top of page
पुस्तक परिचय


श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र : प्रस्तावना - उमेश सणस
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आजही तरुण पिढीला कमालीचे आकर्षण आहे. येणारी प्रत्येक नवी पिढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमात पडते, शिवचरित्राचा अभ्यास करते व ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणण्यात धन्यता मानते. असा परिपाठ गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात सुरू आहे. ‘मानवतेला उपकृत करणारा महामानव’ अशी जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणसं घडवतो, हा इतिहासाच्या अभ्यासकांसाठी नेहमीचा प्रश्न आहे; मात्र छत्रपती शिवाजी महाराज या महापुरु
May 7, 20255 min read


गतकाळातील पुस्तकांविषयी बरंच काही...पुस्तकानुभव आस्वाद
पुस्तकं ही प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असतात. काही पुस्तकं माणसांच्या जीवनावर परिणाम करतात. काही पुस्तकं माणसाला जगण्यासाठी शक्ती,प्रेरणा देत असतात. मात्र काळ जसा पुढे सरकत जात राहतो, त्याप्रमाणे काही पुस्तकं पुढच्या पिढीसाठी टिकून राहतात. काही मात्र काळाच्या ओघात मागे पडतात. पुस्तके मागे पडतात म्हणजे ती संपतात असं होत नाही. ती पुस्तके एका पिढीने दुसऱ्या पिढीच्या हातात देण्याची आवश्यकता असते, पण शंभर वर्षापूर्वीची इतिहासातील काही चांगली पुस्तके नवाचकांना अनुभवता यावीत, त्या
May 5, 20256 min read
आकाशझेप - चित्रदर्शी शौर्यगाथा | Aakashzep - A Vivid Saga of Valor
एखाद्या अद्भूतरम्य कादंबरीपेक्षाही थराराक, रोमांचकारी आणि प्रेरणादायी असे कुणाचे आत्मकथन असू शकते का? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी म्हणून एका पुस्तकाचे नाव सांगता येईल. ज्यांच्या घरातच देशप्रेम आणि शौर्याच्या संस्कारांची परंपरा आहे अशा एअरमार्शल भूषण गोखले आणि सौ. मेघना गोखले यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे ‘आकाशझेप’. देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असताना खर्याअर्थी आकाशक्षेप घेणार्या एका साहसी सेनापतीची ही शौर्यगाथा आहे. पती आणि पत्नीने एकत्र येऊन आपले समृद्ध जीवनानुभव अत्
Apr 21, 20258 min read
पुस्तकानुभव : प्रसन्न वाचनानुभुव!
सातत्याने नवनवीन विषयांच्या आणि तसे लेखन करणाऱ्या लेखकांच्या शोधात असणारे, नावीन्यपूर्ण विषय देऊन लेखकांना लिहिते करणारे, प्रयोगशील व धडाडीचे प्रकाशक अशी ख्याती असलेल्या घनश्याम पाटील यांनी चपराक प्रकाशनातर्फे नुकताच एक समीक्षासंग्रह प्रकाशित केला आहे... पुस्तकानुभव! साहित्य क्षेत्रात चमचमणारा आणि संशोधन वृत्तीचा एक हिरा घनश्याम पाटील ह्यांनी हेरला तो म्हणजे प्रा. दिलीप फडके! दोन तपस्वी, दोन अभ्यासक आणि त्यांचा चमू यांच्या अथक परिश्रमाने सजलेला समीक्षा संग्रह म्हणजे साहित्याच
Mar 30, 20257 min read
चक्र व इतर नाटके - प्रस्तावना
डॉ. सोमनाथ मुटकुळे हे संगमनेर येथील एक नाट्यलेखक आहेत. वैद्यकीय व्यवसायात यशस्वी कारकिर्द गाजवणार्या डॉक्टर मुटकुळे यांची वैविध्यपूर्ण विषयावरील दहा नाटके तीन पुस्तकांच्या रूपाने एकाचवेळी प्रकाशित होत आहेत, ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. 5 जानेवारी 2025 रोजी संगमनेर येथे या पुस्तकांचे लोकार्पण आणि दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्याचे समारंभपूर्वक प्रकाशन होत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर नाट्यलेखन परंपरेतील ही विलक्षण आणि ऐतिहा
Jan 12, 20253 min read


