महापुरुष घडवणारा साहित्ययोगी | The Literary Sage Who Shapes Great Souls
- Apr 11
- 9 min read
Updated: 5 days ago
परमहंस योगानंदांचे अजेय आणि कालातीत वाङ्मय | The Invincible and Timeless Legacy of Paramhansa Yogananda
जगात जेवढी भौगोलिक आणि जैविक विविधता आहे तेवढीच किंबहुना त्याहून अधिक सामाजिक आणि सांस्कृतिक गुंतागुंत आहे. विविध धर्म, जाती, वर्ण, परंपरा आणि भाषांच्या सीमांमध्ये विभागलेल्या या मानवी विश्वात, सर्वांची आंतरिक तहान मात्र एकाच सत्याची आहे. आजच्या अत्यंत वेगाने धावणाऱ्या काळात, जिथे प्रत्येक क्षण कुणाच्या तरी शक्तिशाली महत्त्वाकांक्षेचा बळी ठरतो आहे; जिथे माणूस कधी चकचकीत भूलथापांना तर कधी गतानुगतिक अंधानुकरणाला बळी पडत आहे, तिथे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देणाऱ्या एका प्रगल्भ, तर्कशुद्ध साहित्याची आत्यंतिक गरज आहे. असे साहित्य, जे सर्व प्रगतिशील विचारधारांना सामावून घेईल आणि त्याचवेळी मानवी मनाच्या अथांग कोलाहलात एका अढळ शांतीचे आणि सक्षमतेचे बीज पेरेल. हे अचूक संतुलन ज्यांच्या शब्दांतून आणि साहित्यातून जगाला गवसले, ते जागतिक कीर्तीचे नाव म्हणजे - परमहंस योगानंद.

एका बाजूला एकविसाव्या शतकाची दिशा ठरवणारा तंत्रज्ञानाचा आधुनिक ऋषी अर्थात ॲपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज... दुसऱ्या बाजूला पाश्चात्य संगीताला वेड लावणारा द बीटल्सचा ख्यातनाम गिटारवादक जॉर्ज हॅरिसन... आणि तिसऱ्या बाजूला क्रिकेटच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पाडणारा, आक्रमकतेचा मेरूमणी असलेला आधुनिक सम्राट विराट कोहली! या तीन अत्यंत भिन्न दिशांना आणि भिन्न क्षेत्रांत सर्वोच्च शिखरावर असणाऱ्या महामेरूंच्या आयुष्यात कोणता समान धागा असू शकतो? संपत्ती? जागतिक कीर्ती? की अफाट यश?
स्टीव्ह जॉब्ज यांच्या अंतिम प्रवासात, त्यांच्या निरोप समारंभाला (मेमोरियल सर्व्हिस) उपस्थित असलेल्या जगभरातील दिग्गजांना एक छोटी पेटी भेट देण्यात आली. त्या पेटीत कोणतीही भौतिक संपत्ती नव्हती तर होता जॉब्ज यांच्या आयुष्यातील सर्वोच्च खजिना-वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून ते मृत्युपर्यंत दरवर्षी न चुकता वाचले गेलेले आणि त्यांच्या वैयक्तिक आयपॅडवर असणारे ते एकमेव पुस्तक.
दुसरीकडे, 1966 मध्ये पंडित रविशंकर यांच्याकडून जॉर्ज हॅरिसन यांना याच पुस्तकाची एक प्रत मिळाली आणि त्या एका क्षणाने पाश्चात्य संगीताचे रूपच पालटून टाकले. हॅरिसन या पुस्तकाने इतके भारावून गेले की ते भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक आवर्जून भेट देत असत. तर आजच्या काळात, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रचंड दबावाखाली मानसिक शांती आणि अविचल एकाग्रता मिळवण्यासाठी विराट कोहलीने याच पुस्तकाला आपल्या आयुष्यातील वळणबिंदू मानले. या तिन्ही दिग्गजांना एका सूत्रात बांधणारा तो अजोड ग्रंथ म्हणजे परमहंस योगानंदांचे 1946 साली प्रकाशित झालेले - ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी (योगी कथामृत)!

महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनीही योगानंदांच्या योगविज्ञानातील सत्याचा गौरव केला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक महात्मा गांधी यांनी योगानंदांकडून प्रत्यक्ष क्रियायोगाची दीक्षा घेतली होती. याशिवाय विख्यात वनस्पतिशास्त्रज्ञ ल्युथर बर्बँक आणि महान शिक्षणतज्ज्ञ रवींद्रनाथ टागोर यांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांनी योगानंदांच्या साहित्यातील वैश्विक प्रेमाचा आणि आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा आदरपूर्वक स्वीकार केला होता. योगानंदांच्या साहित्याचा प्रभाव ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यावर देखील पडला आणि मग या सर्वप्रिय नेत्याने विश्वाची मने कशी जिंकली हे सर्वज्ञात आहे. या थोर विभूतींच्या जीवनावर योगानंदांच्या तत्त्वज्ञानाचा असलेला प्रभाव हा त्यांच्या साहित्याच्या कालातीत श्रेष्ठतेचा जिवंत पुरावाच आहे.
स्वामी विवेकानंदांनंतर अमेरिकेत भारतीय ज्ञान व्यवस्था आणि योगाचा प्रचार करण्यासाठी आपल्या आयुष्याची प्रदीर्घ 35 वर्षे समर्पित करणारे परमहंस योगानंद हे खऱ्या अर्थाने पूर्व आणि पश्चिमेला जोडणारे सुवर्णसेतू होते. विशेषतः इंग्रजांच्या आगमनानंतर खुद्द भारतीयांमध्येच अध्यात्म आणि विज्ञान हे दोन परस्परविरोधी विषय असल्याचा जो मोठा गैरसमज पसरला होता, तो त्यांनी मुळासकट उपटून काढला. श्रद्धा आणि अंधश्रद्धा, शास्त्र आणि शस्त्र, कर्म आणि नियती यांविषयीचे अनेक संभ्रम दूर करत त्यांनी आध्यात्माला प्रयोगशाळेतील विज्ञानासारखे अचूक आणि तर्कशुद्ध बनवले.
स्वरूपं सुंदरं यस्य परिणामः शिवप्रदा:।
आशयं सत्यरूपस्य तत् साहित्यं विदुर्बुधाः ॥
स्वरूपं सुंदरं यस्य - ज्याचे स्वरूप (मांडणी, भाषा आणि शैली) सुंदर आहे.
परिणामः शिवप्रदा: - ज्याचा परिणाम शिवप्रद (कल्याणकारी/मंगलकारी) आहे.
आशयं सत्यरूपस्य - ज्याचा आशय किंवा गाभा सत्य आहे.
तत् साहित्यं विदुर्बुधाः - त्यालाच ज्ञानी खरे साहित्य समजतात.
या परिभाषेत परमहंस योगानंदांचे साहित्य पुरेपूर उतरते. ते वाचकाला ‘ऍक्टिव्हली काल्म अँड काल्मली ऍक्टिव्ह’ (कर्तव्यरत असतानाही अंतर्यामी निवांत आणि निवांत असतानाही कार्यप्रवण) राहायला शिकवते. मॅन्स इटर्नल क्वेस्ट (मराठी अनुवाद - मानवाचा चिरंतन शोध) आणि जर्नी टू सेल्फ रिअलायझेशन यासारखी पुस्तके आपल्याला आपल्या सर्वात जवळच्या सख्याचा, ईश्वराचा नव्याने शोध घ्यायला शिकवतात. दैनंदिन जीवन जगताना विज्ञान आणि आध्यात्मिक सत्याचा मेळ घालून शिस्तबद्ध साधनेद्वारे स्वतःमधील ईश्वरी अंश कसा अनुभवावा हे तत्त्वज्ञान ही पुस्तके बुद्धिला पटेल अशा भाषेत समजावून सांगतात.
