top of page

अनुभवाचे अंतरंग कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा दिमाखात

  • Apr 27
  • 2 min read

संगमनेर, (प्रतिनिधी) ः के. बी. दादा देशमुख सभागृहात ‌‘चपराक प्रकाशन‌’ प्रकाशित आणि लेखक अशोक शेटे लिखित ‌‘अनुभवाचे अंतरंग‌’ या लघुकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याला संगमनेर आणि परिसरातील साहित्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी लेखक समाज बदलू शकतो ही भूमिका मांडत लेखणीच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त केला.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांनी ग्रामीण साहित्यावर भाष्य करताना सांगितले की, ग्रामीण भागातून नवनवीन लेखक तयार झाले पाहिजेत, तरच खऱ्या अर्थाने ग्रामीण साहित्य अधिक सक्षमपणे पुढे येईल.


नव्या लेखकांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही देताना ‌‘चपराक प्रकाशन‌’चे घनश्याम पाटील म्हणाले की, आजचे नवीन लेखक अतिशय दर्जेदार लिहित असून त्यांना आमच्या प्रकाशनातर्फे नेहमीच योग्य न्याय दिला जातो.


कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले गुरुजी यांनी पुस्तकाचा सविस्तर आढावा घेतला आणि लेखक अशोक शेटे यांच्या प्रामाणिक स्वभावाचे व लेखनशैलीचे कौतुक केले. प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. कैलास दौंड यांनी शेटे यांच्या लेखणीचा गौरव करताना सांगितले की, लेखकाने आता इथून पुढे न थांबता अधिकाधिक सातत्याने लिहित राहिले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय गोर्डे यांनी केले. आर. पी. राहणे यांनी  उपस्थितांचे स्वागत केले. पुस्तकाचे सुंदर मुखपृष्ठ बनविल्याबद्दल अनुष्का वाकचौरे यांचा यावेळेस गौरव करण्यात आला.


सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे समाजात निरपेक्ष भावनेने शैक्षणिक व सामाजिक कामात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. तसेच स्व. संदीप डुबे यांच्या स्मरणार्थ जे. एन. व्ही. पेमगिरीसह विविध शाळांना वैद्यकीय संचाचे वाटप करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय संदीप वाकचौरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ घुले व अक्षय खतोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शशिकांत आव्हाड यांनी मानले.


सोहळ्यासाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, साहित्यिक व इतिहास संशोधक संतोष खेडलेकर, माजी पंचायत समिती उपसभापती मधुकर गुंजाळ, राजहंस दूध संघाचे संचालक रमेश गुंजाळ, माजी पंचायत समिती सदस्य रावसाहेब डुबे, अशोक हजारे, शाम्प्रोचे संचालक शांताराम डुबे, युवावार्ताचे संपादक किसनभाऊ हासे, नायकचे संपादक गोरक्षनाथ मदने, माजी प्राचार्य कैलास शेटे, विश्वनाथ शेटे, संताजी देशमुख, राहता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास भागवत, म. रा. प्रा. शि. संघ अहिल्यानगर शाखेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, शिक्षक बँकेचे संचालक भाऊराव राहिंज, माजी चेअरमन किसन खेमनर, संतोष दळे, विकास मंडळाचे माजी अध्यक्ष भाऊ ढोकरे, म. रा. प्रा. शि. संघ संगमनेर शाखा महिला अध्यक्ष सुनीता घुले, मुख्याध्यापक प्रकाश गोडसे, दादाभाऊ चौधरी, शा. व्य. स. अध्यक्ष रायभान गुंजाळ तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक २७ एप्रिल ते ३ मे २०२६


अनुभवाचे अंतरंग | Anubhavache Antarang
₹150.00₹112.50
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page