top of page

चपराक आणि लाडोबांच्या पुस्तकांचा प्रकाशक संघाकडून गौरव

  • Jun 9
  • 1 min read

मुखपृष्ठासाठी ज्योती घनश्याम यांना बालविभागाचे प्रथम पारितोषिक


पुणे - अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती स्पर्धेत ‌‘चपराक‌’च्या ऑनलाईन संपादक आणि चित्रकार ज्योती घनश्याम यांना मुखपृष्ठासाठी बालविभागाचे प्रथम पारितोषिक देण्यात आले. मलेका शेख-सैय्यद लिखित ‌‘हत्तीदादा‌’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. याच स्पर्धेत ‌‘चपराक‌’ने प्रकाशित केलेल्या सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे लिखित ‌‘उजेडाच्या वाटा‌’ या पुस्तकासाठी ललितेतर गद्य विभागात दुसरा क्रमांक तर ‌‘लाडोबा प्रकाशन‌’च्या भगवान अंजनीकर लिखित ‌‘चरित्र स्मरण‌’ या पुस्तकासही कुमार साहित्यातील उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक डॉ. राजा दीक्षित होते. यावेळी ज्येष्ठ लेखक डॉ. न. म. जोशी, प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्ष दत्तात्रेय पाष्टे, प्रमुख कार्यवाह पराग लोणकर, कवी प्रदीप निफाडकर आदी उपस्थित होते.


याच कार्यक्रमात अनिल टांकसाळे यांना जीवनगौरव पुरस्कार, डॉ. न. म. जोशी यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी आणि विजय सरदेशपांडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

“समाजात अंधश्रद्धा आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. अशा अस्वस्थ वेळी समाजाला दिशा देण्याचे आणि प्रबोधन करण्याचे काम केवळ साहित्य आणि संस्कृतीच करू शकते. विचार हेच आपले शस्त्र आणि आपला धर्म मानून आपण सर्वांनी या विधायक विचारांची पेरणी करावी,” असे मत यावेळी राजा दीक्षित यांनी व्यक्त केले. ‌‘चपराक‌’च्या उपसंपादक चंद्रलेखा बेलसरे, कार्यकारी संपादक प्रमोद येवले आणि ज्येष्ठ सदस्य अरूण कमळापूरकर यांनी चपराक आणि लाडोबाला मिळालेले हे पुरस्कार स्वीकारले.


प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक ८ ते १४ जून २९०२६




Recent Posts

See All
 ‌‘बोले तैसी चाले...‌’

‌‘बोले तैसा चाले‌’ हे हल्लीच्या राजकारणात खूपच दुर्मीळ झालं आहे. सध्याचे नेते अडखळत बोलतात आणि चालतातही अडखळतातच. हे सोडून द्या पण आपण दिलेल्या शब्दाला जागून तो पूर्ण करण्याची कर्तबगारी फार कमी नेते

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page