top of page
घनश्याम पाटील लेखमाला


महाराष्ट्र साहित्य परिषद: एक ऐतिहासिक परिवर्तन
साहित्य परिषद आणि तिचा महत्त्व ज्यांना गल्लीतही कोणी विचारत नाही, मात्र ते दिल्लीचे स्वप्न बघतात, असे अनेक उमेदवार आपण बघतो. जो साधा नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्यही नाही, तो थेट पंतप्रधानपदाच्या उमेदवाराविरूद्ध निवडणुकीत अर्ज भरतो. प्रत्येक लोकसभेत, विधानसभेत ते बड्या उमेदवाराविरुद्ध अर्ज भरून निवडणूक लढवतात. दरवेळी तोंडावर आपटतात. स्वतःचे हसे करून घेतात. तरीही त्यांची प्रसिद्धीची नशा, धुंदी उतरत नाही. एव्हाना वाचकांच्या डोळ्यासमोर असे काही चेहरे आले असतीलच. हे सगळं मांडण्य
Jan 234 min read


जबाबदार पत्रकारिता मृत्युशय्येवर - घनश्याम पाटील
अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यातील एका वृत्तवाहिनीवरील चर्चा सध्या समाजमाध्यमांवर दाखवली जात आहे. यात ते एकमेकांचा ‘उद्धार’ करताना दिसतात. ‘अंगावरचे काढून कंबरेला गुंडाळणे’ अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे; पण इथे यांच्या कंबरेवरही काही दिसत नसल्याने ते पूर्णपणे नागवे झालेले दिसतात. हे ‘नागवेपण’ फक्त मिटकरी-हाके यांच्यासारख्या नेत्यांचेच नाही, तर अशा बाष्फळ चर्चा दाखवणाऱ्या प्रसारमाध्यमांचेही आहे. गेल्या काही काळात मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या कोणत्या स्तराला जाऊन वा
Jun 7, 20255 min read
आकाशझेप - चित्रदर्शी शौर्यगाथा | Aakashzep - A Vivid Saga of Valor
एखाद्या अद्भूतरम्य कादंबरीपेक्षाही थराराक, रोमांचकारी आणि प्रेरणादायी असे कुणाचे आत्मकथन असू शकते का? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी म्हणून एका पुस्तकाचे नाव सांगता येईल. ज्यांच्या घरातच देशप्रेम आणि शौर्याच्या संस्कारांची परंपरा आहे अशा एअरमार्शल भूषण गोखले आणि सौ. मेघना गोखले यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे ‘ आकाशझेप ’. देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असताना खर्याअर्थी आकाशक्षेप घेणार्या एका साहसी सेनापतीची ही शौर्यगाथा आहे. पती आणि पत्नीने एकत्र येऊन आपले समृद्ध जीवनानुभव अ
Apr 21, 20258 min read
संतांचे कवी संत महिपती | The Poet of Saints, Sant Mahipati
हा काळ आहे मुस्लिम राजवटीतला ! नगर जिल्ह्यातील ताहाराबाद ही त्यांचीच जहागीर होती. एकेदिवशी या जहागीरदारांनी त्यांच्या हिशोबनीसाला तातडीनं बोलावणं धाडलं. त्यावेळी हिशोबनीस देवपूजा करत होते. त्यांनी निरोप घेऊन आलेल्या सैनिकाला सांगितलं, "स्नानसंध्या आटोपून येतो..." सैनिक म्हणाले, "असेल तसे या, असा निरोप आहे." हिशोबनीसांनी नाईलाजाने देवपूजा अर्धवट सोडली. जहागीरदाराकडे गेले. त्यांचा हिशोब पूर्ण करून दिला आणि त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. ते म्हणाले, "यापुढे तुमची नोकरी नको! चाकरी
Apr 19, 20258 min read


डॉ. आंबेडकरांचे सखे सोबती
मुंबईला परतताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या एका मित्रासह सातारा रोड स्टेशनला जावे लागले. त्यावेळी त्यांचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. एके ठिकाणी त्यांनी टांगा थांबवला आणि खाली उतरून ते एका मैदानात शिरले. अचानक ते व्याकूळ होऊन रडू लागले. मित्राला काय झाले काहीच कळेना. थोडा दुःखभार कमी झाल्यावर ते म्हणाले, ‘‘इथे माझ्या आईच्या अस्थी आहेत. तिने आम्हा सर्व भावंडांसाठी खूप खस्ता खाल्ल्या. या पलीकडच्या पडक्या वाड्यात आम्ही राहत होतो. काही दिवस आमची आई व भावंडे खडी फोडून मोलम
Apr 14, 20254 min read