प्रांजळ अनुभव कथन : कथा एका प्रत्यावर्तनाची! - नागेश शेवाळकर
धर्मांतर आणि पुन्हा स्वधर्मात परतणे ही बाब तशी पुरातन आहे. वेळोवेळी अशा घटना घडल्याची इतिहासात नोंद आहे. परधर्मात गेलेल्यांना पुन्हा स्वधर्मात आणण्यासाठी प्रयत्न करणार्या व्यक्ती आणि संस्थांचेही कार्य अविरत सुरू आहे.जिहाद, लव जिहाद आणि धर्मांतर या घटनांविषयी वेळोवेळी चर्चा होत असतात. त्याचा कितपत उपयोग होतो हा वेगळा विषय होऊ शकतो परंतु जेव्हा एखादी व्यक्ती स्वधर्म-परधर्म असा प्रवास करुन पुन्हा स्वधर्मात परतते आणि तो प्रवास बारीकसारीक तपशीलांसह विस्तृत, सप्रमाण पुस्तक स्वरुपा
Nov 7, 20248 min read
‘चपराक'चा ज्ञानमयी गणेशोत्सव - घनश्याम पाटील
सस्नेह जय गणेश! आळंदी-पंढरपूरची भक्तिमय वातावरणात अविरतपणे सुरु असलेली वारी, गणेशोत्सव आणि दिवाळी अंक या तीन परंपरा मराठी माणसाच्या अस्मितेच्या, गौरवाच्या आहेत. ‘चपराक' मासिकाने वारीच्या निमित्ताने सातत्याने दर्जेदार साहित्य दिलेले आहेच. दिवाळी अंकाच्या परंपरेत तर ‘चपराक'चा अंक अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. यावर्षीपासून दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पांचा विशेषांक प्रकाशित करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. खरेतर गणपती म्हणजे विद्येची देवता! प्रत्येक कामाची मंगलमय सुरुवात म्हणजे श्री
Sep 14, 20242 min read


संदीप वाकचौरे यांचा शिक्षण विचार - घनश्याम पाटील
प्रस्तावना - शिक्षणाचे प्रश्नोपनिषदसंदीप वाकचौरे यांचा शिक्षण विचार आपल्याला डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, मेंदूही आहे. या सगळ्याचा सगळे जण वापर करतातच असे मात्र मुळीच नाही. महात्मा गांधींची तीन माकडं आपणास माहीत आहेतच. वाईट बोलू नका, वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका असं त्यांनी सांगितलं. त्याचा सोयीस्कर अर्थ अनेकांनी घेतला. परिणामी समाजात कितीही, कसलेही अराजक माजले तरी असे महाभाग वाईट वृत्तीच्या विरूद्ध काही बोलत नाहीत, सामान्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याचा प्रयत्न करत नाहीत, दु
Sep 5, 20244 min read
शब्दांजली - डॉ. लक्ष्मणराव देगलूरकर
डॉ. लक्ष्मणराव देगलूरकर हे सामाजिक भान असलेले वैद्यकीय अधिकारी आणि विचारवंत होते. त्यांचे ‘ओड आणि ओढ’ हे आत्मचरित्र या महिन्यात 31 तारखेला ‘चपराक प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत आहे. त्यांचे नुकतेच म्हणजे 25/06/2024रोजी निधन झाले. त्यांना ‘चपराक’तर्फे श्रद्धांजली म्हणून हा विशेष विभाग देत आहोत. हे पुस्तक आपण ‘चपराक’च्या वेबसाईटवरून घरपोहोच मागवू शकाल. शिवाय 31 ऑगस्टनंतर याचे ऑडिओ बुकही आपण ‘चपराक’च्या युट्यूब चॅनेलवरून ऐकू शकाल.- संपादक डॉक्टरसाहेब माणसांच्या सततच्या मागण्य
Aug 2, 20249 min read
कलियुगातील भावी पिढीची पाळंमुळं मजबूत करणारं पुस्तक - इंजि. रिठे राजेश चंद्रकांत
प्रति,श्री.नानासाहेब खर्डे सर,सेवानिवृत्त उप कार्यकारी अभियंता,जलसंपदा विभाग , महाराष्ट्र शासन. आ. महोदय, नमस्कार. आपले पहिलेवहिले *पाळंमुळं* हे पुस्तक वाचून नुकतेच पूर्ण झाले.आपली सुकन्या सौ.धनश्री विजय थोरात यांनी म्हटल्याप्रमाणे ; ही कथा वाचकांची कहानी आहे , हे वाचकांना जाणवेल , ही गोष्ट किंबहुना भाकित माझ्या बाबतीत १०० % खरे झाले आहे.पहिल्या पानापासून ते शेवटच्या पान क्रमांक ३१२ पर्यंत मी तुमच्या मागेच जीवनप्रवास करत असल्याचे जाणवले.त्यामुळे मी ही माझ्या जीवनाचा नुकतेच ५
Jul 1, 20243 min read
सुभावभजन : मन होई प्रसन्न!