योगानंदांचे साहित्य हे सर्वोच्च आत्मिक अवस्थेत लिहिले गेलेले तत्त्वज्ञान तर आहेच शिवाय ते उत्तम ललित वाङ्मयदेखील आहे. त्यांच्यात जितका एक उत्तम मार्गदर्शक दडलेला आहे, तितकाच एक अत्यंत हळवा आणि रसाळ कवीही दडलेला आहे. व्हिस्पर्स फ्रॉम इटर्निटी हे त्यांच्या कवितांचे पुस्तक त्यांच्यातील प्रगल्भ काव्यप्रतिभेची आणि ईश्वराविषयीच्या ओढीची साक्ष देते. ज्याला ईश्वर सर्वाधिक प्रिय आहे, असा हा योगी उमर खैय्यामच्या रुबायांचा अन्वयार्थ पाश्चात्य समीक्षकांपेक्षा कितीतरी अधिक संवेदनशीलतेने उलगडतो. ओमर खैय्याम यांच्या रुबायांवर भाष्य करताना, योगानंद त्या रचनांशी इतके एकरूप होतात की, जणू खुद्द खैय्यामच आपल्याला त्यांच्या रचनांचे गूढ आध्यात्मिक रहस्य सांगत आहेत, असा विलक्षण भास वाचकाला होतो. अत्यंत गुंतागुंतीचे मेटा-फिजिकल (अतिभौतिकशास्त्रीय) सिद्धांत ते सोप्या उदाहरणांतून आणि खिळवून ठेवणाऱ्या कथांमधून मांडतात.
योगानंदांच्या साहित्यात एक अफाट सामर्थ्य दडलेले आहे. त्यांचा कार्यकाळ पाहता त्यांनी दोन विश्वयुद्धे आणि त्यांचे परिणाम पाहिले आणि अनुभवले आहेत. त्यावेळी झालेल्या त्यांच्या उच्च चेतनेतील विचारमंथनातून जी साहित्यरत्ने जन्माला आली त्यात दोन राष्ट्रांमधील युद्धे थांबवण्याची वैचारिक ताकद तर आहेच शिवाय वाचकाला त्याच्या आयुष्यातील वैयक्तिक युद्धासाठी खंबीर बनवण्याचे सामर्थ्यदेखील आहे.
त्यांच्या द सेकंड कमिंग ऑफ क्राइस्ट या महाग्रंथात ते येशू ख्रिस्त आणि भारतीय तत्त्वज्ञान यांच्या शिकवणीतील अद्वैत अत्यंत तर्कशुद्धतेने आणि प्रेमाने दाखवून देतात. हा महायोगी इतर संस्कृतींतील जागृत आत्म्यांविषयी किंचितही द्वेष न बाळगता, त्यांना सन्मानाने योगी म्हणतो. जेव्हा जगातील राष्ट्रे हे समजून घेतील की सर्व धर्मांचा मूळ गाभा एकच आहे तेव्हा धर्माच्या किंवा वर्चस्वाच्या नावावर होणारी युद्धे आपोआप संपुष्टात येतील.
त्यांच्या श्री भगवद्गीता : गॉड टॉक्स विथ अर्जुन या अद्वितीय भाष्यामुळे कुरुक्षेत्राची लढाई ही केवळ एक ऐतिहासिक घटना न राहता, ती मानवी अंतर्मनात चालणारे दैवी आणि आसुरी प्रवृत्तींचे नित्य युद्ध बनते. मानवाचे पृथ्वीवरील अस्तित्व आणि त्याचे अंतिम ध्येय विज्ञानाच्या आधारे समजून घेण्यास हा ग्रंथ मदत करतो. परमहंस योगानंदांचे साहित्य हे आधुनिक सेल्फ-हेल्प विश्वाचा पाया आहे. आजच्या काळातील अनेक जगप्रसिद्ध पुस्तके ही त्यांच्याच विचारांची परिणती आहेत हे तुम्हाला त्यांचे साहित्य वाचल्यावर जाणवेलच. योगानंदांच्या लॉ ऑफ सक्सेस या पुस्तकात (मराठी अनुवाद - यशाची गुरुकिल्ली ) मांडलेला यशाचा नियम हा केवळ भौतिक प्रगतीचा मार्ग नसून तो मानवी इच्छाशक्ती, दैवी नियोजन आणि पुरुषार्थ यांचा एक अजोड संगम आहे. त्यांच्या मते, खरे यश हे केवळ नशिबावर अवलंबून नसून ते आपल्या अंतर्मनातील संकल्पशक्ती आणि एकाग्रतेवर अधिष्ठित असते. योगानंदांनी स्पष्ट केले की, जेव्हा माणूस आपल्या मर्यादित अहंला सोडून असीम ईश्वरी शक्तीशी स्वतःला जोडून घेतो, तेव्हा त्याच्या विचारांमध्ये एक चुंबकीय आकर्षण निर्माण होते, जे इष्ट ध्येयांना स्वतःकडे खेचून आणते. “विचार हाच कृतीचा जनक आहे,” हे अधोरेखित करताना ते सांगतात की, भीती आणि शंकांचा त्याग करून जर आपण अढळ श्रद्धेने प्रयत्न केले तर विश्वातील चैतन्यशक्ती आपल्याला साहाय्य करण्यास धावून येते.
