top of page

‌‘लाडोबा‌’ साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक

  • Mar 6
  • 1 min read

मुंबई ः मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय, काशिनाथ धुरू हॉल ट्रस्ट आणि विचारधारा प्रतिष्ठान, गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिष्ठित असलेल्या दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्या संपादकांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असूनश त्यात ‌‘लाडोबा‌’ मासिकाच्या दिवाळी अंकाचा ‌‘साने गुरुजी स्मृती मुलांचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक‌’ म्हणून गौरव करण्यात आला.


मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडी, उद्योजक अशोक पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त संजय धुमाळ, संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, दादर सार्वजनिक वाचनालयाच्या शुभा कामथे, विकास होशिंग, देवदत्त लाड, संजीव गुप्ते, प्रशांत घाडीगावकर, रमेश सांगळे, आत्माराम गायकवाड, नितीन कदम आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.


सुवर्णमहोत्सवी दिवाळी अंक परंपरेचा गौरव आणि भाषिक अस्मितेची अभिव्यक्ती यावेळी अनुभवता आली. गोव्यापासून ते महाराष्ट्राच्या विविध भागातील अनेक सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांच्या संपादकांचा यावेळी गौरव करण्यात आला.


मराठी संस्कृतीची उज्ज्वल परंपरा नव्या पिढीपुढे दृढपणे ठेवण्याचा आमचा प्रामाणिक आहे, असे सांगत रवींद्र मालुसरे यांनी सर्व संपादकांचे यावेळी कौतुक केले.


वृत्तांत : साप्ताहिक चपराक २ ते ८ मार्च २०२६


लाडोबा मासिक दिवाळी अंक २०२५ | Ladoba Masik Diwali Ank 2025
₹250.00₹210.00
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page