हिंदू धर्मात ज्याप्रमाणे ईश्वराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्याचप्रमाणे ईश्वरीय अवतार समजले जाणारे संत यांचेही स्थान अपरंपार असे आहे. जो सत्याचे आचरण करतो, जो ज्ञानवंत आहे, तो संत असा एक विचार भक्तांच्या मनी वसलेला असतो. संत रुपात अवतार घेऊन समाज सुधारणेचे अतुलनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तिंना गुरू, साधू, तपस्वी, ऋषी, महात्मा, स्वामी, मुनी, योगी, तपस्वीनी, योगिनी इत्यादी नावांनी ओळखल्या जाते. पुरातन काळापासून अशा व्यक्तिंनी केवळ धर्मप्रसाराचे काम केले आहे असे नाही तर वेळोवे
Mar 23, 20245 min read
शोध शिक्षणाचा : प्रस्तावना - डॉ. ह. ना. जगताप, सोलापूर
भारतात जे काही शिक्षणतज्ज्ञ होऊन गेले त्यामध्ये जे. कृष्णमूर्ती यांचे नाव एक विचारवंत शिक्षणतज्ज्ञ म्हणून घ्यावे लागते. त्यांचे शिक्षणविषयक विचार समजून घेताना त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान देखील समजून घ्यावे लागते. शिक्षणक्षेत्रात गेली 40-50 वर्षे काम करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की, आमच्यापैकी फार थोड्या लोकांना जे. कृष्णमूर्ती समजले आहेत. त्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या तत्त्वज्ञानासंबंधीचे ग्रंथ मराठीतून फारसे उपलब्ध नाहीत. तसेच त्यांचे तत्त्वज्ञान हे केवळ सहज वा
Mar 11, 20243 min read
कष्ट-त्याग-समर्पणाची गाथा- 'अग्निदिव्य'
एका स्त्रीचा स्वतःच्या अस्तित्वासाठी व स्वतःच्या मुलाला हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी दिलेला हा लढा, एक संघर्ष म्हणजेच हे पुस्तक. हे पुस्तक वाचताना एका स्त्रीचा लढा केवळ 'अग्नितांडव' न राहता तो 'अग्निदिव्य' कसा बनत गेला, याची प्रचिती हेते. कारण पुस्तकाच्या या नावातच या पुस्तकाचा सर्व गाभा दडलेला आहे. एका मुलाची आंतरिक वेदना, एका महिलेचा आभाळाएवढा संघर्ष व समाजमन असे तीन टप्पे युवालेखक आशिष निनगुरकर यांच्या 'अग्निदिव्य' या चरित्रात्मक पुस्तकात आहेत. एका महिलेने व तिच्या मुलान
Mar 11, 20243 min read


समाजभूषण : ह. भ. प शांताराम महाराज निम्हण
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ गायक ह. भ. प शांताराम महाराज निम्हण यांचा आज (दि. 11) पुण्यात अमृतमहोत्सवी सोहळा संपन्न होतोय. त्यानिमित्त ‘चपराक प्रकाशन’ने ‘सुभावभजन’ हा गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचे संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांचा हा विशेष लेख.नमो सुभावभजन भाजना ।भवेभकुंभ भजना । विश्वोद्भव भुवना । श्रीगुरुराया ॥ अशा मधुर आणि अर्थबोधी शब्दात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ईशस्तवन केले आहे. यातील ‘सुभावभजन’ म्हणजे विशुद्ध भावाने केलेले भजन! विशुद्ध भाव निर्माण
Feb 11, 20243 min read
हळवा कोपरा - प्रस्तावना
संगमेश्वर तालुक्यातील लोवलेस्थित वाचकप्रिय लेखक जे. डी. पराडकर यांचे ‘चपराक प्रकाशन’कडून प्रसिद्ध होत असलेले हे सातवे पुस्तक. जेडींच्या लेखणीतून कोकणचा समृद्ध, अस्पर्श असा निसर्ग जसा दिसतो तशीच वरपांगी साधी भोळी पण अंतरी नाना कळा असणारी माणसेही दिसतात. कोकणातील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू यांची स्पंदनेही लेखकाच्या संवेदनशील मनाला जाणवतात. ‘हळवा कोपरा’ हे पुस्तकही याला अपवाद नाही. मुळात हे साप्ताहिक स्तंभलेखन असल्याने इथे विषयांची विविधता पुरेपूर आहे.‘पैजेचा विडा’ हा पहिला