महामंडळ ‘तरूण’ झाले!
डॉ. ग. ना. जोगळेकर हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे कार्याध्यक्ष होते. त्यावेळी एका साहित्यिक मासिकात एक वाचकपत्र प्रकाशित झाले. साहित्य परिषदेची कंपूशाही नव्या लेखकासाठी कशी घातक आहे, उमलत्या अंकुराचे पंख तिथे कसे छाटले जातात, ही संस्था काहीच काम कसे करत नाही अशा आशयाची त्याची मांडणी होती. मुळातच कर्तव्यकठोर लेखक, भाषाशास्त्रज्ञ आणि समीक्षक असलेल्या जोगळेकरांनी ते वाचले आणि ज्याने पत्र लिहिले त्याला बोलवून घेतले. जोगळेकर म्हणाले, ‘‘फुलाफळांनी पिकलेल्या झाडालाच सगळे
Apr 13, 20254 min read
डॉटच्या बातमीने वाचवला जीव
सध्याच्या स्पर्धेच्या जगात सेकंदासेकंदाच्या बातम्या ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून पुढे येतात. त्यामुळे प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता पणास लागलेली असते. माध्यमांची ताकत काय असते? तर एका चार ओळीच्या ‘डॉट’च्या बातमीवरून एखाद्याचा जीव वाचवण्याची क्षमता त्यांच्यात असते. राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, क्रिया-प्रतिक्रिया यालाच ‘बातमीदारी’ समजण्याचा काळ आलेला असताना स्वर्गीय गोपाळराव बुधकर यांच्यासारख्या व्रतस्थ पत्रकाराने घडवलेली एक किमया आज मुद्दाम सांगावीशी वाटते. ही घटना आहे 1970-
Feb 9, 20253 min read
यामागे कुणाचा हात?
गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास पाहता महाराष्ट्रात कोणतीही घडामोड घडली की लोक म्हणायचे, यामागे शरद पवारांचा हात आहे! काहीही, म्हणजे अगदी काहीही झाले तरी त्याचे खापर पवारांवर फोडण्याचा शिरस्ता सुरूच होता. याबाबत खुद्द शरद पवारच एकदा म्हणाले होते की, ‘उद्या लोकानी म्हटलं की, किल्लारीचा भूकंपही माझ्यामुळेच झाला तरी मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही.’ राज ठाकरे यांनीही शरद पवार यांच्या ‘अदृश्य हाता’विषयी जाहीर टिपण्णी केली होती. सध्या मात्र ही परिस्थिती बदललीय. राजकारणातली, समाजकारणातल
Jan 13, 20254 min read


संवादाची 'अमृत'साधना
‘‘...आणि आम्हाला खातरी आहे की, आपण यापुढे ज्यांची मुलाखत घ्याल, तेव्हा हा महाराष्ट्र म्हणेल, या माणसाची सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली म्हणजे हा माणूस निश्चितच मोठा आहे’’ असे गौरवोद्गार बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्याविषयी काढले ते सुधीर गाडगीळ आज (दि. 25) पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. ‘मुलाखतींचा बादशहा’ अशी ओळख सार्थ ठरविणार्या सुधीर गाडगीळ यांच्याविषयीचा हा लेख. सूत्रसंचालन हा पूर्णवेळचा व्यवसाय होऊ शकतो, हे सिद्ध करणारे भारतातील पहिले व्यावसायिक मुलाखतकार म्हण
Nov 25, 20243 min read


कल्पिताहून अद्भुत
महाराष्ट्र विधानसभेचे निकाल आले आणि आपण चक्रव्यूह भेदून बाहेर आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महायुतीच्या नेत्यांसाठी, समर्थकांसाठी ही खरी दिवाळी आहे. आघाडीचे नेते या धक्क्यातून सावरायला किती काळ घेतील हे सांगता येणार नाही. राज ठाकरे यांच्या भाषेत केवळ एका शब्दात सांगायचे तर त्यांच्यासाठी हे केवळ ‘अनाकलनीय’ आहे. लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर महायुतीने जोरदार आत्मपरीक्षण केले होते. त्या चिंतनातून त्यांनी त्यांच्या काही चुका सुधारल्या आणि त्याचे कल्पिताहून अद्भूत
Nov 25, 20244 min read
जगद्व्यापक संघाची शताब्दी !
जगातील अत्यंत प्रभावी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख काय? असा प्रश्न केला तर त्याचे एका शब्दात सांगता येण्यासारखे उत्तर म्हणजे ‘देशभक्ती!’ मुघलांच्या अनन्वित छळाने त्रस्त झालेले भारतीय पुढे ब्रिटिशांच्या जुलूमशाहीने हतबल झाले होते. या सगळ्या परिस्थितीचे चिंतन करून ‘हिंदू संघटन’ हे सूत्र घेत डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. या विजयादशमीला या अभूतपूर्व घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. शतकी वर्षात यशस्वी पाऊल ठेवलेल्या संघा
Nov 10, 20246 min read


एके दिवशी अत्रे जातिल दुसरे दिवशी पित्रे रडतिल - घनश्याम पाटील
या महिन्यात सर्वाधिक चर्चेचा विषय होता तो म्हणजे प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर! त्यांनी अनेक खोटी कागदपत्रे तयार करून नोकरी मिळवल्याचे पुढे आले आहे. यात अपंगत्वाचे प्रमाणपत्र, ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर करणे, प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती असताना कार्यालयाचा ताबा, तेथील सुविधा, ऑडीसारख्या महागड्या गाड्या, आई-वडिलांच्या घटस्फोटाचा बनाव असे गंभीर विषय आहेत. त्यांच्या आईने तर हातात शस्त्र घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचे आणि जमिनी ताब्यात घेतल्याचेही काही व्हिडिओ प्रसारित झाले. केंद
Jul 30, 20244 min read
bottom of page
.jpg)




