top of page
All Posts


'टण टणा टण' : बालकांसाठी एक आनंदयात्रा
नुकताच 'चपराक प्रकाशन'च्या एम. के. गोंधळी लिखित 'टण टणा टण' या बालकवितासंग्रहाला 'अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार' संस्थेचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानिमित्त शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे यांनी लिहिलेली पुस्तकाची प्रस्तावना एम.के. गोंधळी, हे एक ख्यातनाम कवी आणि शालेय शिक्षण विभागाचे माजी सहसंचालक, यांच्या लेखणीतून साकारलेला 'टण टणा टण' हा बालकवितांचा अनुपम संग्रह आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. हा संग्रह चिमुकल्या बालकांसाठी खरोखरच एक आनंदमय पर्वणी ठरणार आहे. बालकांना या कोमल वयात
Jun 2, 20253 min read


फिशिंग - आर्थिक फसवणूक : एक सखोल विवेचन | Phishing - Financial Fraud in India
फिशिंग म्हणजे काय? "फिशिंग" (Phishing) ही एक अत्यंत कपटी आणि व्यापक सायबर फसवणुकीची पद्धत आहे. ज्याप्रमाणे एखादा धूर्त कोळी आपले जाळे टाकून निष्पाप माशांना त्यात अडकवतो, त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगार लोकांच्या वैयक्तिक माहितीवर (उदा. बँक तपशील, ओटीपी, पासवर्ड) अत्यंत चलाखीने ताबा मिळवून त्यांना आर्थिक संकटात ढकलतात. हे समाजकंटक तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य व्यक्तींना भावनिक आणि मानसिकरित्या गोंधळात पाडतात, जेणेकरून ते आपली गोपनीय माहिती सहजपणे उघड करतात. फिशिंगचे प्रकार आणि
Jun 2, 20257 min read
महाराष्ट्र कन्या 'अहिल्याबाई'
देवी सती अहिल्या भारतभूला ललामभूत जी। राजकारणी चतुरा असुनी जिने ठेविला हरी राजी ।। — संतकवी श्री दासगणु महाराज संत श्री दासगणू महाराज यांनी गौरविलेल्या, आणि ज्या मनगटात बळ, बुद्धी व चातुर्य आहे, असा जो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो, असा संदेश देणारी महाराष्ट्र कन्या म्हणजे अहिल्याबाई होळकर! माणकोजी शिंदे हे चौंडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथील पोलीस पाटील होते. त्यांच्या पत्नीचे नाव सुशीला बाई. ३१ मे १७२५ या शुभदिनी सुशीला बाई यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्मास आले. य
May 31, 20253 min read
मुलाखतींचे पर्व निर्माण करणारे सुधीर गाडगीळ
सुधीर गाडगीळ - एक नाव जे मराठी रसिक श्रोत्यांच्या मनात निवेदनासाठी आणि प्रभावी मुलाखतींसाठी कोरले गेले आहे. या खास मुलाखतीमध्ये, घनश्याम पाटील यांनी सुधीर गाडगीळ यांच्या जीवनप्रवासातील अनेक पैलूंना स्पर्श केला आहे. त्यांच्या यशामागील संघर्ष, महत्त्वाचे टप्पे, आणि जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन याबद्दल त्यांनी दिलखुलास संवाद साधला आहे. ही मुलाखत केवळ माहितीपर नसून, तुम्हाला प्रेरणा देणारी आणि तुमच्या मनात सकारात्मक विचार रुजवणारी आहे. जर तुम्ही यशस्वी व्यक्तीं
May 29, 20251 min read
स्वातंत्र्यवीर सावरकरांची 'ती' उडी | The Legendary Leap of Swatantryaveer Savarkar
"काय, ओळखलंत का मला? हे केवळ कपडे बदलले आहेत. मी तोच आहे. ईश्वराची इच्छा असेल तर पुन्हा भेट होईलच. तोवर जरी कधी सामान्य संसाराचा मोह होऊ लागला, तर असा विचार करा की, मुलामुलींची वीण वाढवणं आणि चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणं यालाच जर संसार म्हणायचे असेल, तर असले संसार कावळे-चिमण्याही करीतच आहेत. पण संसाराचा याहून भव्य अर्थ घ्यायचा असेल, तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपणही कृतकार्य झालो आहोत. आपली चार चूलबोळकी फोडून टाकली; पण त्यायोगे पुढेमागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्
May 27, 202522 min read