Jan 27, 20246 min read
कस्तुरीगंध - प्रस्तावना
प्रा. बी. एन. चौधरी हे खान्देशातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. शैक्षणिक कारकिर्दीबरोबरच त्यांनी साहित्याच्या विविध प्रांतात यशस्वी मुसाफिरी केली आहे. ‘माणूस माणूस जोडत जावा’ या सूत्रानुसार त्यांचं जगणं आणि वागणं आहे. त्यामुळेच सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी ते सहजपणे एकरूप होतात. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातून उमटतं. प्रस्तुतच्या ‘कस्तुरीगंध’ संग्रहातील कथा म्हणजे मानवी भावभावनांवर आधारित सुसंस्कृत जगण्याची शिदोरीच आहे. मातृप्रेमात अखंड डुंबलेल्या या अवलियाच्या शब्दांचा
Jan 27, 20245 min read


विनोबांची शिक्षणछाया - प्रस्तावना
युगपुरुष स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं होतं, ‘‘आपल्या देशाला बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही!’’हे असे क्षत्रिय निर्माण झालेच तर ते काय करतील?तर मानवधर्माची पताका सर्वत्र डौलात फडकत ठेवतील!मग धर्म म्हणजे काय? त्याचेही उत्तर स्वामीजींनीच खूप मार्मिक शब्दांत दिले आहे. ते म्हणतात, ‘‘धर्म हा मतमतांतरात, धर्मग्रंथात वा शब्दात साठलेला नाही. धर्म म्हणजे आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार!’’स्वतःची ओळख पटणं, स्वतःच्या
Jan 26, 20244 min read
शिक्षणाविषयी चर्चा घडविणारे पुस्तक..परिवर्तानाची वाट
शिक्षणाविषयी बरंच काही बोलले जाते..शिक्षणाचा पारंपारिक विचार सातत्याने समाजमनावर गारूड करून राहीलेला आहे. अशावेळी शिक्षणाचा खरा विचार समाजमनात रूजविण्याची गरज सातत्याने व्यक्त केली जाते.शेवटी शिक्षण ही एक प्रक्रिया आहे.त्या प्रक्रियेच्या माध्यमातून परिवर्तनाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असतात.अशावेळी शिक्षणाचा विचार समाजासमोर मांडण्याचा संदीप वाकचौरे यांच्या परिवर्तनाची वाट या पुस्तकातून करण्यात आला आहे.चपराक प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होणा-या शिक्षण मालेतील हे पुस्तकही वाचक
Jan 14, 20245 min read
प्राजक्ताचे सडे : पत्ररूप प्रस्तावना - न. म. जोशी
कोकणचे लेखक श्री. जे. डी. पराडकर यांचे प्राजक्ताचे सडे हे सलग सहावे पुस्तक चपराक तर्फे प्रकाशित झाले आहे. अल्पावधीतच साहित्य षटकार ठोकून त्यांनी साहित्य क्षेत्रात मोठा विक्रम केला आहे. या सहाव्या पुस्तकाला सुप्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांची सर्वांगसुंदर प्रस्तावना लाभली आहे. कोकणच्या मातीचा गंध सर्वत्र पसरविणारी ही प्रस्तावना खास चपराकच्या वाचकांसाठी. नक्की वाचा. प्रतिक्रिया कळवा आणि हे पुस्तक घरपोच मागविण्यास विसरू नका. त्यासाठी संपर्क - 7057292092 प
Dec 31, 20234 min read
अग्निदिव्य - एका आईची संघर्षगाथा
माझे सन्मित्र, अत्यंत गुणी आणि अनेकानेक विषयावर जबाबदारीनं लिहिणारे लेखक आशिष निनगुरकर यांचा दूरध्वनी आला. ‘पुण्यात आलोय, भेटायचं आहे’ असं त्यांनी सांगितलं. रंगपंचमीचा दिवस असल्यानं मी नेमका कार्यालयीन काम संपवून त्या दिवशी घरी लवकर गेलो होतो. मग त्यांना घरीच बोलावलं. आमच्या घरी त्यांच्यासोबत रमामावशी आणि अभिषेकदादा आले. सुरुवातीला आशिषजींचे स्नेही म्हणून ती त्यांच्याकडं पाहत होतो. त्यानंतर रमामावशी बोलू लागल्या आणि डोळ्यात अश्रुंचा पूर येऊ लागला. एक तर त्यांची बोलण्याची मराठ
Dec 31, 20234 min read
bottom of page
.jpg)