top of page

विसाकी ओकिनावा : साहसी मुलीची कथा | Visaki Okinawa: The Tale of an Adventurous Spirit

ज्योती घनश्याम हे नाव चित्रपट गीतांसाठी नावाजलेले आहे. चित्रपट गीतं हाही एक साहित्य प्रकारच! त्यामुळे ज्योती यांच्या हृदयात बरीच साहित्य बीजं अंकुरत होती. मराठी साहित्याच्या प्रांगणात किशोर कादंबरी घेऊन येणाऱ्या ज्योती यांची ही पहिली साहित्यकृती.

‌‘विसाकी ओकिनावा‌’ ही किशोर कादंबरी सात प्रकरणातून वाचकांपुढे येते. तारा ही या कादंबरीची नायिका! तिच्या वय वर्षे नऊ ते साधारणपणे एकवीस वर्षे वयापर्यंतची साहसी, धाडसी कथा लेखिकेने तन्मयतेने चितारली आहे. हे कथानक वाचताना एक दीर्घ काव्य आपण वाचत असल्याचा साक्षात्कार होतो. डॉ. गोपाळ हे ताराचे वडील! लेखिका त्यांचे वर्णन निसर्गाच्या महाग्रंथाचे एक ऋषी असे करतात. साहजिकच तारालाही भूगोल आणि जीवशास्त्राबद्दल आकर्षण निर्माण होते. ती निसर्गामध्ये रमते. लेखिका तिच्या या दोन विषयाच्या ज्ञानलालसेला एक चालती बोलती ज्ञानगंगा हे विशेषण देतात. लहानपणी वडिलांसोबत वनात जायला घाबरणारी तारा निसर्गाच्या सानिध्यात अशी रमते की, ती भीती कधी नष्ट होते हे तिलाही समजत नाही. लहान वयातच ती प्रकाश आणि विनोद या दोन काकांच्या सोबतीने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आयाळ घनदाट जंगलात प्रवेश करते. तिथे त्यांना संजीवन वेल शोधायची होती. ज्योती या वेलीचा उल्लेख आम्ही ज्या संजीवन वेलीच्या शोधात आहोत, ती आजवर केवळ कल्पनेच्या विश्वातील एक अप्सरा मानली गेली होती... असा करतात. त्यांची आयाळ मोहीम यशस्वी होताना त्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, त्यांचे इप्सित साध्य होताना काय घडले हे वाचताना अंगावर काटा येतो. महत्त्वाचे म्हणजे विसाकी ओकिनावा हा काय प्रकार आहे तो प्रत्यक्ष वाचताना मजा येते.

पुढील प्रवासात तारा इंग्लंडमधील सालफर्ड विद्यापीठातून पर्यावरण शास्त्राचा अभ्यास करून बारा वर्षानंतर भारतात परतते. रक्तवर्णी नदीचे गूढ या प्रकरणात चंद्रमणी जिल्ह्यातील उमा नदीच्या तीरावर वसलेल्या सदाहरित अरण्यातील नैसर्गिक संसाधनांचा शोध लावल्याचे कथानक वाचनीय आहे. दिसतं तसं नसतं... ह्या कथेत सेंद्रिय शेती याबाबतची माहिती सांगताना हानीकारक रसायने पोटात गेल्याने कोणता आजार बळावतो हे अत्यंत चिकित्सक पद्धतीने मांडले आहे. उत्तराचे बीज प्रश्नाच्या पोटात या भागातही सेंद्रिय शेतीचा प्रयोग आणि महत्त्व विशद केले आहे. नैसर्गिक गाजराच्या बाबतीत आजी म्हणते, ही तर माझ्या लहानपणीच्या मातीची चव! तीच गोडी, तोच सुगंध! अशा प्रयोगातून तारा नैसर्गिक शेतीचे महत्त्व लोकांच्या गळी उतरवते.


साद सिंधुसागराची या कथेत समुद्रातील माशांच्या जिवावर उठलेल्या औषधांची कथा वाचताना अंगावर शहारे येतात. तारा गावकऱ्यांना समजावते, जेव्हा आपण शेतात विषारी औषध फवारतो तेव्हा माती मरते आणि पिके करपतात. जेव्हा कारखाना हे विष पाण्यात ओततो आणि ट्रॉलर्स समुद्राचे पोट फाडतात तेव्हा आपण आपल्या सिंधुसागराचे तेच हाल करतोय. मासे समुद्राच्या रागामुळे गेले नाहीत तर आपण त्यांचे घर आजारी पाडले म्हणून ते घर सोडून गेलेत. जनजागृती किती महत्त्वाची असते, त्यापुढे मोठमोठ्या कारखानदारांनाही माघार घ्यावी लागते हे तारामुळे सिद्ध होते.


