‘काव्यवारी’च्या काव्यसंमेलनात 35 कवींचे हृदयस्पर्शी सादकरीकरण
- Mar 6
- 1 min read

पुणे ः मराठी भाषा गौरवदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘काव्यवारी’तर्फे चारोळी प्रदर्शन आणि मराठी काव्यसंमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी 35 हून अधिक कवींनी हृदयाला भिडणाऱ्या, सामाजिक विषमतेवर बोट ठेवणाऱ्या कवितांचे सादरीकरण केले. त्यास साहित्यरसिकांची उर्त्स्फूत दाद लाभली.
बाजीराव रस्त्यावरील हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालनात मोठ्या उत्साहात काव्यसंमेलन पार पडले. यावेळी बावधन मार्केट यार्डचे मुख्य संचालक गोरख दगडे पाटील, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरलेले उदय जगताप यांच्या हस्ते 42 चारोळ्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
काव्यसंमेलनाचे उद्घाटन विश्वास वसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. काव्यवारीचे अध्यक्ष राजेश सुतार, कवी दत्तात्रेय तरलगट्टी, उपाध्यक्षा मुक्ता कोरपे, भरतकुमार लाड यांच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमात बारामतीहून आलेल्या कवयित्री अनिता तांबे यांच्या हस्ते गोरख दगडे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सहभागी कवींना यावेळी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच चारोळी पोस्टर देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाला सोनेरी छटा उलगडणारे दगडे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. काव्यसंमेलनात पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगली, अकोला, गोंदिया, नागपूर, परभणी, बीड, लातूर अशा विविध जिल्ह्यांतून आलेल्या 35 मान्यवर व नवोदित कवी तसेच कवयित्रींनी कवितांचे सादरीकरण केले. कवी बाळा रेणोसे, कवयित्री वृषाली मोरे, दिव्या लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले.
काव्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत ठाणेकर, सुविद्या करमरकर, सत्यराज यादव, नितीन भोसले, भरतकुमार लाड, जुई सुतार, चैत्रा सुतार आणि शार्दुल ठाणेकर यांनी मोलाचे योगदान दिले. मिरजहून आलेले कवी प्रा. रमेश कट्टीमणी यांनी संमेलनाचे सूत्रसंचालन तसेच कवितांचे परीक्षण केले तर युट्यूबर सुरेखा भागवत यांनी निवेदन केले.
मोलाचे आर्थिक पाठबळ
पुण्यातील नामांकित कंपनी डायमंड बी. पी. आणि मलाबार गोल्ड ज्वेलर्स यांनी प्रायोजकत्व स्वीकारून काव्यसंमेलन यशस्वी करण्यासाठी मोलाचे आर्थिक पाठबळ दिले. त्यांच्या प्रतिनिधींनाही काव्यसंमेलनात स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मलाबारे वतीने लकी ड्रॉ काढून उपस्थित कवींची मने जिंकली.
वृत्तांत : साप्ताहिक चपराक २ ते ८ मार्च २०२६
.jpg)



Comments