जोपर्यंत या भूतलावर मानवाच्या मनात स्वतःला आणि वैश्विक सत्याला समजून घेण्याची भूक आहे, तोपर्यंत परमहंस योगानंदांचे हे वाङ्मय अजिंक्य, अजेय आणि कालातीत राहील. ते केवळ वाचून विसरून जाण्याचे शब्द नाहीत तर प्रत्यक्ष जगण्यात उतरवण्यासाठी लिहिलेले अनुभूतीचे अमृत आहे.
होलि सायन्स हा आत्मानुभवाचे विश्व उलगडून दाखवणारा महान ग्रंथ लिहिणारे परमहंस योगानंद यांचे गुरु श्री युक्तेश्वर गिरी यांनी योगानंदांना हंस बनून जगायला शिकविले. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगातून, आयुष्यातून, घटनांमधून आणि व्यक्तिकडून योग्य, उत्तम, सर्वोच्च आणि सर्वजनहिताय ते निवडायला शिकवले. श्री युक्तेश्वर गिरी यांची ही शिकवण योगानंदांच्या साहित्यात झिरपली आहे ती तशीच वाचणाऱ्याच्या अंतरंगात झिरपते. म्हणूनच या साहित्याने जगभर फक्त जेते नाही तर न्याय्य आणि संवेदनशील नेतृत्व तयार केले. ईश्वराला घाबरण्यापेक्षा आपला सर्वात जवळचा मित्र मानणाऱ्या या योग्याचे परमोच्च भक्ती, कर्मयोग, राजयोग आणि ज्ञानयोगाचा संगम असलेले हे साहित्य उच्च चेतनेत जगण्याची अभिलाषा असलेल्या सर्वांचे सारथ्य मैत्रभावाने करते. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने असे साहित्य वाचायलाच हवे.
- ज्योती घनश्याम
9901164468
प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक १३ ते १९ एप्रिल २०२६
The Literary Sage Who Shapes Great Souls : The Invincible and Timeless Legacy of Paramhansa Yogananda
The Common Thread of Greatness
On one side stands the modern mystic of technology, who defined the direction of the 21st century - Apple founder Steve Jobs. On the other hand, the legendary guitarist of The Beatles, who enchanted the West with his strings, George Harrison. And on the third, the modern titan of the cricket pitch, a personification of aggression and excellence - Virat Kohli.
What common thread could possibly bind these three maestros, hailing from entirely different worlds and reaching the pinnacle of their respective fields? Is it mere wealth? Global fame? Or staggering success?
The answer lies not in what they possessed, but in what they read.
A Sanctuary in a Restless Era
In a world as diverse geographically as it is complex socially and culturally—divided by borders of religion, caste, race, and language—the inner thirst of every soul remains the same: a thirst for Truth. In today’s breakneck era, where every moment is often sacrificed at the altar of raw ambition, and where humanity oscillates between glittering illusions and blind imitation, there is a dire need for a literature that is profound, logical, and self-realising.
We need a body of work that embraces progressive thought while planting the seeds of unshakeable peace amidst the cacophony of the human mind. The world found this perfect equilibrium in the words of a global spiritual icon—Paramhansa Yogananda.
The Book That Changed History
The influence of Yogananda’s masterpiece, Autobiography of a Yogi (1946), is nothing short of miraculous:
Steve Jobs: During his final journey, attendees at his memorial service were given a small brown box. It contained no material wealth, but Jobs' ultimate treasure: the only book he had on his iPad, which he had read every year since the age of nineteen.
