top of page

‘सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग लीडर‌’ने सुचेता गावडे यांचा सन्मान

  • Mar 6
  • 1 min read

पुणे ः पुण्यातील सुचेता गावडे यांना वूमन्स इन टेक ग्लोबल ॲवॉर्ड 2025 मध्ये ‌‘ग्लोड विनर‌’ म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे त्यांना अमेरिकेत झालेल्या एका सोहळ्यात ‌‘सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग लीडर  ऑफ  द इयर‌’ हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते स्नमानित करण्यात आले.


गावडे या आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी नेत्या आहेत. त्यांनी सुरक्षित आणि आधुनिक इंनिनिअरिंग प्लॅटफॉर्म उभारण्यात तसेच त्यांच्या इतर तंत्रज्ञानांना मार्गदर्शन करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. वूमन टेक नेटवर्क यांच्या वतीने आयोजित वूमन्स इन टेक ग्लोबल ॲवॉर्डस हे महिला, अल्पसंख्याक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकाऱ्यांचा सन्मान करणारे जगातील सर्वात मोठे आभासी पुरस्कार सोहळे मानले जातात. या स्पर्धेत 128 देशांतील 27 विविध श्रेणींमध्ये एकूण 1,760 स्पर्धक सहभागी झाले होते. नेतृत्व, नवकल्पना आणि विविधतेसाठी उपक्रम राबविणाऱ्या महिलांचा गौरव पुरस्काराद्वारे केला जातो. याचाच एक भाग म्हणून तंत्रज्ञान क्षेत्रात बदल घडविणाऱ्या सुचेता गावडे यांना सन्मानित करण्यात आले.


पुरस्कार स्वीकरताना गावडे म्हणाल्या की, समावेशक नेतृत्व आणि मार्गदर्शनासाठी ‌‘सॉफ्टवेअर इंजिनिअरींग लिडर ऑफ द इयर‌’ हा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी अत्यंत अर्थपूर्ण आहे. तो तांत्रिक यशासोबतच मी जपलेल्या मूल्यांचा समावेश, सहानुभूती आणि समाज उन्नतीचा सन्मान करतो. तंत्रज्ञानातील प्रवास सतत शिकणे, वाढ आणि नेतृत्व यावर आधारीत राहिला आहे. माझा ठाम विश्वास आहे की सर्वसमावेशकतेने आणि उद्देशपूर्ण नेतृत्वाने इतारांना पुढे जाण्यास मदत करता येते. जेव्हा तुम्ही मजबूत इंनिनिअरिंग अंमलबजावणीला उद्देश पूर्ण नेतृत्व आणि जबाबदारीशी जोडता तेव्हा प्रभाव अधिक वेगाने वाढतो.”

वृत्तांत : साप्ताहिक चपराक २ ते ८ मार्च २०२६

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page