे लाखो लोक आहेत आणि म्हणूनच वारी हा एक सर्वोच्च समाजसंस्कार आहे.

वारी मार्ग म्हणजे केवळ पंढरपूरकडे जाणारे मार्ग नव्हेत, तर ते भक्तिरसाने पावन झालेले ज्ञानमार्ग आहेत. या मार्गांवरून चालताना अभंगांचे सूर, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठलाच्या नामाचा घोष वातावरणात एक पवित्र ऊर्जा भरतो. थकवा जाणवत नाही, ऊन-पावसाची पर्वा नसते, कारण मनामध्ये केवळ विठ्ठलभेटीची आस असते. प्रत्येक पाऊल विठ्ठलाच्या दिशेने टाकताना, वारकऱ्याचे मन शांत आणि प्रसन्न होते. वारी म्हणजे आत्म्याच्या उन्नतीचे, भक्तीच्या परमोच्चतेचे आणि समतेच्या आदर्शाचे मूर्तिमंत दर्शन आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांसारख्या महान संतांच्या विचारांनी प्रेरित होऊन विठ्ठलभक्त भेद विसरून जेव्हा फक्त 'वारकरी' म्हणून एकत्र येतात तेव्हा

'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेदभ्रम अमंगळ।।’

हे संत तुकारामांचे वचन वारीत अक्षरशः अनुभवास येते.

भारतात ज्ञानार्जन करण्याआधी गुरूला शीर अर्पण करण्याची परंपरा आहे अर्थात आपला अहंकार गुरूच्या पायी ठेऊन मग ज्ञानार्जन करायचे, साधना करायची कारण अहंकार हा ज्ञानमार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. भक्तीमार्ग याच अहंकारास भेदण्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे. वारीमध्ये वारकरी जेव्हा एकमेकांच्या पाया पडतात तेव्हा अज्ञानातून जन्मलेल्या भेदाचे साखळदंड आपोआप गळून पडतात. जात-पात, जेष्ठ-लहान, श्रेष्ठ-कनिष्ठ सगळे द्वंद्व नष्ट होतात. मग अहंकार कसा राहील? कारण तो असायला भेद टिकावा लागतो. वारकरी मनाचा हा व्यायाम दरवर्षी करतो म्हणून त्याने ग्रहण केलेले ज्ञान स्थिर राहते. ते त्याच्या कृतीत उतरते. संसारात राहूनही विरक्तीचा भाव त्याच्यात जागतो आणि जिवंतपणीच मुक्तीचा, परमानंदाचा अनुभव तो घेत राहतो.

शेकडो वर्षांपूर्वी, आमच्या संतांनी या भेदाभेदाला समूळ नष्ट करण्यासाठी वारीचा मार्ग दाखवला आहे, भवसागराशी एकरूप होण्याची वाट सुगम केली आहे. स्वतःला 'प्रगत' म्हणवून घेणाऱ्या कित्येक देशांमध्ये तर आजही वर्णभेद, गरीब-श्रीमंत इत्यादींची मानसिक आणि वैचारिक दरी दिसून येते परंतु आमचा विठूच जर काळासावळा आणि सर्वसामान्य जीवन जगणारा आहे, तर आमच्या मनात हे भेद टिकतीलच कसे? आणि कधी मनात आलेच, तर त्यांना मुळापासून उपटून काढायला आमच्या संस्कृतीचे हे वैद्य शतकानुशतके वाऱ्या करून आम्हाला एकोप्याची आठवण करून देतच आहेत. चुकलेल्या वाटांवर आमच्या संतांचे साहित्य दीपस्तंभासारखे आम्हाला मार्गदर्शन करतच आहे. म्हणूनच, या भारतवर्षाला कधीही बाहेरील समाजसुधारकांची गरज भासली नाही.

पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांची सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांना याच भक्तांमध्ये पांडुरंग दिसतो. त्यांची नखे काढणे, हातापायांची व डोक्याची मालिश करणे, त्यांच्या जेवणाची आणि निवासाची सोय करणे, अशा अनेक सेवा हे सेवेकरी वारकऱ्यांना कोणत्याही दुजाभावाविना पुरवतात. खरंतर, आजकाल मोठ्या कंपन्यांमध्ये 'विविधता आणि एकता' (डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन) यावर महागड्या वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्याऐवजी, आपल्या महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांना एकदा तरी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा किमान तिचे मनापासून सखोल अध्ययन करण्यासाठी प्रोत्साहित करावे. त्यांना संतसाहित्य वाचायला सांगावे, जेणेकरून त्यांच्यात एकोप्यासह निरंतर सेवाभावदेखील जागृत होईल आणि आज जवळपास सर्व कंपन्यांना भेडसावणारी कर्मचारी टिकवून ठेवण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे, वारी केवळ जीवनमूल्येच नव्हे, तर प्रभावी व्यवस्थापनही शिकवते, जो एक अतिरिक्त लाभ आहे.

वरवर वारी म्हणजे फक्त टाळ मृदंगाच्या गजरात,  विठ्ठलवेड्या भक्तांचा पंढरपूरच्या मंदिरातील मूर्तीच्या दर्शनासाठी पायी जाणारा समूह दिसत असला तरी या वारीचा जनात दूरवर आणि मनात खोलवर सतत होत असलेला अदृश्य प्रभाव पदोपदी जाणवणारा आहे. त्यासाठी फक्त आत्मभावाने या समाजसंस्काराकडे बघितले गेले पाहिजे. विठुची मूर्ती पहायला निघालेल्या या वारीमध्ये, वारी न करणाऱ्यांच्या आतला विठोबा सुदधा जागृत करण्याचे सामर्थ्य आहे आणि अशी जागृती अनुभवल्यावर प्रत्यक्ष वारी अनुभवायची ओढ आपोआपच लागते आणि प्रत्यक्ष अनुभवानंतर...










- ज्योती घनश्याम 

chaprakonline@gmail.com

Wari: A Societal Sacrament that Pierces All Division

In describing the history and culture of Maharashtra, the Pandharpur Wari is an element none can ever omit. It is woven into the inseparable fabric of the Marathi soul—even of those who have never walked its path. The wisdom and teachings imparted by the Wari touch every life, directly or indirectly. At some point or another, its alchemical touch transforms the Maharashtrian existence.

These yogis of action (Karma Yogis), immersed in the path of devotion (Bhakti Yoga), have preserved this priceless tradition for centuries, unbowed by foreign invasions. For just as long, our Saints and Kirtankars have nourished us with the nectar of wisdom obtained from this spiritual churning. This very wisdom stood as the bedrock of Maharashtra during the founding and defence of Swarajya, India's struggle for freedom, social reform, and popular awakening. This wisdom continues to find its way to us, flowing through the hymns in temples, the narrations of Kirtan, the words in textbooks, poems, abhangas, devotional songs, theatrical music, lyrical essays, and even the verses of cinema. A line from an article, a verse from a song, may suddenly touch the heart, and the bud of epiphany blossoms. A divine seed of sacrament is sown in the inner self. In some circumstances, this seed becomes a guide; in a dire predicament, a saviour. There are millions who have had such an epiphany, and for this reason, the Wari is a supreme societal sacrament.

The routes of the Wari are not mere roads to Pandharpur; they are hallowed avenues of wisdom, sanctified by the spirit of devotion. As one walks these paths, the melodies of abhangas, the rhythmic cadence of cymbals (taal) and drums (mridanga), and the resounding chant of Vitthala’s name infuse the atmosphere with a sacred energy. Fatigue is forgotten, the sun and the rain are of no concern, for the mind holds but one singular aspiration: the vision of Vitthala. With every step taken towards Him, the Varkari’s mind becomes tranquil and serene. The Wari is the living embodiment of the soul’s ascent, the zenith of devotion, and the ideal of equality made manifest. Inspired by the teachings of great saints like Dnyaneshwar, Namdev, Eknath, and Tukaram, the devotees of Vitthala forget all their differences and unite simply as ‘Varkaris’. It is here that the words of Sant Tukaram are witnessed in their truest form: "The world is suffused with the Divine; the dharma of the devotee is to hold the illusion of division as profane."