कोकणातील बोली आणि म्हणी
कोकणला जसा सांस्कृतिक कलाप्रकार आणि परंपरांचा मोठा वारसा आहे तसाच वारसा बोलीभाषेच्या बाबतीतही लाभला आहे. इथल्या प्रत्येक बोलीभाषेला स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. कोकणात गाव बदलले की बोलीभाषा बदलते. पूर्वीच्या काळापासून बोलीभाषेत म्हटली जाणारी गाणी, वानकरण्या, ग्रामीण गीते, लग्न समारंभाप्रसंगी गायली जाणारी गीते या सर्वांना स्वतःची असणारी ओळख आजच्या बदलत्या काळातही कायम आहे मात्र येथून पुढे या भाषेतील ठेव्याचे लिखित स्वरूपात जतन करणे काळाची गरज बनली आहे. कोकणचा विचार करता कोळी
May 27, 202511 min read


आर्थिक आणि सायबर फसवणूक - भारतातील वाढता धोका | Financial and Cyber Fraud - The Growing Threat in India
आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपले आर्थिक व्यवहार सोपे आणि वेगवान झाले आहेत पण याचबरोबर आर्थिक आणि सायबर फसवणुकीचे (फ्रॉडचे) प्रमाणही भयावह प्रमाणात वाढत आहे. भारतात ही समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. बँकिंग, गुंतवणूक, ऑनलाइन खरेदी, सोशल मीडिया यासारख्या क्षेत्रांत फसव्या लोकांची संख्या चिंताजनक प्रमाणात वाढली आहे. या लेखात आपण भारतातील: * आर्थिक फसवणुकीचे मुख्य प्रकार * सायबर फसवणुकीचे प्रकार * यापासून बचाव करण्याच्या मूलभूत उपायांवर प्रकाश टाकणार आ
May 26, 20254 min read


मी एक चहा सम्राट!
सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून आपल्याला कोणत्या ना कोणत्या विशेष दिनाची माहिती मिळत असते. त्या दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांचे झाड शुभेच्छांनी लगडून बहरून येते. दरवर्षी आपण चहादिन साजरा करतो. दोन वर्षे लॉकडाऊन असल्यामुळे एकमेकांना घरी बोलावून किंवा चहाच्या टपरीवर, हॉटेलमध्ये बोलावून चहायुक्त शुभेच्छा देता आल्या नाहीत. तरीही, फेसबुक, व्हॉट्सॲपवर वाफाळलेल्या चहाचे कपसोबतचे छायाचित्र पाठवून एकमेकांना शुभेच्छा देऊन चहाचा आस्वाद घेतला. यावर्षी लॉकडाऊन नसल्याने आमच्या शेजाऱ्याने
May 21, 20255 min read


आकाशाशी नाते जोडणारे जयंत नारळीकर
विज्ञान हे शतकानुशतकांपासून सिद्धान्त, प्रयोग आणि निरीक्षण या निकषांवर उत्क्रांत झालेली प्रक्रिया आहे. गोल गोल फिरत वर जाणाऱ्या आणि न संपणाऱ्या जिन्यासारखी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. निसर्ग समजून घेताना एखादी नवी गोष्ट समजणे म्हणजेच या न संपणाऱ्या जिन्याची एखादी पायरी वर चढण्यासारखे आहे. जेव्हा अशा जिन्यावरील एखादी पायरी आपण चढतो, तेव्हा ज्ञानाच्या अभावामुळे माहितीच नसलेले नवे मुद्दे आणि प्रश्न आ वासून उभे राहतात, ज्यांना प्रश्न म्हणून हाताळण्यासाठी आपली पूर्वीची समज पुरेश
May 20, 20254 min read
स्त्री लिखित आत्मचरित्रांचा प्रवास
म. ज्योतिबा फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. एक ऐतिहासिक घटना म्हणूनच याचं वर्णन करावं लागेल कारण स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती न समजण्याचा तो काळ. त्यामुळे तिचं जगणं, समस्या, तिचे विचार, तिची मतं याविषयी जाणून घेण्याची ना कुणाला उत्सुकता होती, ना माध्यम! शिक्षणाच्या निमित्तानं तिच्या बंद जगाची दारं किलकिली झाली. 1916 मध्ये महर्षी कर्वेनी स्वतंत्र स्त्री विद्यापीठाची स्थापना केली आणि तिचं क्षितीज विस्तारू लागलं. स्त्री-पुरुष असमानतेच
May 20, 202511 min read


