top of page

आम्ही श्रद्धाळू / अंधश्रद्धाळू?

  • Apr 5
  • 3 min read

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर आतापर्यंत बरेच वाचनात आले आहे. बऱ्याच जणांनी पोटतिडकीने लिहिले आहे.बऱ्याच जणांनी घशाला कोरड पडेपर्यंत व्याख्यानं दिली आहेत,विविध वाहिन्यांवर मालिकेतून , चित्रपटातून व्याख्यानातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे.पण त्याचा किती परिणाम झाला आहे, हा चिंतेचा विषय ठरू शकतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धेने पूर्वीपासून आणि आत्ता पण चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. व्यक्तिगत कुणाच्या भावनांना स्पर्श न करता व आस्तिक नास्तिक वादाच्या भानगडीत न पडता, तटस्थपणे यावर विचार व्हायला हवाय. 

श्राध्येबाबत फारसे बोलण्याचे करण नाही. कुणाची कशावर श्रद्धा असावी हा व्यक्तिपरत्वे वेगळा विषय आहे. कुणी डोळसपणे देवाला, संताला, गुरूला श्रद्धास्थानी ठेऊन आनंदी जीवन जगत असतील. कोणत्याही गरजेपोटी ती श्रद्धा नसेल किंवा काही अपेक्षा त्या श्रद्धेच्या आड लपलेल्या नसतील. कुटुंबाला ,समाज मनाला क्लेशदायक ठरणारी ती श्रद्धा नसेल.

पण श्रद्धेला जर अंधश्रध्येची जोड मिळाली तर अमर्याद गरजा, अपेक्षा, स्वार्थ वाढून माणसाचं माणूसपण हरवल्याशिवाय रहात नाही.

माणूस अंधश्रद्धाळू का बनतो? वैचारिक दुर्बलता, काल्पनिक संकटांची भिती,असुरक्षतेची भावना झटपट सुखी होण्यासाठी धडपड, सूडबुद्धी, बदला, पैशाची अमर्याद हाव, सद्विचार आणि सत्संगाचा आभाव इत्यादी कारणामुळे माणूस अंधश्रध्येकडे वळतो. समाजमध्ये अशा विकलांग विचारांच्या माणसाची काही कमतरता नाही, हे काही धूर्त माणसं ओळखतात आणि इथेच भोंदूगिरीला सुरूवात होते. इथेच ढोंगी बाबा अवतरतात. विनासायास, कष्ट न करता, ते स्त्री पुरुषांची शारीरिक, भावनिक आणि आर्थिक लय लूट करतात. फसव्या मंत्र तंत्रांचा, देवी देवतांचा आधार घेत ते दरोडे टाकतात. भविष्यातील रंगीत स्वप्नं दाखवित हे बाबा दिवसा ढवळ्या माणसांना दुर्बल बनवतात. कोणत्यातरी कृतीने,कोणत्यातरी बनावट, फसव्या वस्तुने, औषधाने स्वप्नं साकार होतात हे स्वीकारलेच कसे जाते. माणूस आपली बुद्धी, वैचारिक क्षमता गुंडाळूनच बुवाबाजीकडे वळतोय असा निष्कर्ष काढणे अतिशयोक्तीचे ठरू नये. एकीकडे शास्त्र आणि तंत्र विद्येने माणूस झपाट्याने विकासाकडे धावतोय. AI ची विलक्षण प्रगती. विविध समाज माध्यमातून मिळणाऱ्या विचारांचा स्फोट पाहता माणूस एवढा विचारशून्य आणि मानसिक दुर्बल कसा होऊ शकतो,हे एक न सुटणारं कोडं आहे. बरं अंधश्रद्धेने अडाणी, दुर्बल घटकातील स्त्री पुरुष, दुर्गम भागातील माणसं पछाडले जातात असे नाही, तर उच्चभ्रू, सदन, सुशिक्षित माणसं पण त्या वाटेने जातात ही अतिशय दुर्दैवी व लज्जास्पद बाब आहे. अशी माणसं अमर्याद गरजा, सत्तेचा हाव, स्वार्थ,  मोठेपणा यांनी झपाटलेले दिसतात आणि त्यांच्यातील विद्येने झालेले संस्कार पूर्ण कोमेजून गेलेले दिसतात. एकविसाव्या प्रगत शतकात अंधश्रद्येला एवढं खतपाणी घातलं जातंय हे पाहून जाणकार माणसं सुन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत.बनतो? वैचारिक दुर्बलता, काल्पनिक संकटांची भिती,असुरक्षतेची भावना झटपट सुखी होण्यासाठी धडपड, सूडबुद्धी, बदला, पैशाची अमर्याद हाव, सद्विचार आणि सत्संगाचा आभाव इत्यादी कारणामुळे माणूस अंधश्रध्येकडे वळतो. समाजमध्ये अशा विकलांग विचारांच्या माणसाची काही कमतरता नाही, हे काही धूर्त माणसं ओळखतात आणि इथेच भोंदूगिरीला सुरूवात होते. इथेच ढोंगी बाबा अवतरतात. विनासायास, कष्ट न करता, ते स्त्री पुरुषांची शारीरिक, भावनिक आणि आर्थिक लय लूट करतात. फसव्या मंत्र तंत्रांचा, देवी देवतांचा आधार घेत ते दरोडे टाकतात. भविष्यातील रंगीत स्वप्नं दाखवित हे बाबा दिवसा ढवळ्या माणसांना दुर्बल बनवतात. कोणत्यातरी कृतीने,कोणत्यातरी बनावट, फसव्या वस्तुने, औषधाने स्वप्नं साकार होतात हे स्वीकारलेच कसे जाते. माणूस आपली बुद्धी, वैचारिक क्षमता गुंडाळूनच बुवाबाजीकडे वळतोय असा निष्कर्ष काढणे अतिशयोक्तीचे ठरू नये. एकीकडे शास्त्र आणि तंत्र विद्येने माणूस झपाट्याने विकासाकडे धावतोय. AI ची विलक्षण प्रगती. विविध समाज माध्यमातून मिळणाऱ्या विचारांचा स्फोट पाहता माणूस एवढा विचारशून्य आणि मानसिक दुर्बल कसा होऊ शकतो,हे एक न सुटणारं कोडं आहे. बरं अंधश्रद्धेने अडाणी, दुर्बल घटकातील स्त्री पुरुष, दुर्गम भागातील माणसं पछाडले जातात असे नाही, तर उच्चभ्रू, सदन, सुशिक्षित माणसं पण त्या वाटेने जातात ही अतिशय दुर्दैवी व लज्जास्पद बाब आहे. अशी माणसं अमर्याद गरजा, सत्तेचा हाव, स्वार्थ,  मोठेपणा यांनी झपाटलेले दिसतात आणि त्यांच्यातील विद्येने झालेले संस्कार पूर्ण कोमेजून गेलेले दिसतात. एकविसाव्या प्रगत शतकात अंधश्रद्येला एवढं खतपाणी घातलं जातंय हे पाहून जाणकार माणसं सुन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत.


सयाजी शिंदे

+91 9423468347

प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक ६ ते १२ एप्रिल

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page