In India, there is a tradition of surrendering one's head to the Guru before receiving knowledge; that is, one must lay down one's ego at the Guru's feet, for the ego is the greatest impediment on the path of wisdom. The path of devotion (Bhakti) is the mightiest weapon to pierce this very ego. In the Wari, when Varkaris bow and touch one another's feet, the fetters of division, born of ignorance, spontaneously fall away. Caste and creed, elder and younger, superior and inferior—all dualities are effaced. How then can the ego remain? For the ego to exist, division must endure. The Varkari performs this spiritual exercise annually, and thus the wisdom he receives remains steadfast. It descends from his mind into his deeds. A sense of detachment blossoms within him even while he lives within the world, and he experiences liberation (mukti) and supreme bliss (paramananda) in this very life.

Centuries ago, our Saints illuminated this path of the Wari to annihilate these divisions at their very root, to make simple the way across the turbulent ocean of worldly existence (bhavasagara). In many a self-proclaimed 'developed' nation, the mental and ideological chasms of race, wealth, and status remain starkly visible. But when our Vitthala himself is of dark complexion and a commoner, how can such divisions endure in our minds? And should they ever arise, the physicians of our culture have for centuries been making their annual pilgrimage, reminding us of our intrinsic unity. In our moments of misdirection, the literature of our saints stands as a lighthouse, guiding us back to shore. Hence, this land of Bharat has never needed social reformers from without.

The sevakaris—those who serve the pilgrims journeying to see Panduranga—see God himself in the very devotees they serve. Tending to their nails, massaging their hands, feet, and heads, arranging for their food and lodging—these and countless other acts of service are rendered without a trace of discrimination. In truth, instead of organising costly lectures by celebrity speakers on 'Diversity and Inclusion,' modern corporations would do well to encourage their key personnel to participate in the Wari at least once, or at the very least, to study it with a sincere and profound heart. They should be told to read the literature of the saints, so that a spirit of unity and perpetual service may be awakened within them. This would help alleviate the problem of employee retention that plagues nearly all companies today. Notably, the Wari teaches not just life values, but also effective management—a serendipitous bonus.

While on the surface, the Wari may seem merely a procession of devotees, mad with love for Vitthala, walking to the rhythm of cymbals and drums for a glimpse of an idol in a temple, its invisible influence—stretching far into society and deep into the soul—is felt at every step. One need only gaze upon this societal sacrament with the eye of the soul (atmabhava). The Wari, undertaken to see the idol of Vitthala, holds the power to awaken the inner Vitthala even in those who do not walk. And once that awakening is felt, an inexorable yearning to experience the Wari firsthand is born.

- Jyoti Ghanshyam 

chaprakonline@gmail.com

Recent Posts

See All
चातुर्मास....परंपरेचा सुरेख भक्तीमय संगम | Chaturmas: A beautiful and devotional confluence of tradition

आपला भारत देश कृषीप्रधान आणि सुजलाम सुफलाम आहे. विविधतेने नटलेला, संत-महंतांची ही भूमी भक्तीमय गाथा सांगणारी, अखंड प्रेमाची, अभूतपूर्व क्रांतीची आणि थोर विचारांची आहे. आपल्या पूर्वजांकडून पिढ्यानपिढ्य

 
 
 
वारीतून शिकूया उत्कृष्ट व्यवस्थापन | Excellent Management : Lessons from the Wari

पावसाळा सुरू झाला की जून-जुलैमध्ये पालख्यांचे वेध लागतात. दिंड्या, पताका घेऊन मुखाने ज्ञानोबा-तुकोबांचा आणि सर्व संतांना प्रिय असणाऱ्या विठ्ठलाचा गजर करीत वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. महाराष्ट्रातल

 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page