top of page

‌‘सर्जक‌’ला वसंतराव नाईक पुरस्कार प्रदान

  • Mar 6
  • 1 min read

नाशिक ः येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार मयुर बाळकृष्ण बागुल यांनी लिहिलेल्या आणि ‌‘चपराक प्रकाशन‌’ने प्रकाशित केलेल्या ‌‘सर्जक‌’ या पुस्तकाला प्रदान करण्यात आला.


या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार, मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, पालकमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष  सदानंद मोरे, मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


‌‘सर्जक‌’ हे पुस्तक शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या संकल्पनेवर आधारित असून, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पारंपरिक ज्ञान आणि पूरक व्यवसायांच्या संधी यांचा अभ्यासपूर्ण वेध घेते. त्यामुळे हे पुस्तक शेतकरी, ग्रामीण युवक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित वाचकांसाठी मार्गदर्शक ठरते. या पुस्तकासाठी प्रौढ वाङ्मय  शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय या लेखन प्रकारात मयुर बागुल यांना वसंतराव नाईक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि एक लाख रूपये असे त्याचे स्वरूप होते. ‌‘चपराक प्रकाशन‌’ने हे पुस्तक प्रकाशित केले असून चपराकच्या संकेतस्थळावरून वाचक ते घरपोच मागवू शकतात.पुरस्कार स्वीकारताना मयुर बागुल यांनी मराठी भाषा विभाग प्रशासन तसेच निवड समितीचे आभार मानले. हा सन्मान ‌‘चपराक प्रकाशन‌’ आणि वाचकांच्या प्रेमामुळे मिळाल्याची भावना व्यक्त करतानाच या पुरस्कारामुळे आपली जबाबदारी अधिक वाढल्याचे मत त्यांनी मांडले. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते.

वृत्तांत : साप्ताहिक चपराक २ ते ८ मार्च २०२६


सर्जक | Sarjak
₹250.00₹187.50
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page