आपले आरोग्य आपल्या हाती
हल्ली असं आढळून येतं की तुमच्या दुसरी, तिसरीतल्या मुलीसुद्धा रोज मेकअप करताहेत जे अत्यंत चुकीचे आहे. कधीतरी एखाद्या लग्नसमारंभ कार्यक्रमासाठी ठीक आहे पण कोवळ्या वयात असा स्ट्राँग मेकअप लहान मुलींना करणे आपण टाळायला हवे कारण मेकअपमध्ये आय श्याडो, आय लायनर, फाउंडेशन, मस्करा अशा अनेक गोष्टी वापरल्या जातात ज्यात काही प्रमाणात केमिकल असतं. याच्या लहान वयातील सेन्सेटिव्ह त्वचेवरील अति वापराने पुढे केस गळणे, पिंपल्स व पाळीच्या विविध तक्रारी उद्भवू शकतात. म्हणून आपला अग्नी चांगला राह
May 20, 20253 min read


हे आहेत खरे छत्रपती संभाजी महाराज!
संभाजी हे शिवाजी महाराजांचे लाडात वाढलेले, रायगडावर तरुणपणी टगेपणा करणारे, थोरातांच्या कमळा, तुलसी, गोदावरी आदी मुलींना नादी लावणारे, दारू पिणारे, शिवरायांना सोडून मोगलांना मिळणारे, महाराजांनी मोठ्या मिनतवारीने परत आणलेले, अखेर पन्हाळगडावर तुरुंगात ठेवलेले, महाराजांच्या मृत्यूनंतर संतापून तुरुंगाचे गज तोडून रायगडावर आलेले जणू वेताळ. राजारामाला तुरुंगात टाकणारे, राजारामाची आई सोयराबाईंना भिंतीत गाडून मारणारे, औरंगजेबाच्या हाती गाफीलपणामुळे लागलेले, त्याने ‘मुसलमान’ हो म्हटल्या
May 14, 20255 min read


'फुलताना' - वर्ग अनुभवातील शिक्षणाची मांडणी : एक आस्वाद
शिक्षण म्हणजे नेमके काय, असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. काहीजण आपापल्या परीने त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात कुणाला खऱ्या शिक्षणाची वाट गवसते, तर कुणाला नेहमीच्या वाटेवरून प्रवास करणे सोपे वाटते. मात्र, या पलीकडे जाऊन नवीन वाटा शोधत विद्यार्थ्यांचे जीवन फुलवण्याचा प्रयत्न काही शिक्षक करत असतात. खरे तर विद्यार्थ्यांच्या आत जे दडलेले आहे, ते बाहेर काढणे हेच खरे शिक्षण असते. पण आजकाल बाहेरून डोक्यात काहीतरी कोंबणे म्हणजेच शिक्षण, असा विचार पुढे येत आहे. पार
May 13, 20255 min read


शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचा इतिहास
इ.स. सहाव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत राजस्थानात (राजपुतान्यात) गुहिलोत (गहलोत) घराणे राज्य करीत होते. या घराण्यात अत्यंत कर्तबगार व पराक्रमी राजे होऊन गेलेत. पुढे या घराण्यात शिसोदिया व रावळ अशा दोन शाखा निर्माण झाल्या. बाप्पा रावळ हे प्रसिद्ध राजे ह्याच घराण्यात होऊन गेले. पुढे दहा-बारा पिढ्या राजपुताण्यात यांनी सुखाने राज्य केले. त्यानंतर पुढे रावळ घराण्यात लक्ष्मणसिंह नावाचा पराक्रमी राजा होऊन गेला. त्याला एकूण आठ मुले होती परंतु त्याचे सात पुत्र युद्धात मारले गे
May 12, 20259 min read


श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र : प्रस्तावना - उमेश सणस
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आजही तरुण पिढीला कमालीचे आकर्षण आहे. येणारी प्रत्येक नवी पिढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमात पडते, शिवचरित्राचा अभ्यास करते व ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणण्यात धन्यता मानते. असा परिपाठ गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात सुरू आहे. ‘मानवतेला उपकृत करणारा महामानव’ अशी जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणसं घडवतो, हा इतिहासाच्या अभ्यासकांसाठी नेहमीचा प्रश्न आहे; मात्र छत्रपती शिवाजी महाराज या महापुरु
May 7, 20255 min read
राजर्षी छत्रपती शाहू महाराज – समतेचे सूर्य
कोल्हापूरच्या राजवाड्यात २६ जून १८७४ रोजी केवळ एका नव्या दिवसाचा अरुणोदय झाला नाही, तर एका क्रांतिकारी पर्वाची पहाट झाली. याच दिवशी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला, ज्याने पुढे एका राजसिंहासनाला केवळ भूषविले नाही, तर त्या सिंहासनाला एका उदात्त विचारसरणीचे, समाजोद्धाराचे आणि परिवर्तनाचे प्रतीक बनवले. हे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज! कागलच्या घाटगे घराण्यात जन्मलेल्या या तेजस्वी बालकाचे मूळ नाव यशवंतराव होते. नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच योजलेले होते.
May 6, 20253 min read


गतकाळातील पुस्तकांविषयी बरंच काही...पुस्तकानुभव आस्वाद
पुस्तकं ही प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असतात. काही पुस्तकं माणसांच्या जीवनावर परिणाम करतात. काही पुस्तकं माणसाला जगण्यासाठी शक्ती,प्रेरणा देत असतात. मात्र काळ जसा पुढे सरकत जात राहतो, त्याप्रमाणे काही पुस्तकं पुढच्या पिढीसाठी टिकून राहतात. काही मात्र काळाच्या ओघात मागे पडतात. पुस्तके मागे पडतात म्हणजे ती संपतात असं होत नाही. ती पुस्तके एका पिढीने दुसऱ्या पिढीच्या हातात देण्याची आवश्यकता असते, पण शंभर वर्षापूर्वीची इतिहासातील काही चांगली पुस्तके नवाचकांना अनुभवता यावीत, त्य
May 5, 20256 min read


नवरा माझा भवरा
‘‘अहो, उठा ना, गाढवासारखं काय लोळताय? मिक्सर चालू होत नाही’’ सुषमाने किचनमधून आवाज टाकला. ‘‘अगं मग मी काय करू? माझ्या झोपण्याचा आणि मिक्सर चालू होण्याचा काय संबंध आहे का? मी काय मिक्सर दुरुस्तीवाला वाटलो का?’’ आम्हीही वैतागून म्हटलं आणि कूस बदलून परत झोपलो. ‘‘अहो मला स्वयंपाक करायचाय’’ सुषमानं आवाजाची पट्टी तीच ठेवत म्हटले. ‘‘अगं मग कर ना. मी काय किचनओट्यावर झोपलोय का?’’आम्ही उत्तर दिले. ‘‘तुम्ही डाराडूर झोपा आणि मी मात्र दिवस-रात्र काबाडकष्ट करते. तुम्ही तिकडे झोपलेले असल्य
May 5, 202512 min read
'चणे विकून शिक्षण' ते 'राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष!'
https://www.youtube.com/watch?v=n006PAkK8rA
May 1, 20251 min read
bottom of page
.jpg)