सिंधुसागर मोहिमेनंतर वराह पर्वताचा टाहो या भागातही शहरीकरण आणि बिल्डर्सच्या अजगरी विळख्यातून सोडवताना ताराने बजावलेली चित्तथरारक कामगिरी वाचताना ऊर अभिमानाने भरून येतो. पुढे डॉ. गोपाळ पुणे येथे स्थलांतरित झाले. पुणे येथील वास्तव्याची कहाणी विद्येचे माहेरघर या भागात वाचायला मिळते. ताराचे पुण्यनगरीबाबत प्रथमदर्शनी होणारे मत म्हणजे... इथे यशाची व्याख्या माणसाच्या अनुभवाची खोली नसून, गुणपत्रिकेवर छापलेले आकडे होते. तिचे सहाध्यायी म्हणजे एका आंधळ्या शर्यतीत धावणारे वारु होते... ताराला सवय असलेल्या अनुभवाच्या वाहत्या झऱ्याचा तिथे लवलेशही नव्हता... पहिल्याच परीक्षेचा निकाल आला आणि वास्तवाच्या तप्त झळांनी तिला भाजून काढले. पुणे येथे ताराचे शिक्षक मोरेश्वर यांच्याबाबतीत लेखिका लिहितात, त्यांचा आवाज शांत पण एखाद्या ऋषीसारखा गंभीर होता. ते म्हणत, पूल म्हणजे केवळ लोखंड आणि क्राँकीटचा निर्जीव सांगाडा नसून ती आकड्यांची एक कविता असते. पोलादाची ताकद, कमानीचा बाक... यातला प्रत्येक भाग म्हणजे एक अंक असतो, जो समतोल आणि शक्तिची कहाणी सांगतो... प्रत्येक भागात अशा अनेकानेक वाक्यांची पखरण असल्याने ज्योती यांच्याकडील अमाप शब्दसंपत्तीची जाणीव होते.


यासोबतच ताराची मोहीम - विसाकी ओकिनावा यातील हवेची शुद्धी (प्राणवायूचा जागर), हरित उत्सव (सात्विक आनंद), पावन-जीवन (जीवनदायी नद्या), भूमी रक्षण (कचरा मुक्ती) हे बिंदू अत्यंत महत्त्वाचे आहेत. या कादंबरीच्या माध्यमातून लेखिका ज्योती घनश्याम यांनी साहित्य क्षेत्रात दमदार, आश्वासक पाऊल टाकले आहे. अनेक महत्त्वपूर्ण संदेश देण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. लेखिका ज्योती यांच्या साहित्य लेखनाचा वेलू असाच बहरत जावो, त्यांच्या साहित्याचा दरवळ सर्वदूर बेधडक पसरत जावो. त्यांच्या अक्षरधनाला प्रचंड यश मिळो, ह्या शुभेच्छा!


विसाकी ओकिनावा : किशोर कादंबरी


लेखिका : ज्योती घनश्याम


प्रकाशक : लाडोबा प्रकाशन


पृष्ठे : 56, मूल्य : रु.200/-


- नागेश शेवाळकर


9423139071

विसाकी ओकिनावा | Visaki Okinawa
₹200.00₹150.00
Buy Now

Visaki Okinawa: The Tale of an Adventurous Spirit (Best Marathi adventure books for teenagers)

Review by Nagesh Shewalkar

Jyoti Ghanshyam is a name already well-regarded in the world of film lyrics. Since lyrics are, in essence, a form of poetry, the seeds of literature were already germinating within her. Now, entering the courtyard of Marathi literature with a novel for young adults, this is not her first literary venture. She has previously made a confident and successful entry into the world of English literature with her novel 'Unstoppable Tara'.

'Visaki Okinawa' unfolds before the reader across seven engaging chapters. The protagonist, Tara, is the heart of this narrative. The author has passionately painted the journey of this brave and adventurous girl, spanning from her childhood at age nine to her young adulthood at twenty-one. Reading this story feels less like reading prose and more like experiencing a long, flowing poem.

Tara’s father, Dr. Gopal, is described by the author as a "Sage of the Great Book of Nature." naturally, Tara inherits a fascination for geography and biology. She finds her solace in nature. The author fittingly describes Tara’s thirst for knowledge in these subjects as a "walking, talking river of wisdom."

