top of page

‘लाडोबा‌’तर्फे बालकुमारांसाठी त्रैभाषिक कथासंग्रह

  • 2 days ago
  • 2 min read

पुणे - मराठीतले साहित्य इतर भाषांत जायला हवे, अशी अपेक्षा सातत्याने व्यक्त केली जाते. विशेषतः बालकुमारांसाठी असे प्रयोग होणं जास्त गरजेचं असतं. याचाच एक भाग म्हणून लाडोबा प्रकाशनतर्फे ‌‘पुलो डिअर‌’ हा त्रैभाषिक कथासंग्रह प्रकाशित होत असल्याची माहिती प्रकाशक घनश्याम पाटील यांनी दिली.


शिक्षण क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करणाऱ्या नांदेड येथील ज्येष्ठ लेखिका आशा पैठणे यांच्या पाच कथा या संग्रहात आहेत. मूळच्या या मराठी कथांचा स्वाती कान्हेगावकर यांनी हिंदी तर डॉ. अश्विनी भोरे यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे. एकाच पुस्तकात मराठी, हिंदी आणि इंग्रजी कथा सचित्र असल्याने बालवाचकांना ही साहित्यिक मेजवानी मिळणार आहे. शिवाय यातील मराठी कथांच्या अभिवाचनाचा क्यूआर कोड पुस्तकात दिला असल्याने रसिका तुळजापूरकर यांच्या आवाजात या कथा ऐकताही येणार आहेत.


अमराठी मुलांपर्यंत मराठी साहित्य प्रभावीपणे पोहोचावे, इतर भाषा भगिनीबद्दल तिरस्कार, द्वेष न राहता आदर, प्रेमभाव आणि स्नेह वाढावा या हेतूने या पुस्तकाची निर्मिती करण्यात येत आहे. या प्रयोगामुळे मुलांचे अनुवादकौशल्य वाढीस लागणार असून अभिवाचनाचीही गोडी निर्माण होणार असल्याचे घनश्याम पाटील यांनी सांगितले.


या प्रयोगाबाबत लेखिका आशा पैठणे म्हणाल्या, “माझ्या या गोष्टी निसर्ग, समाज, घर आणि मुलांची मने यांना जोडणाऱ्या आहेत. थोडी गंमत आणि थोडे शिकणे आहेच, म्हणूनच मुलांना आनंद देणाऱ्या या गोष्टी आहेत. एखादे पुस्तक प्रकाशित करायचे तर ते एक आव्हानच आहे आणि अशी नवी आव्हाने स्वीकारणे, नवीन प्रयोग करणे यात ज्यांची मातब्बरी आहे असे  ‌‘चपराक‌’ आणि ‌‘लाडोबा‌’चे प्रकाशक घनश्याम पाटील यांचा फार मोठा वाटा आहे. एकदा का मनात आले, की घनश्याम पाटील वायुवेगाने सारे जुळवून आणतात. त्यामुळेच हे पुस्तक बालवाचकांपर्यंत पोहोचणार आहे.”


मराठीत वैविध्यपूर्ण विषयांवरील उत्तमोत्तम साहित्य प्रकाशित व्हावे, यासाठी आमचे अथक प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः बालकुमारांसाठी चांगले साहित्य आल्यास उत्तम वाचक आणि भविष्यातील आदर्श नागरिक निर्माण होण्यास हातभार लागणार आहे. भाषिक मर्यादा ओलांडून मराठीतील साहित्य  अन्य प्रादेशिक भाषांत आणि जागतिक स्तरावर जावे, यासाठी चपराक आणि लाडोबा प्रकाशनतर्फे आम्ही काही प्रयोग करत आहोत. हे पुस्तक त्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे.


-घनश्याम पाटील

प्रकाशक 


Selling fast
पुलो डिअर आणि इतर कथा | Pulo Dear Ani Itar Katha
₹200.00₹150.00

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page