George Harrison: In 1966, after receiving a copy from Pandit Ravi Shankar, Harrison’s perspective on life and music was transformed. He became so enamoured with the book that he kept stacks of it to gift to everyone he met.
Virat Kohli: In the modern era, to maintain an unwavering focus and mental peace under the crushing pressure of international sports, Kohli credits this book as a pivotal turning point in his life.
The reach of Yogananda’s philosophy extends far beyond these three. The titan of science, Albert Einstein, marvelled at the yoga science explained by him. The Mahatma, Gandhiji, took formal initiation into Kriya Yoga from him. Visionaries like botanist Luther Burbank, educationist Rabindranath Tagore, and former Indian President A.P.J. Abdul Kalam all found a reflection of universal love and self-realisation in his teachings.
Following in the footsteps of Swami Vivekananda, Paramhansa Yogananda dedicated 35 years of his life in America to disseminating Indian wisdom. He acted as a Golden Bridge between the East and the West. He dismantled the widespread misconception that spirituality and science are antithetical. By stripping away superstition and blending logic with faith, he turned spirituality into a science as precise as any laboratory experiment.
The ancients defined true literature through this Sanskrit lens:
Swarupam Sundaram Yasya, Parinamah Shivapradah| Ashayam Satyarupasya, Tat Sahityam Vidurbudhah ||
"That whose form is beautiful, whose result is auspicious (welfare-oriented), and whose core is the Truth - that alone is recognized as true literature by the wise."
Yogananda’s work fits this definition perfectly. It teaches the reader to be "actively calm and calmly active" - to remain tranquil in the heat of duty and dynamic in the heart of silence.
Yogananda’s writing is not merely a philosophical treatise; it is exquisite belle-lettres. Within him lived both a stern guide and a tender, lyrical poet. His book Whispers from Eternity bears witness to his profound poetic genius.
Interestingly, this Yogi decoded the Rubaiyat of Omar Khayyam with a spiritual sensitivity far deeper than most Western critics. When he comments on Khayyam, he merges so completely with the poet that the reader feels as though Khayyam himself is unveiling the mystical secrets of his verses. He had the rare gift of translating complex metaphysical theories into captivating stories and simple metaphors.
Having witnessed the horrors of two World Wars, Yogananda’s literary gems possess the power to stop conflicts between nations and arm individuals for their own internal battles.
In his monumental work, The Second Coming of Christ, he logically demonstrates the essential oneness (Advaita) between the teachings of Jesus and Indian philosophy. He looked upon the awakened souls of all cultures with equal reverence. He believed that when nations realize the core of all religions is the same, wars fought in the name of God or supremacy will naturally cease.
Similarly, his commentary God Talks with Arjuna: The Bhagavad Gita transforms the Battle of Kurukshetra from a historical event into the daily psychological battle between our divine and base instincts.
Paramhansa Yogananda’s literature is the bedrock of the modern "self-help" movement. In his book The Law of Success, he explains that true success is not a matter of luck but a confluence of human will, divine planning, and right action. He taught that when a man moves beyond his limited ego and tunes himself to the infinite Power, his thoughts gain a "magnetic" quality that attracts his goals. "Thought is the father of action," he remarked, urging us to banish fear and doubt to allow the cosmic energy to assist us.
As long as the human heart hungers for Truth and self-understanding, the literature of Paramhansa Yogananda will remain invincible and timeless. These are not words to be read and forgotten; they are the "Amrit" (nectar) of experience meant to be lived.
Trained by his Guru, Sri Yukteswar Giri, to live like a "Swan" (Hansa) - extracting only the purest essence from life - Yogananda’s writings continue to mentor those seeking a higher consciousness. This is literature that creates leaders who are not just conquerors, but sensitive and just human beings. It is a journey everyone should embark upon at least once in their lifetime.
By Jyoti Ghanshyam
9901164468
Published in weekly 'Saptahik Chaprak' 13th-19th April 2026
To order books by Paramahans Yogananda visit : https://yssofindia.org/ Or Pune Centre : Yogoda Satsanga Dhyan Kendra Preeti, Plot, 75, Mayur Colony Rd, opp. Jog School, Mayur Colony, Kothrud, Pune, Maharashtra 411038
.jpg)



खूप छान माहिती दिली आहे.
मांडणी अप्रतिम!