There was a time when Tara was afraid to step into the woods with her father. But soon, she becomes so immersed in the embrace of nature that she doesn't even realize when her fear vanished. At a tender age, accompanied by her uncles Prakash and Vinod, she follows in her father’s footsteps into the dense Aayal forest. Their mission: to find the elusive Sanjivan creeper. The author describes this vine as something that was, until then, considered merely a celestial nymph in the world of imagination. The hair-raising account of their expedition—the challenges they face and how they achieve their goal—is thrilling. Most importantly, discovering what "Visaki Okinawa" actually means is a delight for the reader.

The journey continues as Tara returns to India after twelve years, having studied Environmental Science at the University of Salford in England. The chapter titled 'The Mystery of the Red River' (Raktavarni Nadi), which details the search for natural resources in the evergreen forests along the banks of the Uma River in Chandramani district, is highly readable.

In the story 'Things Are Not As They Seem' (Disat Tasa Nasat), the author takes a clinical look at organic farming versus the dangers of harmful chemicals entering the human body. Similarly, in ' The Answer Lies in the Womb of the Question', the importance of organic experiments is highlighted. There is a touching moment where a grandmother tastes a natural carrot and exclaims, "This tastes like the soil of my childhood! The same sweetness, the same fragrance!" Through such experiments, Tara convinces people of the vital importance of natural farming.

In 'The Call of the Indus Ocean' (Saad Sindhusagarachi), the story of medicines threatening marine life gives one goosebumps. Tara explains to the villagers: "When we spray poison in the fields, the soil dies, and the crops scorch. When factories pour poison into the water and trawlers rip open the ocean's belly, we are doing the same to our Sindhusagar. The fish haven't left because of the sea's anger; they left because we made their home sick." This story proves that when public awareness is strong, even mighty industrialists are forced to retreat.

Following the ocean campaign, the section 'The Cry of the Varah Mountain' fills the reader’s chest with pride as Tara pulls off a breathtaking feat to save nature from the python-like grip of urbanization and builders.

Later, Dr. Gopal moves to Pune. The story of their stay is captured in the chapter ' The Home of Knowledge' (Vidyeche Maherghar). Tara’s first impression of Pune is stark: "Here, the definition of success is not the depth of human experience, but the numbers printed on a mark sheet." She feels her classmates are racehorses running a blind race, with no trace of the flowing springs of experience she was used to. The scorching heat of reality burns her when her first exam results come out.

However, the description of her teacher in Pune, Moreshwar, is profound. The author writes, "His voice was calm but grave, like a sage. He used to say, 'A bridge is not just a lifeless skeleton of iron and concrete; it is a poem of numbers. The strength of the steel, the curve of the arch... every part is a digit that tells a story of balance and power.'" The book is sprinkled with such profound sentences, highlighting Jyoti Ghanshyam’s immense vocabulary and command over language.

Central to the novel is Tara’s Campaign – Visaki Okinawa, which focuses on four critical pillars:

  1. Air Purity (The celebration of Oxygen)

  2. Green Festival (Pure Joy)

  3. Sacred Life (Life-giving Rivers)

  4. Land Protection (Freedom from Garbage)

Through this novel, author Jyoti Ghanshyam has taken a strong, promising step into the field of Marathi literature. She has succeeded in delivering multiple significant messages. May the vine of Jyoti’s literary writing continue to bloom, and may the fragrance of her literature spread far and wide without hesitation. Wishing her immense success for her literary wealth!

Book Details:

  • Book: Visaki Okinawa (Teen Novel / Kishor Kadambari)

  • Author: Jyoti Ghanshyam

  • Publisher: Ladoba Prakashan

  • Pages: 56

  • Price: ₹200/-

विसाकी ओकिनावा | Visaki Okinawa
₹200.00₹150.00
Buy Now

Recent Posts

See All
साहित्य चपराक जून २०१६ अंक

साहित्य चपराक जून २०१६ अंक वाचा ऑनलाईन. Read latest marathi magazine Sahitya Chaprak June 2016 ank online for free. साहित्य चपराक जून २०१६ अंक marathi magazines online free reading, read marathi ma

 
 
 
साहित्य चपराक मे २०१६ अंक

साहित्य चपराक मे २०१६ अंक वाचा ऑनलाईन. Read latest marathi magazine Sahitya Chaprak May 2016 ank online for free. साहित्य चपराक मे २०१६ अंक marathi magazines online free reading, read marathi magaz

 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page