top of page

साप्ताहिक चपराक १३ ते १९ एप्रिल २०२६

  • Apr 11
  • 2 min read

राजेंद्र दिघे यांच्या ‌‘पाखराची गाणी‌’ला शिवांजली बालसाहित्य पुरस्कार


जुन्नर (वार्ताहर) - मालेगाव येथील आई प्रतिष्ठान या शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष राजेंद्र दिघे यांच्या ‌‘पाखरांची गाणी‌’ या ‌‘लाडोबा प्रकाशन‌’ने प्रकाशित केलेल्या बालकविता संग्रहास शिवांजली साहित्यपीठाचा राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. समितीने श्री. दिघे यांच्या ‌‘पाखरांची गाणी‌’ या बालकवितासंग्रहाची तबाजी भा. शिंदे पुरस्कृत बालसाहित्य पुरस्कारासाठी निवड केल्याची माहिती साहित्यपिठाचे प्रवर्तक इंजिनिअर शिवाजी चाळक, संतु जेडघुले यांनी दिली.


यापूर्वी ‌‘काळ्या आईची तहान‌’ व ‌‘शाब्बास गुरूजी‌’ दोन पुस्तके दिघे यांच्या नावावर आहेत. दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‌‘पाखरांची गाणी‌’ हा बालकविता संग्रह लाडोबा प्रकाशनने प्रकाशित केला होता. या बालकविता संग्रहाला गिरणा गौरव प्रतिष्ठानचा स्मिता पाटील काव्य पुरस्कार मिळाला असून 25 एप्रिलला गारगोटी, कोल्हापूर येथील अक्षर सागर साहित्य मंचचा राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे. तर 3 मे रोजी होणाऱ्या 32 व्या शिवांजली मराठी राज्यस्तरीय साहित्य महोत्सवात चाळकवाडी येथे मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याचे संयोजक बाबासाहेब जाधव, बंडु सदामते, संदीप वाघोले यांनी पत्रकान्वये कळविले आहे. दिघे यांच्या या पुरस्काराबद्दल मालेगाव शहरातील साहित्य चळवळ, रोटरी, राष्ट्र सेवा दल व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.




 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page